Poonam Wankar ( पूरवा )

Romance Fantasy

4.0  

Poonam Wankar ( पूरवा )

Romance Fantasy

दो दिल एक जान.. ❤️ ( भाग नऊ )

दो दिल एक जान.. ❤️ ( भाग नऊ )

6 mins
272


         निल आणि सृष्टी मनात असंख्य प्रश्न घेऊन परत जातात. पाऊसही थांबला होता. घरची सगळी मंडळी हातात चहाचा कप घेऊन पावसाचा आनंद घेत होती. सगळ्यांच्या गप्पा मस्त रंगल्या होत्या. इतक्यात शालिनीच लक्ष दारात उभ्या असलेल्या निल आणि सृष्टीकडे जात.. " अरे निल...! सृष्टी!! मुलांनो किती भिजलात??? जा आत जाऊन ओले कपडे बदलवून घ्या.. नाहीतर उगाच सर्दी व्हायची!!" " हो आई.. आलोच! " असं म्हणतं ते दोघेही फ्रेश होऊन लगेच हॉल मध्ये येतात.

विश्वास : " किशोरराव उदयाला आमची माई येतेय.. तर आपण एंगेजमेंट ची तारीख फिक्स करून घेऊ या..!"

किशोर : " हो... हो!! काहीच हरकत नाही आमची. जमेल तितक्या लवकरची तारीख बघून उरकून घेऊ या!"😊

विश्वास : " अरे, मुलांनो तुम्ही सगळे शांत का बसलात?? बाहेर छान वातावरण झालंय! काही नाच गाणी होऊन जाऊ द्या ना तुमची!! निल मी तुमच्याबद्दल खूप ऐकलंय.. तुम्ही छान गाता असं ऐकलंय मी.. मग आज होऊन जाऊद्या की, आमच्याही साठी 😊"

निल : " हो नक्कीच!! पण सृष्टी तू सुद्धा मला साथ द्यायची आहेस.. बर का?? "

           

           असं म्हणतं निल त्याची गिटार ट्यून करतो. सृष्टी ही होकार देत त्याच्या बाजूने येऊन बसते...


ओल्या सांजवेळी, उन्हे सावलीस बिलगावी

तशी तू जवळी ये जरा

कोऱ्या कागदाची, कविता अन जशी व्हावी

तशी तू हलके बोल ना

आभाळ खाली झुके, पावलांखाली धुके

सुख हे नवे सलगी करे, का सांग ना

वळणावरी तुझ्या पाऊस मी उभा

ओंजळ तुझी पुन्हा वाहून जाऊ दे

डोळ्यातल्या सरी विसरून ये घरी

ओळख आता खरी होऊन जाऊ दे

सांभाळ तू माझे मला माझ्या नव्या फुला

मी सावली होऊन तुझी देईन साथ ही तुला

ओल्या सांजवेळी, उन्हे सावलीस बिलगावी

तशी तू जवळी ये जरा

कोऱ्या कागदाची, कविता अन जशी व्हावी

तशी तू हलके बोल ना


         सगळ्यांची मस्त एन्जॉयमेंट सुरु होती. रात्रभर गप्पा, गोष्टी, नाच गाणी.. सगळ्यांनी खूप एन्जॉय केल. रात्री उशीर झाल्यावर सगळे आपआपल्या खोलीत झोपायला गेले. निलला मात्र खूप अस्वस्थ वाटतं होत. तो बाहेर पोर्च मधे येऊन बसला होता. तिकडे सृष्टी ला ही दुपारी निल जे काही बोलून गेला होता त्यामुळे तिचही मन त्या विचाराने बेचैन झाल होत. ती देखील गॅलरीत फिरत होती. आज तिलाही काही केल्या झोप लागत नव्हती. इतक्यात तिचं लक्ष खाली पोर्च मधे बसलेल्या निलकडे जात. ती ही खाली येते. किचन मधे जाऊन मस्त दोन कॉफी बनवून बाहेर पोर्च मधे आणते. निल बाहेर आकाश्यात चंद्रा कडे टक लावून बघत बसला होता. सृष्टी तिथे आली तरीही त्याच तिच्याकडे लक्ष्यच जात नाही. सृष्टी त्याच्या बाजूने येऊन उभी राहते आणि म्हणते..,


