दो दिल एक जान.. ❤️ (भाग तेरा)
दो दिल एक जान.. ❤️ (भाग तेरा)
सिया आणि राघव दोघांच्याही मनात एकमेकांबद्दल प्रेम उमलायला लागलं होत तर मधेच राघवच्या लग्नाचा विषय पुढे येतो. दोघांनाही एकमेकांना सांगायचं असतं मात्र कस सांगावं? या कल्पनेने दोघेही शांत बसतात. सियाच्या आई बाबांचे आपल्यावर खूप उपकार असल्याची भावना राघवला हे सगळं बोलण्यापासून थांबवत होती. आणि तिकडे सियाचं मन मात्र प्रत्येक क्षणाला राघवला गमावल्याच्या जाणीवने रडत होत. दोघांच्याही मनाची अवस्था सारखीच... मात्र दोघेही आपल्या डोळ्यातील आसवांना लपवून खुश असल्याचा दिखावा करत होते. एक दोन दिवसात राघवला बघायला मुलीकडची मंडळी येणार होती. सियाचे आई बाबा दोघेही तयारीला लागले होते. त्यांना वाटायचं की, एकदाच राघवच लग्न झालं, त्याला सांभाळून घेणारी चांगली मुलगी मिळाली; की त्यांची काळजी कमी होईल. त्या दोघांचाही राघववर खूप जीव होता. सियाच्या मनात मात्र असवांचा जणू पूर दाटलेला होता. कधीही तिच्या मनाचा बांध कोसळून पडणार होता.
आई : " सिया.., काय झालं बाळा?? बर नाही का वाटत तुला?? डोळे का असे पाणावलेत तुझे??
सिया : " कुठे..?? अग काहीच नाही.., कचरा गेलाय डोळ्यात.. त्यामुळे असेल. मी आलेच डोळे धुवून. "
सियाच्या मनात काहीतरी वेगळं चाललंय हे मात्र आईच्या लक्षात येत. सिया तिच आवरून कॉलेज ला निघून जाते. दुपारी सियाची आई तिच्या वडिलांजवळ हा विषय काढते..,
आई : " अहो.., मला काय वाटत.. आपण एकदा राघवशी बोलायला हवं होत का? म्हणजे त्याच्या मनात कोणी दुसरी मुलगी असेल तर?? तो काही आपणहून बोलणार नाही आपल्याला. "
बाबा : " अग.., असं काही असेल मला नाही वाटत. आपल्याला नाही पण तो सियाला नक्कीच बोलला असता ना असं काही असतं तर..!"
आई : " हो.. तेही बरोबरच आहे तुमचं म्हणणं. काल पासनं सिया सुद्धा शांत शांत आहे. काहीतरी चाललंय तिच्या मनात. मी विचारलं तर काहीच बोलली नाही. नीट जेवलीही नाही काल पासून. आणि हा राघव देखील.. रोजचा नित्य क्रम आज चुकवला ना त्याने. सकाळपासून फिरकला देखील नाही इकडे."
बाबा : " अरे खरच की, माझ्या तर लक्षातच आलं नाही हे! कितीही काहीही होऊ देत मात्र हा सकाळी घरी आल्याशिवाय राहत नाही. आज खरंच दिसला सुद्धा नाही. काय ग? पोरांची भांडण तर नाही ना झाली काही?? "
आई : " या पूर्वी कित्येक वेळा भांडलीत मुलं, पण राघव घरी आलाच नाही असं नाही ना झालं कधी? आणि ती दोघ तरी राहू शकतात का एकमेकांना न बोलता. आता भांडली की लगेच थोड्या वेळात सगळं विसरून एकत्र येतात दोघेही. "
बाबा : " हो! तू अगदीच बरोबर बोलतेस. आज सायंकाळी बोलूया मुलांशी. नक्की काय झालंय कळेल तरी आपल्याला. "
राघव आणि सियाचं वागण दोघांनाही जरा विचार करायला भाग पाडत. तिकडे सिया कॉलेजला न जाता देवळाकडे जायला निघते. तिला आज शांत एकट्याने बसायचं होत. राघवच लग्न होणार, तो आपल्यापासून दुरावल्या जाणार ही कल्पनाच तिला सहन होत नव्हती. शिवाय राघवच्या मनात काय आहे हेही तिला ठाऊक नव्हत. त्यामुळे तिला स्वतः ला समजावून सांगायला वेळ हवा होता. ती देवळापाशी पोहचते तर तिला समोर एका बाकावर राघव एकटाच बसलेला दिसतो. " तू..., इथे काय करतोय? " सिया राघवला म्हणाली. राघवने दचकून पाहिलं तर त्याच्या शेजारी सिया उभी. राघवचे डोळे पाणावलेले होते. त्याने लगेच डोळे पुसले. " अग सिया! तू इथे? कॉलेजला नाही गेलीस का? " राघव सियाला म्हणाला.
सिया : " नाही.., आज मन नव्हतं लागत. पण तू काय करतोय इथे? आणी आज सकाळी घरी आला नाहीस..? काय झालं??
राघव : " अग आज सकाळी आश्रमात भजनाचा कार्यक्रम होता. तर सकाळी लवकर घरून निघालो होतो. आई बाबा झोपले असतील म्हणून घरी नाही आलो. परत येताना देवळात आरती सुरु होती तर थांबलो इथे. येना बस ना! उभी का आहेस??"
