Poonam Wankar ( पूरवा )

Romance Fantasy

3  

Poonam Wankar ( पूरवा )

Romance Fantasy

दो दिल एक जान - भाग दहा

दो दिल एक जान - भाग दहा

5 mins
197


      माईचं बोलणं ऐकून सगळे एकदम शांत होऊन जातात. निलला तर काहीच कळत नाही की, माई अस का म्हणाली असेल?? राघव आणि सिया कोण असावे... त्याला काहीही कळत नव्हते. निल चे आई बाबा, चिनू यांच्या देखील सगळं समजण्यापलीकडे होतं.

सृष्टी : " अग माई.., हे काय बोलतेस तू?? अग हा निल आहे.

तू ये जरा शांत बस बघू!!"

           सगळे माईला बसवतात. सुधा माई साठी पाणी आणते. सगळे माईच्या भवती बसतात.

किशोर : " माई तुम्ही निल ला राघव का म्हणाल्या?? कोण आहेत हे राघव आणि सिया?? "

सुधा : "निल नेहमी त्याला पडणाऱ्या स्वप्नांबद्दल सांगतो. लहान असताना एकदा झोपेत तो ' सिया.. सिया..' अस ओरडला होता. पण तो लहान असल्यामुळे एखाद्या शाळेतल्या मैत्रिणीच नाव घेऊन ओरडला असेल, अस वाटलं तेव्हा आम्हाला. त्याच्या स्वप्नांच आम्ही फारसं काही मनावर घेतलं नाही कधी. "

शालिनी : " सुधा ताई, माझ्या सृष्टीला देखील अशीच काहीशी स्वप्न येतात. माई त्याचा संबंध तिच्या यांच्या आईच्या आयुष्याशी जोडतात. पण आम्ही ही इतक लक्ष नाही दिल कधी. "

विश्वास : " हो सुधाताई.., आज आम्ही सुद्धा तुमच्या इतकेच कोड्यात पडलोय. विश्वासराव, राघव आणि सिया म्हणजे माझे आई वडील. माई माझी आजी, माझी आई सिया तिची मुलगी. माझ्या जन्मापूर्वी माझे वडील गेले आणि जन्माचे वेळी माझी आई. या माईनेच मला लहानाच मोठं केल. मी माझ्या आईवडिलांना कधी पाहू शकलो नाही. पण माईने कधीच पोरकं असल्याची जाणीव सुद्धा भासू दिली नाही मला. "

किशोर : " माई, तुम्ही दमला असाल. जाऊन थोडा आराम करा तुम्ही. या विषयावर आपण आरामात बोलू या. सृष्टी.. बाळा माई ला आत खोलीत घेऊन जा. त्यांना जरा वेळ पडू देत. बर वाटेल त्यांना. "


              सृष्टी माईला आत खोलीत घेऊन जाते. निलला सुद्धा हे काय आहे काहीच कळत नव्हतं. त्याचा आणि राघवचा काय संबंध हे जाणून घेण्यासाठी तो खूप आतुर झाला होता. तो आणि सृष्टी दोघेही आता माई कडून सगळ ऐकण्याची वाट बघत बसले होते. सगळ्यांच्याच मनात सिया आणि राघव वरून बरेच प्रश्न निर्माण झाले होते. दुपारचे जेवण आटोपून सगळे हॉल मधे येऊन बसतात. निल माईला म्हणतो, " माई.. मघाशी तुम्ही मला राघव अशी हाक का मारली?? माझा आणि सृष्टीचा काय संबंध त्या दोघांशी?? " " सांगते.. सगळं अगदी सुरवातीपासून सांगते. " माई म्हणाली. आणि माई सगळ्यांनाच पन्नास वर्ष मागे भूतकाळात घेऊन जाते.


                  मुसळधार पाऊस कोसळत होता. रस्त्यांवर सगळीकडे पाणीच पाणी साचलेलं होत. पावसाचे थेंब इतके टपोरे होते की डोळे उघडनेही कठीण झाल होत. संध्याकाळ व्हायला आली होती मात्र पाऊस काही थांबायचं नावच घेत नव्हता. कॉलेज सुटूनही बराच वेळ झाला होता, त्यामुळे आता इथे थांबण सिया ला शक्य नव्हतं. म्हणून ती तिची सायकल घेऊन घरा कडे निघाली होती. पावसामुळे रस्त्यापलीकडल काहीच दिसत नव्हतं.. सगळं काही धूसर झाल होत. रस्त्याच्या काठाला राघव त्याची बाईक बंद पडल्या मुळे थांबला होता. इतक्यात रस्त्यावरील खड्यात सियाच्या सायकल च चाक फसत आणि ती राघव च्या अंगावर जाऊन आदळते. खाली राघव, त्यावर सिया आणि त्याच्यावर तिची सायकल. तिघेही जोरात आदळतात. काळे काळे टपोरे डोळे, लांब लांब काळे केस, कमळाच्या पाकळयांसारखे नाजूक सुंदर ओठ, राघव एक टक तिलाच बघत होता. तस तर यापूर्वी अनेकदा तो सियाला बघायचा पण आज ती काही जास्तच सुंदर दिसत होती. सियाला सायकल मुळे उठता येत नव्हतं. ती राघवला म्हणते, " काय रे, कधी बघितलं नाहीस का? असा काय बघतोय? उचल ना मला.. उठू शकत नाही आहे ना मी! आणि काय रे? तुला हिच जागा मिळाली होती का थांबायला?? तुझ्यामुळे पडले ना मी!!"😠

राघव : " माझ्या मुळे?? 🤔.. अग पण मी तर काठाणे उभा होतो ना?? तुला दिसलो नाही का?? स्वतःला नीट चालवता येत नाही.. उगाच माझ्यावर आरोप करतेस. "😏😏

सिया : " हो हो तुझ्याच मुळे 😡 माझं लक्ष गेलं तुझ्या कडे म्हणून माझा तोल गेला.. आणि म्हणून मी पडले. "

राघव : " अग मग कशाला पाहिलं माझ्या कडे? पुढे बघायचं ना?? इतकंही कळतं नाही का तुला??