ऐ चाँद बडा ही खुशनसीब हैं तू

हम जिस पर मरते हैं

वो तो तुझेही ताके जा राहा हैं.. 😊


        तिचे शब्द ऐकून निल तिच्याकडे बघतो.., " अरे, तू कधी आलीस? अरे वाह! कॉफी.. खरच याची गरज होती ग!" असं म्हणतं निल एक कप तिच्या हातून घेतो.

सृष्टी : " हो...! तू त्या चंद्राला निरखून बघत होतास ना.. तेव्हाच आले मी 😊"

निल : " माझाच चंद्र इतका गोड आहे, मग त्याला का बघू मी..!"

सृष्टी : " हो का..! पुरे हं..!😊😊.. निल.. काय विचार करतोय? "

निल : " सृष्टी.., मला तुला काहीतरी सांगायचं आहे. खूप दिवसांपासून विचार करतोय सांगण्याचा पण हिम्मत नाही ग झाली कधी.. खर तर तुला गमावण्याची भीती वाटली म्हणून नाही सांगू शकलो. "

सृष्टी : " काय रे! काय झालंय? आणि वेड्या मी तुझ्याशिवाय विचारही करू शकत नाही मग तुझ्यापासून दूर कशी रे जाणार?? खर तर मलाही तुला काही तरी सांगायचंय. तुला आठवते का तू मला माझ्या स्टोरी मधल्या गावा विषयी विचारलं होत?? निल मी तेव्हा तुला अर्धच सत्य सांगितलं.. खर तर ते गाव नेहमी मी स्वप्नात पाहिलंय. माझी माई म्हणते की, ते माझं पूर्वीच गाव आहे.. पण मी कसा विश्वास ठेऊ?? मला नाही रे काहीच कळत आहे. "

निल : " सृष्टी, तू हे खरं सांगतेस का?? अग तुला माहिती आहे का? सेम हेच गाव, मी ही बऱ्याचदा माझ्या स्वप्नात पाहिलंय. तुझी स्टोरी वाचली तेव्हा तर असं वाटल की त्या स्टोरीचा नायकच मी आहो की काय?? त्यातले प्रसंग, व्यक्ती सगळेच मला माझें असल्यासारखे वाटतं होते.. का माहिती नाही? पण माझं काहीतरी नातं असल्यासारखं वाटतं होत ग मलाही! "

सृष्टी : " निल.., तू मघाशी असं का म्हणालास.., की तू माझ्यासाठी पुन्हा जन्म घेतलाय ते?? "

निल : " मला नाही ग माहिती... पण अगदी सहजपणे निघालं माझ्याही तोंडून.. मलाच माझं कळलं नाही. "(निल सृष्टीचा हात हाती घेतो आणि म्हणतो )" सृष्टी.. मला माहिती नाही पुनर्जन्म असतो की नाही ते..?? पण ना तुला भेटल्यापासून सारख असं वाटतंय की, यापूर्वीही मी तुझ्याबरोबर जगलोय काही क्षण... आणि कदाचित काही राहिलेले जगण्यासाठी पुन्हा नव्याने जन्म घेतलाय की काय?? "

सृष्टी : " ( निलच्या खांद्यावर डोकं टेकवत ) खरच निल मलाही असच वाटतंय रे..! तुझ्या बरोबर असले की मला कशाचीही गरज वाटतं नाही. असं वाटतं की, गेल्या कित्येक जन्मापासून आपण असच एकमेकांच्या सोबत आहोत. आणि निल.., या फुललेल्या रातराणीच्या फुलांचा सुगंध देखील मला माझाच वाटतोय. असं वाटतं आहे की, या पूर्वीही ही अशी बहरलेली वेल मी पाहिली आहे.. तिला माझ्या केसात माळलं आहे. "

