Poonam Wankar ( पूरवा )

Romance Fantasy

4.0  

Poonam Wankar ( पूरवा )

Romance Fantasy

दो दिल एक जान ❤️( भाग चौदा )

दो दिल एक जान ❤️( भाग चौदा )

6 mins
174


 शेखर च बोलणं ऐकून सियाचे आई बाबा जरा विचारातच पडतात. राघव आणि सिया एकमेकांच्या प्रेमात तर नाहीत ना? आता त्यांना हे जाणून घेणं जास्त महत्वाचं वाटू लागलं होतं. शेखर निघणारच इतक्यात सिया घरी येऊन पोहचते.


सिया : "अरे, शेखर तू इथे?"

    

        शेखर काही बोलणार इतक्यात सियाचे बाबाच मध्ये बोलतात. "अग सिया, मीच बोलावून घेतलं होतं त्याला. त्याच्या ओळखीतल एक चांगल स्थळ आहे. तुझ्यासाठी विचार करतोय आम्ही त्याचा. म्हणजे कस..., तुझं आणि राघवच दोघांचही लग्न एका पाठोपाठ एक उरकवून देऊ. म्हणजे आम्ही दोघे मोकळे." शेखरला काही कळतच नाही. सियाचे बाबा असं काय हे नवीनच मध्ये बोलले त्याच्या ते समजण्याच्या पलीकडे होत. फार विचार न करता तो तिथून जाणेच योग्य समजतो आणि सियाला बाय करत निघून जातो. सिया मात्र काहीही प्रतिसाद न देता शांत पणे तिच्या खोलीत निघून जाते. खर तर तिला नेमक काय होतय हे तिलाही तिच कळत नव्हतं. मात्र तिची ती अवस्था बघून तिचे आई बाबा समजून चुकले होते की सिया नक्कीच प्रेमात पडली आहे.


       पण आता त्यांच्या पुढे प्रश्न होता तो राघवचा. कारण जे सियाच्या मनात आहे तेच राघवच्याही मनात आहे की नाही हे त्यांना जाणून घ्यायचं होतं. कारण प्रेम दोन्ही बाजूने असायला हवं तरच कुठलंही नातं आनंदाने पुढे जाईल असं त्यांना वाटायचं. रात्री सियाचे आईबाबा राघवला घरीच जेवायला बोलावून घेतात. राघव घरी पोहचतो. आईने आज राघवच्या आवडीचेच पदार्थ बनवले होते. पण नेहमी राघव जसा आनंदी व्हायचा तसा तो आज दिसत नव्हता. तो खूप शांत झाला होता. सिया सुद्धा काहीच न बोलता चुपचाच जेवण करत होती. एरव्ही दोघेही फार भांडायची... अगदी जेवताना सुद्धा एकमेकांच हिसकावून खायची. मात्र आज सगळीकडे शांतता पसरली होती.


      दोघांनाही बोलत करण्यासाठी आता आईच मध्ये बोलते, "अरे राघवा, आपल्या सिया साठी पण एक छान स्थळ सांगून आलाय बर का! आता तुमच्या दोघांचही लग्न एकत्रच लावून देऊ या.. काय म्हणतोस?" हे ऐकताच राघवच्या हातून घास खाली पडतो. त्याला जोरात ठसका लागतो. त्याच्या डोळयांतून पाणी वाहायला लागत. त्याची ती अवस्था बघून सिया लगेच उठते. त्याला पाणी देते, त्याच्या पाठीवरून प्रेमाने हात फिरवू लागते, " अरे हळू, काय करतोय? सावकाश खा ना!" सियाचे हे काळजीचे स्वर आईबाबाना सगळं काही सांगून जातात. राघवच्या डोळयांतून वाहणार पाणी देखील ठसका लागल्याने नाही तर सिया कदाचित आपल्या पासून कायमची दूर होईल या जाणीवेने वाहतंय हे ही ते दोघे समजून चुकले

होते.


