Poonam Wankar ( पूरवा )

Romance Fantasy

3  

Poonam Wankar ( पूरवा )

Romance Fantasy

दो दिल एक जान - भाग तीन

दो दिल एक जान - भाग तीन

5 mins
177


        निल डॉ. सृष्टी ला बघण्यासाठी फारच उतावीळ झाला होता. मात्र काही केल्या तीच मुखदर्शन काही होईना. सतत काही ना काही तरी मधे मधे लुडबुड करत होत. कधी पडदे, कधी तिचे मोकळे केस, तर कधी बाजूला उभी असलेली सिस्टर..., आता त्याला थोडीशी चिडचिड व्हायला लागली. पण सृष्टी ला बघण्याची ओढ त्याला काही स्तब्ध बसूच देईना. इतक्यात सिस्टर बाहेर आल्या आणि विनय ला म्हणाल्या,

" Excuse me! तुम्हाला मॅडम नी आत बोलावलंय. "

खर तर आत निलला जायचं होत. मग विन्याला का बोलावलं?? मला का नाही?? असा प्रश्न त्याला पडला आणि विन्या जायच्या आधी तोच उठून आत जाऊ लागला.

सिस्टर : " अहो! जरा थांबा. मॅडम नी त्यांना बोलावलंय ना? मग तुम्ही थोडे वाट बघा. तुमचा नंबर आला की सोडेल तुम्हाला आत. "

निल : " अहो सिस्टर ते आजोबा आमच्याच सोबत आलेत. मी येतो ना आत. "

सिस्टर: " अहो, पण मॅडम नी त्यांना बोलावलंय. तर त्यांना जाऊ द्या ना! तुम्ही बसा इथे. "

विनय : " सिस्टर..., जाऊ द्या त्याला आत. त्याला डॉक्टर शी बोलायचं आहे. " ( विनय मिश्किल पणे हसत म्हणाला. )

            सिस्टर निल ला आत सोडतात. निल च्या हार्ट बिट्स आता जोर जोरात वाजायला लागल्या होत्या. त्याच्या मनाचा मोर पिसारा फुलवून नाचू लागला होता. हे असं का होतय त्याला कळायला काही मार्गच नव्हता. पण जे काही होतय ते त्याला खूप छान वाटत होत. निल आत पोहचला तेव्हा डॉ. सृष्टी त्या आजोबांशी गप्पा मारत होती. जणू काही त्यांचीच नात असावी. ती खूप सुंदर होती. त्याच्या कल्पनेच्या पलीकडे. उंच सडपातळ बांधा. सहस्त्र चांदण्यानी नटलेली रात्र तिच्या डोळ्यात समावली होती. फुलांची सुंदरता आणि कोमलता तिच्या चेहऱ्यावर झळकत होती. गुलाबाच्या पाकळ्या सजवल्यागत तिचे गुलाबी नाजूक ओठ..., आता जर एखाद फुलापाखरू मकरंद शोधायला निघालं असत आणि त्याने चुकून जर हिला पाहिलं असत तर कदाचित ते ही आपली वाट चुकलं असत. तिच्या कानाला बिलगून बसलेले मोती बघून त्या क्षणी नीललाही मोती व्हावंसं वाटत होत. म्हणजे तोही तिला असाच बिलगून बसल असता 😊. तिच्या गालावर गोड खळी पडत होती. तिच्या ओठांजवळ एक काळा तीळ होता जणू काही तिला कुणाची द्रिष्ट लागू नये म्हणून देवानेच तिची तीट काढण्यासाठी काजळजन्य टिपका लावला असावा. तिने आकाशी रंगाची कुर्ती घातली होती आणि त्यावर ते पांढर ऍप्रॉन खूप भारी दिसत होत. तिच्या कडे बघताना तिचे ओठ सतत हलताना दिसत होते पण निलला काहीच ऐकू येत न्हवत. इतक्यात त्याला हलवल्याचा भास होतो आणि तो भानावर येतो...

आजोबा : " काय रे! कुठे हरवलास? डॉक्टर तुला काही सांगताहेत. लक्ष कुठेय तुझ?? "

निल : " ओह!! सॉरी.. सॉरी..! माझ लक्ष नव्हतं . काय..?काय म्हणाल्या डॉक्टर तुम्ही?? आजोबा ओके आहेत ना? काही प्रॉब्लेम तर नाही ना त्यांना??"

डॉक्टर : " नाही.., घाबरण्याच काहीही कारण नाही. आजोबा अगदी ओके आहेत. उन्हामुळे चक्कर आली त्यांना. आजोबा तुम्ही ही परत असे एकट्याने उन्हात निघू नका बाहेर. आज हे होते म्हणून तुम्ही इथे पोहचू शकला. एखाद्या निर्जन स्थळी पडला असता तर कठीण झालं असत. त्यामुळे असं एकट्याने निघायचं नाही बाहेर. "

         तीच ते बोलणं निल एकटक तिच्या कडे बघून ऐकत होता. त्याला सृष्टी खूप आवडली होती. ती दिसायला जेवढी सुंदर होती तितकंच तीच मन सुद्धा त्याला पाण्यासारखं स्वच्छ सुंदर दिसत होत. आणि नकळत त्याच्या ओठांवर शब्द फुलले..