सिया : " राघव.. मघाशी तुझ्या डोळ्यात पाणी का होत?? काय झालं? कोणी काही बोललं का तुला?? "
राघव : " नाही.. काही नाही.. असच. आज माहिती नाही खूप उदास वाटत आहे. वाटतंय की जणू आयुष्यच संपतंय की काय माझं."
सिया : ( राघवच्या तोंडावर हात ठेवत )" ए.. वेड्या असं काही नाही बोलायचं. तुला जर काही झालं तर मी कशी जगेल?? मी नाही राहू शकत तुझ्याशिवाय. माझं खूप प्रेम आहे तुझ्यावर "
सिया तिच्या नकळत सगळं एकादमात बोलून मोकळी होते. तिलाही कळत नाही की तिने तिच्या प्रेमाची कबुली राघवला दिली होती.
राघव : " काय..? सिया तू हे जे काही बोलली ते खर आहे का? ( आश्चर्याने ) सिया खर सांगू..? मलाही तू खूप आवडतेस. मी ही तुझ्याशिवाय विचारच करू शकत नाही ग! पण हे सगळं शक्य नाही ग सिया. तुझ्या आईबाबांनी मला नवा जन्म दिला. आज मी जे काही आहो ना! ते फक्त आणि फक्त त्यांच्यामुळे. माझ्या प्रत्येक श्वासावर त्यांचा अधिकार आहे. त्यांना जर हे कळलं तर ते खचून जातील. मला त्यांना नाही ग दुखवायचं. "
सिया : " राघव...! तू किती वेगळा आहेस रे! सगळ्यांचा किती विचार करतो. तुझ्यातला हा वेगळेपणाच मला माझ्या नकळत कधी तुझ्या जवळ घेऊन आला मला माझं कळलंच नाही. राघव... I love you!!
राघव आणि सियाचे डोळे पाणावलेले होते. खर तर त्या क्षणी राघवला सियाला घट्ट मिठी मारावीशी वाटत होती. सगळ्या जगाला ओरडून सांगावस वाटत होत की, " हो... माझं खूप प्रेम आहे सियावर.. सिया फक्त माझी आहे आणि माझीच राहणार! " पण त्याचे शब्द मुके झाले होते. त्याच्या डोळ्यातून वाहणार पाणी मात्र सगळं काही बोलून गेलं होत. राघव तसाच उठून तिथून निघून जातो. सिया मात्र त्याच्या पाठमोऱ्या शरीराकडे बघत तिथेच बसून होती. राघव आई बाबांना कधीही दुखावणार नाही. स्वतः मात्र दुःखात जगेल हे तिला कळून चुकलं होत.
सिया आणि राघवच हे बोलणं मात्र तिथे आधीच उपस्थित असलेल्या त्यांच्या मित्राने शेखरने ऐकलं होत. त्यांच्या सगळ्याच ग्रुपला माहिती होत की, ही दोघेही एकमेकांसाठी बनलेली आहेत. मात्र असं काही होईल याची त्यांना कल्पनाच नव्हती. मात्र शेखरला हे सगळं थांबवायच होत. तो लगेच सियाच्या घरी जाऊन तिच्या आईबाबांना सगळं सांगतो. शेखरच बोलणं ऐकून आईबाबाही अवाक होतात.
आई : " अरे शेखर, हे काय बोलतोस तू? "
शेखर : " मी खर तेच सांगतोय काकू. अहो ती दोघेही फक्त एकमेकांसाठीच जन्मली आहे. त्यांचा दिवसही एकमेकांशिवाय सुरु होत नाही. आणि हे मलाच काय सगळ्या गावात जगजाहीर आहे. हो हेही तितकंच खर आहे की, त्यांनी कधी एकमेकांसमोर तशी कबुली आजपर्यंत दिली नव्हती. पण काका खरच सांगतो, राघव किंवा सिया ही दोघेही कधीच तुम्हाला नाही सांगणार. "
बाबा : " अरे पण शेखर, राघव किंवा सिया हे दोघेही आमच्याशी त्यांच्या मनातल्या सगळ्या गोष्टी सांगतात. मग ही एवढी मोठी गोष्ट का नाही सांगतील आम्हाला..?? "
शेखर : " काका तुम्ही म्हणताय ते खर आहे, पण राघवला वाटतं की, त्याच आयुष्य तुमची देण आहे. त्यामुळे त्याला असं काहीही वागायचं नाही ज्यामुळे तुम्ही दोघे दुःखी व्हाल. आणि त्यासाठी तो त्याच सुख देखील कुर्बान करेल. आणि सिया ती देखील राघवला खाली मान घालण्याची वेळ येऊ देणार नाही. स्वतःची आसवे लपवत तुमच्या पुढे नेहमीच हसत राहील. "
शेखरच बोलण ऐकून सियाचे आईबाबा सुन्न होऊन जातात. आपलं खरंच चुकतंय का?? हा प्रश्न त्यांच्या मनाला सतावयला लागतो. सियाचे आईबाबा करतील का सिया आणि राघवच्या नात्या विषयी विचार? राघव आणि सिया बोलतील का त्यांचा मनातलं?? हे जाणण्यासाठी पुढील भाग नक्की वाचा..