           ही मुले काहीच का बोलत नाहीत या गोष्टीचा आई बाबा विचार करू लागले होते. कारण दोघेही एकमेकांवर जीवापाड प्रेम करतात हे तर त्यांच्या आसवानी कधीच सांगून दिल होतं. पण त्यांचे शब्द मात्र अजूनही मुकेच होते. रात्री बराच वेळ राघव आणि सियालाही झोप लागत नव्हती. दोघांचीही अवस्था सारखीच. राघव त्याच्या खोलीत डोक्याखली दोन्ही हात घेऊन एक टक गरगरणाऱ्या फॅन कडे नुसताच बघत होता. आणि तिकडे सिया तिच्या खोलीत उगाचच या इकडून तिकडे कूस बदलत पडून होती. दोघांचाही डोळा काही लागेना. बराच वेळ तसंच पडून राहिल्या नंतर राघव उठतो आणि खिडकीशी जाऊन उभा राहतो. तेच त्याच लक्ष सियाच्या बाल्कनी कडे जातं. बघतो तर सिया सुद्धा एकटक चंद्रा कडे बघत उभी असलेली त्याला दिसते. तिच्या डोळयातून ओघळणारी आसवे चंद्राच्या प्रकाश्यात स्पष्ट दिसून पडतं होती. राघवचही मन आतल्या आत तुटत होतं, रडू लागलं होतं..., असंख्य वेदना त्याच्या मनाला जाणवू लागल्या होत्या.., जणू काही ते आकांत करू लागलं होतं...


पेटलं आभाळ सार पेटला हा प्राण रे

उठला हा जाळ आतून करपल रान रे

उजळ्तांना जळून गेलो राहील ना भान

डोळ्यातल्या पाण्याने हि विजेना तहान..

दूर दूर चालली आज माझी सावली

दूर दूर चालली आज माझी सावली

कशी सांज ही उरी गोठली

उरलो, हरलो, दुःख झाले सोबती

उरलो हरलो दुखः झाले सोबती....!!!


        स्वतःच्या आसवांना लपवत तो परत आत जातो. इतक्यात सियाचं लक्ष त्याच्या कडे जाते. राघव डोळे पुसताना तिला दिसतो. ती हात लांब करून त्याला थांबावण्याचा प्रयत्न करते पण तिला समजून चुकत की हा प्रयत्न व्यर्थ आहे. दोघेही असह्य होते. त्याच्या पाठमोऱ्या शरीराकडे ती नुसतीच बघत उभी राहते... तिचीही आसवे आक्रंद करू लागली होती...


ना भरोसा ना दिलासा कोणता केला गुन्हा

जिंकुनीही खेळ सारा हारते मी का पुन्हा

त्रास लाखो, भास लाखो, कोणते मानू खरे

कोरड्या त्या पावसाचे ह्या मनावर का चरे

समजावते या मना, समजावते मी या मना

तरी आसवे का वाहती 

उरले हरले दुःख झाले सोबती 

उरले हरले दुःख झाले सोबती....!!!


        मनातल्या भावानांना मनातच तिलांजली देत दोघेही आत निघून जातात. दुसऱ्या दिवशी सकाळी फार उशीर होऊनही सिया उठलेली नव्हती. त्यामुळे आई तिच्या खोलीकडे जाते आणि सियाला आवाज देऊ लागते. मात्र आतून काहीही प्रतिसाद येत नाही. त्यामुळे आई हळूच दार ढकलते. दार उघडत, सिया अजूनही झोपलेलीच होती. आई परत तिला आवाज देते. मात्र सिया काहीच बोलत नाही. म्हणून आई तिला हात लावून उठवते बघते तर काय.. सिया तापाने फणफणलेली होती. सियाचे बाबा सुद्धा सकाळीच बाहेर निघून गेले होते. आई लगेच राघवला हाक देते, "राघवा, अरे लवकर ये. बघ सिया बेशुद्ध झालीये. तापाने फणफणतेय नुसती."


         आईचा आवाज ऐकताच राघव धावत तिथे पोहचतो. सियाला बघून त्याच्या डोळयांतून आसवे गळायला लागतात. तो लगेच मित्राला सांगून डॉक्टरांना घेऊन यायला सांगतो आणि थंड पाण्याच्या पट्ट्या सियाच्या कपाळावर ठेवायला सुरु करतो. डॉक्टर येतात सियाला तपासून तिला इंजेक्शन लावतात आणि काही औषध लिहून देतात.