              "एक लाईन में क्या तेरी तारीफ़ लिखू

             पानी भी जो देखे तुझे तो प्यासा हो जाए "

सृष्टी : " Excuse me!!! Are you all right?? "

निल : " Yes, absolutely 😛... " ( तो मनातल्या मनात लाजला, त्याला त्याचच मन खायला लागलं. असं कस मी बोलून गेलो हिच्या पुढे. ) " सॉरी! हा डॉक्टर, ते.... चुकून झालं माझ्याकडून.. I'm really very sorry 😐 "

सृष्टी : " No, no!! It's ok! 😊" होतं कवी लोकांचं असं...! "

निल : " पण, हे तुम्हाला कस माहिती? "

सृष्टी : " अहो, आवडतं मलाही वाचायला 😊"

सिस्टर : " मॅडम, मोठे सर तुम्हाला बोलवत आहेत. "

सृष्टी : " हो, आलेच..! Excuse me! " ( सृष्टी तिथून निघून जाते.)

          निलच्या मनात परत विचार येतो, " या सिस्टर पण ना! थोड्या उशिराने आल्या असत्या तर काय झालं असत. आणखी थोडा वेळ घालवता आला असता ना हिच्या बरोबर. माहिती काढता आली असती. "

           निल ला स्वतःचच हसायला येत. तो आजोबांना घेऊन निघतो. त्यांना वाटेत सोडत निल आणि विन्या पुढे निघतात. निल च्या ओठांवर वेगळीच स्माईल असते. त्याच्या चेहरा बघून कोणीही ओळखलं असत की, त्याची विकेट गेलीय 😄. विनय देखील ओळखून होता की आज निल च्या मनाचा पतंग उंच आकाशात झेप घेतोय ते.

विनय : " यार निल! ते बघ तिकडे.. पतंग कटलाय "

निल : ( थोडा भानावर येत ) " कुठे आहे?? "

विनय : ( हसत ) " तुझ्या मनाचा..! यार गेलास कामातून..! 😄, कवी को कविता मिल गई... क्या बात हैं 😊!!"

निल : (जरा मनात खुश होत ) " काय यार तू पण ना!!😊 असं काही नाही " 😊😊😊

            विन्या ला सोडत निल घरी पोहचतो. त्याच्या रूम मधे जाऊन फ्रेश होतो आणि त्याची गिटार घेऊन खाली येतो.

बाबा : " अरे निल, आज बऱ्याच दिवसांनी गिटार? क्या.. बात क्या हैं?? आज काय ऐकवणार आहेस आम्हाला?? "

चिनू : " अहो बाबा.., ती पावसामधली हिरोईन भेटली असेल त्याला म्हणून खुश असेल..! काय रे दादा! खरंच भेटली की काय?? "

आई : " काय ग चिनू! कशाला चिडवतेस त्याला?? आणि ती भेटली जरी असेल तर चांगलंच आहे ना आपल्याला!! रोज रोज याची स्वप्न नाही ऐकावी लागणार आता... वाचलो ना आपण!!😊 आता ऐकवेल तिलाच!!😊😊"

निल : " काय ग आई! तू पण यांच्यात सामील झाली..!! तू माझी टीम आहेस ना! मग अशी चीटिंग नाही करायची..!!" ( सगळे हसायला लागतात.)

           निल गिटार चे तार ट्यून करतो. आणि हळूच त्याच्या तारा छेडतो आणि त्याच्या मनातले शब्द हळूच त्याच्या ओठांवर येतात....

              तुमसे मिलके ज़िन्दगी को यूँ लगा

              जैसे हमको सारी दुनिया मिल गयी

               दिल में जागी धड़कनों की रागिनी

               हर तमन्ना फूल बनके खिल गयी

                तुमसे मिलके ज़िंदगी...

          आज निल च्या आई बाबांनाही निल च्या आयुष्यात झालेली खळबळ जाणवली होती. निल च्या आयुष्यात कुणीतरी आलाय हे त्यांनी ओळखलं होतं.

         आज निल रात्रभर सृष्टी च्या विचारात हरवला होता. काही केल्या त्याला झोप लागत नव्हती. डोळे बंद केले की सृष्टी त्याच्या डोळ्यांपुढे यायची. वाऱ्याच्या झोताने तिच्या चेहऱ्यावर येणारे तिचे रेशमी केस.., गुलाबाच्या फुलासारखे तीच ओठ, तिचे बोलके डोळे... ते सगळं काही राहून राहून त्याच्या नजरे समोर येत होतं. डॉक्टर सृष्टी आणि ती लेखिका सृष्टी दोघी ही एकच असाव्यात असं त्याला राहून राहून वाटत होतं. आज जर त्या सिस्टर आल्या नसत्या तर कदाचित त्याला ही गोष्ट माहिती झाली असती. आता त्याच्या मनात विचार येत होता तो त्या स्वप्नातल्या मुलीचा. तिचा आणि सृष्टीचा काही संबंध असेल का?? हा प्रश्न राहून राहून त्याला सतावत होता. निल रात्रभर फक्त कूस बदलत होता.

(क्रमशः)


Rate this content
Log in

Similar marathi story from Romance