               बराच वेळ दोघांच्या गप्पा चालल्या होत्या. रात्रही बरीच झाली होती. दोघेही त्यांच्या त्यांच्या खोलीत जाऊन झोपी जातात. सकाळी आई निलला येऊन हाक मारते तेव्हा त्याला जाग येते. तो फ्रेश होऊन खाली येतो. सृष्टी ही फ्रेश होऊन रेडी झालेली असते. सृष्टी आणि चिनू कुठल्यातरी देवळात जायला निघाल्या होत्या. थोड्याच वेळात माई देखील तिथे पोहचणार होत्या. त्यामुळे त्यांना लवकर जाऊन परत यायच होत. निल सुद्धा त्यांच्या बरोबर जायला निघतो. परत येताना मात्र निलच्या गाडीचा टायर पंचर होतो. त्यामुळे निल सृष्टी आणि चिनू ला घ्यायला त्यांच्या ड्राइव्हर ला बोलावून घेतो. आणि तो त्याची गाडी पंचर काढायला गॅरेज मधे घेऊन जातो. सृष्टी आणि चिनू घरी पोहचतात तोपर्यंत माई देखील येऊन पोहचलेल्या होत्या. माई ला बघून सृष्टी धावत जाऊन तिला मिठी मारते आणि विचारते, " माई तू नीट पोहचलीस ना ग? वाटेत काही त्रास तर नाही ना झाला तुला? " " नाही ग चिमणे.., मी बरी आहे.. काही त्रास बीस नाही हो झाला!! आणि हे काय तुम्ही दोघीच आल्यात?? निल कुठे आहेत?? मला बघू तरी देत माझा नातजावई 😊? " माई म्हणाल्या.

चिनू : " अहो माई, दादा पंचर काढायला गेलाय.. येईल थोड्या वेळात.. 😊"

सृष्टी : " हो..! येतोय तो मागणं. तू पोहचली असणार म्हणून आम्ही दोघी येऊन गेलो ड्रायव्हर बरोबर. काय ग माई..तू काल हवी होतीस ना ग!! आम्ही खूप धमाल केली..!😊"

चिनू : " हो ना माई! तुम्हाला पण पावसात भिजता आलं असतं ना मग 😄( सृष्टी ला चिडवत )"

सृष्टी :" (लाजत ) काय ग चिनू.. ☺️ "

             तिघीही हसायला लागतात. इतक्यात गाडीचा हॉर्न वाजतो. " दादा आलाय 😊" चिनू माईला म्हणाली. निल कार पार्क करतो आणि आत येतो. आणि माईच्या पुढे येऊन उभा राहतो, निल ला बघून माई अवाक होतात. त्यांचा त्यांच्या डोळ्यावर विश्वासच बसत नव्हता " नमस्कार करतो हं माई!" असं म्हणतं तो वाकून नमस्कार करतो. माई एकटक निल कडे बघते आणि म्हणते..., " राघवा.., तू परत आलास??( सृष्टी कडे बघत ) अग सिया.., बघ तुझा राघव आलाय ग! अरे विश्वास.. बघा रे मुलांनो.. मी म्हणाले होते ना?? राघव परत येणार... सिया साठी परत येणार...!! आलाय बघा.. नियतीने पुन्हा एकदा तुम्हा दोघांना एकमेकांसमोर आणलंय बाळांनो!!"

            माईचे डोळे आनंदाने पाणावले होते. पण माई असं का बोलत आहेत हे निल आणि त्याच्या घरच्यांना कळतं नव्हतं. सगळे शांत झाले होते. माईच्या डोळ्यातून आसवे वाहत होती. निल आणि सृष्टी एकमेकांकडे बघत उभे होते. त्यांना काहीच कळत नव्हतं.

कोण असेल हा राघव?? सिया आणि राघव म्हणजे नक्की कोण होते?? काय संबंध त्यांचा निल आणि सृष्टीशी?? हे जाणण्यासाठी पुढचा भाग नक्की वाचायला विसरू नका 😊..


Rate this content
Log in

Similar marathi story from Romance