Poonam Wankar ( पूरवा )

Romance Fantasy

4  

Poonam Wankar ( पूरवा )

Romance Fantasy

दो दिल एक जान.. ( भाग चार )

दो दिल एक जान.. ( भाग चार )

5 mins
285


        रात्री उशिरा निलचा डोळा कधी लागला त्याच त्याला कळलं नाही. रूम मधे एसी सुरु असून सुद्धा त्याच्या अंगाला घाम फुटला होता. त्याच्या घश्याला कोरड पडली होती. तो खूप अस्वस्थ होतं होता. त्याला स्वप्नात काही तरी वेगळच दिसत होतं. पुसटश्या सवल्या त्याला दिसत होत्या. कुठलंस दगडी देऊळ रस्त्याच्या वळणावर दिसत होतं. देवळाच्या शेजारी मोठं वडाच झाड होतं. त्याच्या पारंब्या देवळाच्या भिंतीवर उतरल्या होत्या. देवळात सुरु असलेला एकसारखा घंटेचा नाद ' टण.. टण... टण... ' कानावर पडत होता. एक तरुण बाईक वरून रस्त्याने जात होता. अचानक एक कुत्र्याचं पिल्लू बाईक समोर येत. त्या पिल्लाला वाचवण्याच्या प्रयत्नात तो जोराने ब्रेक दाबतो. गाडी वेगात असल्याने ती दूर पर्यंत फरफटत जाऊन त्या वडाच्या झाडावर आदळते. तो तरुण गाडी वरून फेकला जातो थेट त्या देवळाच्या पायरीवर. त्याच्या डोक्याला जबर दुखापत होऊन तो रक्ताच्या थारोळ्यात निपाचित पडलेला असतो.

            

               इतक्यात निल दचकून जागा झाला . त्याचं अंग घामाने भिजलं होतं. त्याचा श्वास फुलून आला होता. 'हे असं का दिसलं असेल???' तो विचार करू लागला . ते देऊळ, ते वडाच झाड त्याला कुठे तरी पाहिल्यासारखं वाटत होतं. पण कधी ते त्याला आठवत नव्हतं. निल मोबाईल बघतो.. सकाळचे पाच वाजले होते. तो उठून फ्रेश होतो आणि मॉर्निंग वॉक ला निघतो.

             आज वातावरण जरा ढगाळ होतं. गार वारा हळूच अंगाला स्पर्शून जात होता . रस्त्याच्या दोन्ही बाजूने एका ओळीत उभी असलेली चाफ्याची झाड खूप सुंदर दिसत होती. त्यात चाफ्याच्या फुलांचा गंध वाऱ्याशी एकरूप झाला होता. सूर्याच्या किरणाने पान पान चमकत होतं.

             निल आज नेहमी पेक्षा जरा लांब एका जोगर्स पार्क ला आला होता. तो पार्क मधे जातो आणि वॉर्मअप करायला लागतो. इतक्यात मागून आवाज येतो..., " हॅलो.. मिस्टर निल!!! " निल मागे वळून बघतो... परत बघतो!!! त्याचा त्याच्या डोळ्यांवर विश्वासच बसत नव्हता. तो स्वतःच स्वतःच्या हाताला चिमटा काढतो..., " मी स्वप्नात आहो का?? " निल तोंडातल्या तोंडात बोलतो.

" अहो! नाही!! तुम्ही स्वप्नात नाहीत!! सृष्टी म्हणाली.

निल : "डॉ. सृष्टी, तुम्ही इथे?? "( निल आश्चर्याने म्हणाला )

सृष्टी: " अहो! मी रोजच इथे येते. तुम्ही पहिल्यांदा दिसताहेत! याआधी कधी पाहिलं नाही तुम्हाला इथे? "

निल : " हो मी पहिल्यांदाच आलोय इथे! इथून जवळच आमची सोसायटी आहे. आज वातावरण जरा शांत होतं त्यामुळे जरा दूरवर आलोय. तुम्ही इथे?? "

सृष्टी : " मी इथे समोरच एका अपार्टमेंटला राहते. वर्ष झालंय इथे येऊन."

