Jyoti gosavi

Comedy

3.9  

Jyoti gosavi

Comedy

द्रौपदी वस्त्रहरण

द्रौपदी वस्त्रहरण

2 mins
448


हा एक दशावतारी नाटकाबाबत घडलेला किस्सा आहे.

पूर्वी दशावतारी नाटकामध्ये स्त्री पार्टी चे काम पुरुषच करायचे त्या वेळी घडलेला हा किस्सा .


 नाटक होते "द्रौपदी-वस्त्रहरण" द्रौपदीचा रोल एक पुरुष पार्टी करत होता. नाटक रंगात आले होते द्रौपदी वस्त्रहरणाचा प्रसंग चालू होता. दुशा:सन पदराला हात घालून तिची साडी ओढत होता आणि द्रौपदी दोन्ही हात आभाळाकडे करून हे कृष्णा धाव, हे मुकुंदा धाव, हे मुरारी धाव, अशी करूण स्वरात कृष्णाची प्रार्थना करत होती. लोक अगदी डोळ्याची पापणी न लवता प्रसंग पहात होते. स्त्री मंडळीतील प्रेक्षकांनी डोळ्याला पदर लावलेला होता.

आणि अचानक एकाएकी द्रौपदी बनलेले पात्र - जोडलेले हात खाली घेऊन डोकं फिरल्या सारखी, अंगात आल्यासारखी करा- करा छातीला पाठीला पोटाला खाजवू लागली. कोणाला काय होते समजेना, दुशा:सन हातातला पदर हातात ठेवून अचंबित पणे द्रौपदी कडे बघू लागला. आणि एकाएकी द्रौपदीने आपला पदर खाली टाकून स्वतः अंगावरची साडी काढून फेकून दिली. आता आपण काय करायचं म्हणून दुशा:सन बघतच राहिला.

 त्यानंतर द्रौपदीने थाड्कन ब्लाउज ची बटणे काढून ब्लाउज फेकून दिला. त्याबरोबर चोळीच्या आत ठेवलेले दोन बनपाव खाली पडले आणि प्रेक्षकांमधून हुल्लडबाजी सुरू झाली.

 कारण द्रोपदी बनलेला पुरुष आता हाफ चड्डी मध्ये स्टेजवर उभा  राहून स्टेजवर ती हैदोस घालत होता.. ते दृश्य दिसायला पण विचित्र दिसत होते. केसाचा अंबाडा, कपाळावरती लाल भडक रुपया एवढे कुंकू, हातात बांगड्या, कानात कर्णफुले, केसात गजरा अशा सर्व शृंगार केलेला एक पुरुष हाफ चड्डी वरती स्टेजवर आपले अंग कराकरा खाजवत होता ते बघून शेवटी दुःशासन घेरी येऊन खाली पडला आणि नाटकाचा पडदा पडला.

त्याचे असे झाले मंडळी ते बंन पाव एका खांबाला टांगलेले होते... लाल मुंग्यांना त्याचा सुगावा लागला आणि मेकअप दादाने गडबडीच्या वेळी न बघता ते पाव तसेच चोळी मध्ये ठेवून दिले आणि पुढचा हा दुर्धर प्रसंग ओढवला.

प्रेक्षकांची आणि ऐकणाऱ्यांची हसून हसून मुरकुंडी


Rate this content
Log in

Similar marathi story from Comedy