Poonam Wankar ( पूरवा )

Romance Fantasy

2  

Poonam Wankar ( पूरवा )

Romance Fantasy

दो दिल एक जान ❤️(भाग सोळा)

दो दिल एक जान ❤️(भाग सोळा)

4 mins
52


       पहाटे कधीतरी अचानक राघवला जाग येते. सिया अजूनही त्याच्या खांद्यावर डोकं ठेऊन गाढ झोपलेली होती. खिडकीतून वाहणारी गार वाऱ्याची झुळूक हळूच तिच्या मोकळ्या केसांना उडवून जात होती. तिच्या डोळ्यांची चंद्रकोर राघव एकटक बघत होता. मधेच सियाच्या केसांची एक बट तिच्या चेहऱ्यावर येऊन थांबली. राघवने हळूच त्याच्या बोटाने ती दूर करण्याचा प्रयत्न केला..., पण त्याच्या स्पर्शाने सियाची झोप उघडली. ती अजूनही राघवच्या खांद्यावर झोपून होती हे तिच्या लक्ष्यात येताच ती लगेच जरा लाजून बाजूला होण्याचा प्रयत्न करते. मात्र राघव तिला एक हाताने लगेच परत जवळ ओढतो.


सिया : " काय रे...! उठू दे ना!! बघ दिवस उजाडलाय. "


        राघव मात्र अजूनही तिच्या काळ्याशार डोळ्यांत हरवून गेलेला होता. तिच्यातच एकटक बघत होता.


सिया : " काय...?? असं का बघतोस?? ( जरा लाजत )"


राघव: " तुलाच बघतोय..! माझ्या डोळ्यांनी तुला पिण्याचा प्रयत्न करतोय!!"


सिया : " इश्श...!!!! "


       सिया आता लाजेणे चूर झाली होती. ती स्वतःला राघवच्या मिठीतुन सोडवण्याचा वेडा प्रयत्न करू लागली होती. तोच राघव तिला परत जवळ ओढतो.. आता त्याच्यातला गायक जागा झाला होता. मिठीत इतकी सुंदर सिया असताना हे होऊ नये का?? राघव गायला सुरु करतो...


पहाटे पहाटे मला जाग आली

तुझी रेशमाची मिठी सैल झाली...

पहाटे पहाटे मला जाग आली


       सियाला ही आता मोह आवरत नव्हता. ती हळूच स्वतः चे ओठ राघवच्या कपाळावर टेकवते. त्याच्या केसात तिचे बोट आपोआप गुंतायला लागतात. राघवच्या डोळयांत एक क्षण बघून ती परत तिच्या पापण्या खाली झुकवते... तिच्या झुकलेल्या डोळयांत बघून राघव परत गाऊ लागतो....


मला आठवेना, तुला आठवेना

कशी रात गेली कुणाला कळेना

तरीही नभाला पुरेशी न लाली

तुझी रेशमाची मिठी सैल झाली

पहाटे पहाटे मला जाग आली....


          थोडा वेळ सिया तशीच राघवच्या मिठीत कैद असते. आता मात्र ती स्वतः ला त्याच्या हातांच्या कैदेतून सोडविण्याचा प्रयत्न करू लागते.. तिचा तो फसवा प्रयत्न बघून राघवही गोड हसतो.., आणि म्हणतो....


गडे हे बहाणे, निमित्ते कशाला

असा राहू दे हात, माझा उशाला

मऊ मोकळे केस, हे सोड गाली

तुझी रेशमाची मिठी सैल झाली 

पहाटे पहाटे मला जाग आली.....


           आता राघव सियाच्या मोकळ्या रेशमी केसांच्या गंधात धुंद व्हायला लागला होता. त्याचे श्वास सियाच्या श्वासांना हळूच स्पर्श करू लागले होते. त्यांच्या स्पंदणांच्या गतीचा वेगही वाढू लागला होता.... सियाच्या हात हाती घट्ट धरत, तिच्या डोळयांत बघत राघव म्हणतो.....


तुला आण त्या वेचल्या तारकांची

तुला आण त्या जागणार्‍या फुलांची

लपेटून घे तू मला भोवताली

तुझी रेशमाची मिठी सैल झाली 

पहाटे पहाटे मला जाग आली.....


           सियाच्या मखमली बाहूमध्ये राघव स्वतःला पूर्ण लपेटून घेत, सियाच्या नाजूक ओठांवर त्याच्या प्रेमाची छाप सोडतो. थोड्याच वेळात ते दोघेही प्रेमाच्या हळुवार पावसात न्हावून निघतात..! दोघेही प्रेमाचा पाऊस पिऊन तृप्त झाले होते..., 'दोन देह ... एकच आत्मा ' असे सिया आणि राघव खऱ्या अर्थाने "दो दिल एक जान ❤️" झाले होते...!!


