Poonam Wankar ( पूरवा )

Romance Fantasy

4  

Poonam Wankar ( पूरवा )

Romance Fantasy

दो दिल एक जान... (भाग सात)

दो दिल एक जान... (भाग सात)

5 mins
216


        सृष्टी रेडी होऊन दारात नीलची वाट बघत उभी असते. तिचे वडिलही तिथेच पोर्च मधे पुस्तक वाचत बसले होते. सृष्टीची आई तिच्या वडिलांना चहा देत सृष्टीकडे बघण्याचा इशारा करते. सृष्टी निल ची वाट बघत व्याकुळ झाली होती. तिची गंम्मत घेत तिचे वडील तिच्या आईला म्हणतात..., " अग शालिनी, किती वाजलेत ग??? चार वाजलेत का?? कुणीतरी वाट बघतंय कुणाचीतरी आतुरतेने...!!! जरा घडाळ्याचे काटे पुढे करतेस का?? नाही... म्हणजे लवकर चार वाजतील..!! अजून वीस मिनिटे बाकी आहेत ना.. म्हणून म्हटलं ग!!"

ते दोघेही हसायला लागतात ..

सृष्टी : " काय हो बाबा !! नका ना चिडवू... एक तर हा येत नाही लवकर... त्यात तुम्ही नका ना चिडवू मला!!

            इतक्यात हॉर्न वाजतो. निल आलाय म्हणून सृष्टी लगेच पळत सुटले... ' आई येते ग!!'.... म्हणतं ती गेट कडे निघते. " सावकाश ग बाळा.., सांभाळून जा...!!" तिचे आईबाबा मागून म्हणाले. सृष्टी गेट उघडून बाहेर पडते. आज निल बाईक वर आलेला होता. त्याने आज स्काय ब्लु कलरची जीन्स आणि त्यावर रेड कलरची टी शर्ट घातली होती. डोळ्यांवर गॉगल होते... आज तर तो जॉन अब्राहमच दिसत होता...! सृष्टी ही खूप सुंदर दिसत होती. तिने पिंक येल्लो कॉम्बिनेशन चा ड्रेस घातला होता. येल्लो जोर्जेड ची इम्बरोडरी केलेली ओढणी तिच्यावर फार खुलून दिसत होती. सायंकाळी सूर्यास्ताच्या वेळी आभाळात दिसणाऱ्या गुलाबी रंगाच्या छटा तिच्या ओठांवर विराजल्या होत्या. डोळ्यात घातलेल्या काजळामुळे तिचे डोळे आणखीनच खुलून दिसत होते. केस तिने मोकळेच सोडले होते. त्यात तिने लावलेले पर्फ्यूम मंद मंद दरवळत होतं. निल एकटक तिच्या कडे बघतच राहिला... आणि नेहमी प्रमाणे त्याच्या मनातले भाव त्याच्या ओठांवर आले...

                      कधी कधी तुला बघातांना

                          बघतच राहावं वाटतं

                    डोळ्यांच्या खिडकीतून उतरून

                          हृदयात शिरावं वाटतं

सृष्टी : " अरे.., काय हे?? चलायचं आहे की, इथेच थांबणार आहेस?? ... बाकी आज एकदम हॅण्डसम दिसतोय ...

निल : ( हसत )" काय ग, तू पण ना ?? मस्करी करतेस का माझी?? उलट तर तू खूप सुंदर दिसतेय... खूप गोड.. गुलाबाच्या फुलासारखी... ... चल निघू या..!! बस लवकर.. "

               सृष्टी आणि निल दोघेही फिरायला निघतात... शहराची गर्दी मागे सोडत दोघेही शांत असणाऱ्या वाटेवर निघतात. दोन्ही बाजूनी गर्द हिरवी झाडे... एका बाजूने डोंगर... लाजरी धामण पळताना तिच्या अंगावर पडणारी वळणे, तसाच सुंदर वळणदार रस्ता... आणि त्यावर पडलेली हिरवी सावली.. दोघांचही मन प्रफुल्लित करत होतं. त्या वळणदार वळणावर पळताना त्यांना दोघांनाही असंच काहीस पूर्वी घडल्या सारख वाटलं. त्यांना वाटलं की या आधी ही असं काही तरी कधी तरी घडलेलं आहे. पण दोघेही शांत होते . एकमेकांना सांगायला घाबरतात. निल आणि सृष्टी समुद्र किनारी पोहचतात.