राघव : " डॉक्टर, काय झालंय माझ्या सियाला? "


डॉक्टर : " अरे काही घाबरण्या सारखं नाही. कसलं तरी टेन्शन घेतलंय तिने. तिची झोप नीट झाली की वाटेल तिला बर. काळजी घ्या. Ok!"


           राघव अजूनही सियाच्या शेजारीच बसून होता. तिचा हात हातात घेऊन राघव म्हणतो, " ए सिया, उठ ना ग! असं करणार का वेडे तू? तूला काही झालं तर मी कसा जगू? "


           राघवच हे बोलणं सियाचे आई बाबा दारा बाहेरूनच ऐकतात. आता दोघांनाही खात्री पटली होती की सिया आणि राघव एकमेकांच्या प्रेमात आहेत. इतक्यात सियाला जाग येते. राघवला समोर बघून तिला खूप बर वाटत. पण लगेच काहीतरी आठवून तिच मन दुःखी होतं. आता आई बाबाही आत येतात. बाबा सियाच्या उश्याशी बसतात. तिच्या कपाळावरून हात फिरवतात, " कस वाटतंय बाळा आता? "

सिया मानेनेच 'बरं वाटतंय' असं कळवते. राघव तिथून उठून बाहेर जायला लागतो...


बाबा : " राघवा, थांबा! कुठे चाललास? "


राघव : " काही नाही काका जरा येतो बाहेरून. "


बाबा : " जरा बस इथे. आम्हा दोघांना तुम्हा दोघांशी जरा बोलायच आहे. "


राघव : "काय काका? बोला ना?"


बाबा : " राघव, सिया... बरेच दिवस झाले आम्ही बघतोय तुम्ही दोघेही काहीतरी विचारात दिसताय. दोघांच्याही मनात काही तरी आहे पण तुम्ही दोघेही मन मोकळेपणाने आमच्याशी बोलत नाही आहात. आम्ही एवढे परके आहोत का तुमच्यासाठी? "


सिया : " बाबा असं का बोलत आहात तुम्ही? असं नाही काहीच. "


राघव : " हो काका सिया बरॊबर बोलतेय असं नाही काहीच. आणि तुम्ही आणि काकूने मला नवं आयुष्य दिलंय मग तुम्ही परके कसे मला. तुम्ही माझे सगळं काही आहात. तुमच्याशिवाय माझ्या आयुष्यात आहे तरी काय आणखी? "


आई :" हो ना!! मग इतकी मोठी गोष्ट तुम्ही दोघांनीही आम्हाला सांगन महत्वाचं नाही का समजलं. तुम्ही बोलत नसाल तरी तुमच्या डोळ्यात दिसतय की तुम्ही दोघेही एकमेकांच्या प्रेमात आहात. आम्हाला सांगावस नाही का वाटलं तुम्हाला? "


बाबा : " राघवा तुझ्या सारखा जोडीदार आमच्या सियाच्या आयुष्यात असेल तर आम्हीही सुखाने डोळे मिटण्यासाठी निश्चिन्त होऊ. "


राघव : " अहो काका!!"


सिया : " बाबा असं नका न बोलू. आम्हला हवे आहात तुम्ही दोघे. खर तर आम्हालाही कळलं नाही आम्ही कधी असे एकमेकांत गुंतलो ते. "


बाबा : ( राघवचा हात धरून )" राघवा... देशील ना साथ माझ्या लेकीला? "


राघव : " काका, काकू... सिया माझं आयुष्य आहे. श्वास आहे ती माझा. तिच्याशिवाय मी जगूच शकत नाही. मी वचन देतो, माझ्या शेवटल्या श्वासापर्यंत तिची साथ सोडणार नाही. माझ्या जिवापेक्षाही जास्त काळजी घेईल मी सियाची. "


           आईबाबा सिया आणि राघवचा हात एकमेकांच्या हाती देतात. सिया आणि राघवच्या डोळयांतून आताही अश्रू ओघळत होते. पण हे आनंदाचे होते.


सिया आणि राघवच नवं आयुष्य कस असेल? देतील का एकमेकांना दोघेही साथ? हे जाणण्यासाठी पुढला भाग नक्की वाचा.



Rate this content
Log in

Similar marathi story from Romance