सिया : " आता असाच बोलत बसणार आहेस की, उठवणार आहेस मला?? 😠😠( सिया रागाने म्हणाली )

राघव : " अरे वाह!! हे तर कमालच आहे ना 🙄.. म्हणजे स्वतः चुकायचं आणि दोष मात्र मला?? 🤔"

सिया : " आता उठवणार आहेस की भाषण देणार आहेस?? 😠"


              राघव खाली असल्यामुळे नीट उठू शकत नव्हता. तो कसातरी एक हात वर काढण्याचा प्रयत्न करून सायकल बाजूला धकावतो. त्या नंतर सिया उठून उभी झाली . राघवच्या हाताला रस्त्यावर असलेले दगड लागून थोडी जखम झाली होती. सिया तिच्या स्कार्फ ने ती जखम पुसते आणि रागातच त्याला 'थँक्यू' म्हणतं, तिची सायकल घेऊन तिथून निघून जाते. राघव मात्र आज सियाचं रूप बघून पुरता घायाळ झाला होता.


           ' कोटेश्वर ' नावाचं एक छोटंसं गाव. गावाच्या दोन्ही बाजूनी गर्द हिरवी झाडे, मोठाले डोंगर, गावाच्या बाजूने नागमोडी वाहणारी सुंदर नदी, गावाच्या सुरावतीलाच असलेलं शंकराच एक हेमाडपंथी देऊळ, आणि वळणदार रस्ते गावाची शोभा वाढवत होते. त्याच गावात एकदा पुरात एक बाळ पाण्यात वाहून येताना एका व्यक्तीला दिसत. तो त्या बाळाला वाचवतो आणि त्याला सुखरूप एका अनाथालयात सोडतो. तो मुलगा म्हणजेच राघव. कोण कुठला हा मुलगा? पन गावातील लोकांना फार जीव लावायचा. स्वतःच्या जिद्दी ने आणि मेहनतीने तो शिकून मोठा होतो. त्याला संगीताची फार आवड. त्यामुळे संगीतात विशारद होऊन तो त्याचा गायनाचा छंद जोपासात एका शाळेला संगीत शिक्षक म्हणून रुजू होतो. राघवला त्याचे आई वडील तर माहिती नव्हते.. पण या गावाने, तिथल्या लोकांनी त्याला कधीच पोरक वाटू दिल नाही. त्यामुळे तो सगळ्यांना वाटेल ती मदत करायचा.. भजन किंवा एखाद्या समारंभात देखील मोठ्या आवडीने गाणे गायचा. लोक त्याचा आवज ऐकायला उत्सुक असायचे.


             त्याला पुराच्या पाण्यातून वाचवणारी व्यक्ती म्हणजे सियाचे वडील. ते फॉरेस्ट डिपार्टमेंट ला ऑफिसर म्हणून कार्यरत होते. तर सियाची आई शिक्षिका होती. सिया त्यांची एकुलती एक मुलगी. घरी पाहणार कोणी नसल्याने ते सियाला लहान असताना पाळणाघरात ठेवायचे. त्यामुळे ते राघवला ते त्यांच्या घरी आणू शकत नव्हते, म्हणून त्यांनी त्याला अनाथ आश्रमात सोडले होते. मात्र हे दोघेही राघवच सगळं करायचे. सियाची आई देखील राघवला काय हवं नको प्रेमाने बघायची. सिया आणि राघव एकत्रच लहानाचे मोठे झाले. आपले आई बाबा राघवचेही लाड करतात म्हणून ती सतत त्याच्याशी भांडत असायची. त्यांची जोडी पूर्ण गावात टॉम अँड जेरीची जोडी म्हणून फेमस होती. मात्र तरी त्यांचं एकमेकांशिवाय पान हलायचं नाही. राघव नुकताच शाळेत रुजू झाला होता, तर सिया पदवीच्या शेवटल्या वर्षाला होती.


सिया दिसायलाही खूप सुंदर होती. एखाद्या जुन्या चित्रपटातील नायिकेसारखीच. उंच सडपातळ बांधा. कमरेच्या खाली ओघळणारे तिचे लांब काळे केस. चाफ्याच्या कळी सारखं सुंदर अस तिचं हास्य होतं. कुणाच्याही नजरेत भरेल अशीच सुंदर होती ती. त्यामुळे कॉलेज मधे किंवा रस्त्यावर जर कधी कुणी तिची छेड काढली तर ती येऊन राघवला सांगायची. आणि मग राघव त्या मुलांचे हात पाय मोडे पर्यंत पिटाई करायचा. त्यामुळे कोणीही तिच्या वाटेला जाण्याचा विचार सुद्धा करीत नव्हते. राघव देखील उंच पुरा, सावळा वर्ण पण, कसरत करून मिळवलेली पिळदार यष्टी त्यामुळे खूप देखणा दिसायचा. त्याचे डोळे खूप बोलके होते. आणि त्याचा आवाज... सगळे त्याच्या आवाजाच्या प्रेमात होते. असे हे सिया आणि राघव.


Rate this content
Log in

Similar marathi story from Romance