 

              आज समुद्र सुद्धा उधाणलेला होता.. कदाचित त्याच्याही मनात कुणाविषयीच्या प्रेमाभावना उफाळून आल्या असतील असाच तो भासत होता. दोघेही निसर्ग प्रेमी, असल्यामुळे त्यांच्यात छानचं गप्पा रंगल्या होत्या. बराच वेळ इकडल्या तिकडल्या गोष्टी चालल्या. नंतर दोघेही उठून अनवानी पायाने वाळूवर चालू लागले.. इतक्यात समुद्रातून एक मोठी लाट विलांटी घेत त्यांच्या कडे धावत आली..., आणि त्यांच्या पर्यंत पोहचण्या आधीच तिची फेसाळ फुले होऊन त्यांच्या पायापाशी येऊन सांडली.. पाण्याचे उडालेले तुषार यामुळे दोघेही चिंब भिजून गेले होते. सूर्यही मावळतीला आला होता. सृष्टीच्या चेहऱ्यावर उडालेले पाण्याचे थेंब सूर्याच्या सोनेरी किराणाबरोबर मोत्यासारखे भासू लागले होते. निल एकटक तिच्या कडे बघत बसला होता. त्याला तिला कुशीत घ्यावसं वाटतं होतं.

सृष्टी : " निल..., काय रे.. काय झालं?? असा काय बघतोस??

निल : " सृष्टी.., मला आज तुला काहीतरी सांगायचं आहे. पण आधी मला एक वचन दे! की माझ्या बोलण्याने तू नाराज होणार नाहीस? आणि आपली मैत्री तू कधीही तोडणार नाहीस??

सृष्टी : " अरे..! वेडा आहेस का? तुझ्यासारखा मित्र तर शोधूनही सापडणार नाही..!! कितीही काहीही झालं ना, तरीही आपली मैत्री नाही रे कधीच तुटणार!!

            निल त्याच्या खिशातून एक रिंग काढतो, आणि टोंगळ्यावर बसून.., एक हात पुढे करत, दुसऱ्या हातात रिंग घेऊन तिला प्रपोज करतो..,

" सृष्टी.., मला तुझा तेथेस्कोप बनून आयुष्यभर तुझ्या गळ्याभोंवती राहायला आवडेल...!!  सांग ना?? बनवशिल मला...?? आयुष्यभरासाठी तुझा तेथेस्कोप ..??? "

            जे सृष्टी बोलणार होती ते सगळं नीलच्या ओठांवर आलं होती. ती खूप खुश झाली होती. तिचा चेहरा कमळाच्या फुलासारखा फुलून गेला होता. थोडंसं लाजत तिनेही तिचा हात पुढे करत नीलच्या हाती दिला आणि म्हणाली...,

                  "तू तेथेस्कोप हो माझा

                   मला तुझी लेखणी कर

             माझ्या मनाच्या प्रत्येक पानावर

                 तुझ्या प्रेमाची टिपणी कर "

               तिचा होकार ऐकून नीलच्या ओठांवर हास्य खुलत. तो तिच्या बोटात अंगठी घालतो आणि हळूच तिच्या बोटावर त्याचे ओठ टेकवतो. सृष्टीचे डोळे लाजने खाली झुकतात. तिचे गालही तिच्या ओठांसारखे गुलाबी होऊन जातात. निल सृष्टीची हनुवटी त्याच्या हाताने जराशी उचलतो. सृष्टी तिचे डोळे घट्ट मिटून घेते. आणि दोन्ही हाताने आपला चेहरा झाकून घेते. निल तिचे हात बाजूला करतो आणि म्हणतो..., " हा चंद्र माझा आहे. माझ्या हृदयाच्या आकाश्यात कायमचा स्थिरावलेला.. असा हाताने झाकुन या आकाश्याची शोभा घालवू नकोस ना!!"