          आता सूर्याची किरणे खिडकीतून सियाला सतवू लागली होती. त्यामुळे तीला जाग आली. राघव तसाच शांत झोपलेला होता. सिया हळूच स्वतःला त्याच्या कुशीतून सोडवते आणि आवरायला घेते. आज पहिल्यांदाच राघवला जाग येते ते देवघरात वाजणाऱ्या टिनमनीच्या नादाने..! राघव उठून देवघराकडे वळतो. सिया एका हातात पूजेचे ताट घेऊन, दुसऱ्या हाताने टिनमनी हलवत, डोळे मिटलेले, ओल्या केसांना गुंडाळालेला टॉवेल, कपाळावर कुंकू.. आणि आरती म्हणताना तिच्या नाजूक गुलाबी ओठांची होणारी हालचाल हे सगळं तो दुरूनच त्याच्या डोळ्यांनी टिपून घेत होता.


          सियाची पुजाही आटोपली होती. ती देवापुढे दिवा ठेवत मागे वळते.., पुढे राघव तिच्या कडे एक टक बघत असलेला उभा असतो.


सिया: "काय??? असा काय बघतोय?? चल आवर लवकर.., मी चहा आणते!"


           राघव तिच्याकडे बघत एक स्माईल देतो आहे मानेनेच होकार देत आवरायला जातो. राघव अंघोळ करून त्याच आवरत असतो. इतक्यात सिया चहा घेऊन रूम मध्ये येते. सियान आज फिकट गुलाबी रंगाची जोर्जेडची साडी नेसली होती. साडीचा पदर तिने कमरेला खोचलेला होता. केसांना अजूनही टॉवेल बांधलेलाच होता, हातात चहाचा कप घेऊन ती आत येत होती. राघव मात्र तिच्या त्या सौंदर्याला बघून पुरता घायाळ झाला होता. ही तिच सिया आहे का?? असा प्रश्न हळूच त्याचा डोक्यात डोकावून गेला.


       सियाने राघवला चहाच कप दिला आणि ती बाजूला आरश्यापुढे जाऊन उभी झाली. राघव दुरूनच सगळं बघू लागला होता. आता सियाने केसांचा टॉवेल काढत केस झटक्याने मागे घेतले. तेच तिच्या केसातील पाण्याचे थेंब राघवच्या चेहऱ्यावर उडाले. त्या थेंबांच्या गार स्पर्श्याने राघव शहारला. सिया हळूच तिचे केस पुसू लागली होती. राघव तिच्या मागे येऊन उभा झाला. आणि आरश्यातून सियाकडे बघू लागला. राघवला असं बघून सियाही थोडी स्तब्ध झाली होती. राघव आता सियाच्या अजून जवळ येतो. हळूच त्याचे हात सियाच्या कमरेभोंवती गुंडाळात तो सियाला जवळ ओढतो. त्याचा चेहरा आता सियाच्या मानेजवळ होता. हात सियाच्या पोटाभोवती गुंडाळाले होते, सियाच्या ओल्या केसांचा गार स्पर्श त्याला हवा हवासा वाटतं होता. त्याने हळूच त्याची मान सियाच्या ओल्या केसांकडे वळवली. आणि एक दीर्घ श्वास घेत तिच्या मोकळ्या रेशमी केसांचा गंध त्याच्या श्वासात भरून घेतला.


         सियानेही तिचे डोळे घट्ट मिटून घेतले होते. आता राघवने सियाच्या पाठीवर पडलेले तिचे ते मोकळे केस त्याच्या हाताने हळूच बाजूला करत तिच्या खांद्यावर टाकले. सियाच्या गोऱ्यापान पाठीवर हळूच बोट फिरवत त्याने त्याचे ओठ तिच्या मानेवर टेकवले. सिया त्याच्या स्पर्शाने शहारून उठली. लगेच वळून तिने राघवला घट्ट मिठी मारली. राघवनेही सियाला खूप जवळ घेतलं होता. सिया राघवच्या मिठीत बंदिस्त झाली होती.

"राघव, तू मला सोडून कधीच दूर नाही ना जाणार??" सियाने हळूच राघवच्या कानात विचारले.


राघव : " नाही सिया..! कधीही नाही.., जोपर्यत या श्वासात श्वास आहे... तुझ्या पासून तुझा राघव कधीही दूर नाही जानार..!! सिया.., आय लव यू !!"


सिया : " आय लव यू टू राघव..!!"

   

       असं म्हणत ती पारत राघव च्या मिठीत गुंग होते...!!

(क्रमशः)


Rate this content
Log in

Similar marathi story from Romance