                 सृष्टी एक सुंदर स्माईल देत हळूच त्याच्या कुशीत शिरते. निल तिला घट्ट जवळ घेतो. इतक्यात समुद्राच्या लाटा त्यांच्या पायाला येऊन स्पर्शून जातात. त्यांच्या तळव्यांना होणारा तो पाण्याचा स्पर्श त्यांना कशाची तरी आठवण करून देतो... समुद्राची गाज त्यांना कुठल्यातरी गोष्टीची आठवण करून देते.. पण नेमकी काय? हे दोघांनाही कळत नाही. दोघेही एकमेकांच्या डोळ्यात बघतात.. दोघांच्याही डोळ्यात असंख्य प्रश्न असतात..!! दोघांनाही एकमेकांना विचारायचं होतं..!! की आपण यापूर्वी असे भेटलोय का???? का दोघांच्याही ओठांवर शब्दच फुटत नाही. दोघेही एकमेकांचा हात हाती घेऊन परतीच्या दिशेने मनात असंख्य प्रश्न घेऊन चालायला लागतात...!!

               रात्री घरी आल्यावर निल फ्रेश होऊन झोपायला येतो. आज सृष्टी बरोबर घालविलेले क्षण त्याच्या मनाला सुखावत होते. झोपतानाही एक गोड स्माईल त्याच्या ओठांवर होती. तिकडे सृष्टी ची ही स्थिती अशीच होती. निल ने तिला प्रपोज केल्याची बातमी ती तिच्या घरी देते. घरीही सगळे खुश असतात. ती ही फ्रेश होऊन बेड वर येते... राहून राहून तिला निल बरोबर घालविलेले क्षण आठवतात. तीला डोळे बंद केले तरी निल आठवायचं.. झोपच लागत नव्हती.. ती रेडिओ ऑन करते... सुंदर गाणं वाजत असत..

             जाने क्या बात है, जाने क्या बात है

             नींद नहीं आती, बड़ी लम्बी रात है

             तिला तिचच हसायला येत आणि कधी तिचा डोळा लागतो तिच तिलाही कळत नाही .. आज रात्रभर ती नीलच्या कुशीत शांतपणे विसावली असते.

            रात्री सृष्टीच्या स्वप्नात ती कुणाला तरी पहाते.. एक उंचपुरा तरुण... एका खडकावर उभा.. नदीचा किनारा... ते खळखळून वाहणार पाणी.. पाण्यात पाय टाकून बसलेली एक तरुणी... आणि तो तरुण हाताने तिच्यावर पाणी उडवतो. ती लाजून हसते ... तो तिला मोठ्याने म्हणतो.., " तू खूप गोड हसतेस! " सृष्टी दचकून जागी होते. तिच्या कपाळावर घाम होता . ती उठून पाणी पिते. परत बेड वर जाऊन पडते. अजून उजाडायला बराच वेळ होता. आज समुद्र किनाऱ्यावर ही तिला काही तरी जाणवल्या सारखा झालं होतं. आणि आता हे स्वप्न?? तिला कळतच नव्हतं की हे असं काय?? कोण असावे ते दोघे?? असे असंख्य प्रश्न मनात घेऊन ती परत झोपी जाते.

खरंच काय असेल संबंध स्वप्नातील त्या दोघांचा सृष्टी च्या आयुष्याशी?? समुद्र किनारा आणि नदी किनारा यात असेल का काही संबंध..?? आणि निल चा काय संबंध असेल या साऱ्याशी??? हे पुढल्या भागात वाचायला विसरू नका..


Rate this content
Log in

Similar marathi story from Romance