निल : " तुम्हाला माझ नाव कस माहित? "

सृष्टी : " अहो! कालच सांगितलं ना! मला आवडतं वाचायला. तुम्हाला वाचत असते मी. तुमच्या प्रोफाइल ला तुमचा फोटो पाहिलाय. त्यामुळे ओळखलं तुम्हाला. "

निल : " एक मिनिट...! काल सकाळी मी एक कमेंट वाचली माझ्या पोस्ट वर... सृष्टी..... तुम्हीच आहात का?? "

सृष्टी : " हो.., मीच. 'Reading is my Oxygen' त्यातूनच काही अनुभव लिहायला लागले. "

निल : " तुम्ही खूप सुंदर लिहिता. मला तुमचे लेख वाचायला खूप आवडतं. खूप पॉजिटीव्ह वाटत. दिवस अगदी फ्रेश जातो. "

सृष्टी : " असं काही नाही... जे वाटत मनाला ते कागदावर उतरवण्याचा प्रयत्न करत असते. आणखी काही नाही. चला, उशीर होतोय निघते मी. "

            निल तिला बाय करतो. सृष्टी त्याच्या दृष्टी आड जात पर्यंत तो तिथेच उभा राहून तिच्या पाठमोऱ्या शरीराकडे बघत असतो. निल घरी पोहचतो. त्याचा चेहरा खूप प्रसन्न दिसत होता. अंगणात स्किपिंग करणाऱ्या चिनू बरोबर तो ही जॉईन करतो. चिनू त्याच्या कडे बघतच बसते.

चिनू : " ए दादा! बरा आहेस ना! काय झालय?? "

निल : " ( हसत हसत गातो ) एक लडकी को देखा तो ऐसा लगाsssss...... "

              'हा असा काय?' चिनूच्या सगळं समजण्या पलीकडे होतं. या पूर्वी कधीच निल तिला असा जॉईन झाला नव्हता. त्यामुळे ती सुद्धा कोड्यात पडली होती. निलचे आई बाबा तर त्याच्या डोळ्यांना बघूनच समजून गेले होते की, निल नक्कीच प्रेमात पडलाय. निल त्याचं आवरून ऑफिस ला पोहचतो. नेहमीप्रमाणे त्याचा लॅपटॉप काढून आजची पोस्ट टाकतो....

                    " काय असावे सांग ना

                        नाते तुझे नी माझे

                   गतजन्मीचे असतील बंध

                   की नव्याने जुळले धागे??"

             आज दिवसभर ऑफिसमधे ही निल खूप खुश होता. खूप काम होऊनही त्याच्या चेहऱ्यावर वेगळाच उत्साह दिसत होता . दिवसभर सृष्टीचे विचार त्याच्या मनात घोळत होते. सृष्टी त्याला आवडायला लागली होती. तो सृष्टीच्या प्रेमात आकंठ बुडाला होता . 

               दिवसभराचे काम संपवून निल घरी पोहचतो. जेवण खावण आटोपून निवांत त्याच्या रूम मधे जाऊन बसतो. त्याला आज त्याची अपूर्ण राहिलेली एक स्टोरी पूर्ण करायची होती. त्याला वाचकांकडून तसे मेसेज येत होते. पुढले भाग वाचण्यासाठी ते सुद्धा उतावीळ झालेले होते. त्यात पुनर्जन्माच्या कथा म्हटल्या की पुढे काय असेल हे जाणून घेण्यासाठी वाचकही उत्सुक असतात. त्यामुळे त्याला ही स्टोरी लवकर लवकर पूर्ण करायची होती.

                  निल लेखन करण्यासाठी त्याचा लॅपटॉप उघडतो. त्याला त्याच्या अपडेट्स मधे सृष्टी ने पोस्ट केलेली स्टोरी दिसते. तीच नाव दिसल्याबरोबरच त्याच्या चेहऱ्यावर छान स्माईल येते. तो आधी तिची स्टोरी वाचायला घेतो. स्टोरी वाचता वाचता निलला एकदम अस्वस्थ वाटायला लागत. त्या स्टोरीत असलेलं गावाच वर्णन, त्यातील नायक, नाईका निल ला आपलेसे वाटायला लागतात. आणि निल ला एकदम आश्चर्याचा धक्काच बसतो.

               निल ने आज सकाळी स्वप्नात पाहिलेलं देऊळ.. हुबेहूब तसंच वर्णन त्या स्टोरीत असत. ते वाचता वाचता निल च्या अंगाला घाम फुटायला लागतो. जणू काही आपण स्वतःच हे सगळं जगलेल आहे असं त्याला वाटायला लागत. त्याचं मन खूप अस्वस्थ व्हायला लागत. हे असं काय होतय त्याला काहीच कळत नाही. पुढे त्यात गाण्याच्या ओळी वाचून तो पूर्णच हरवून जातो.....

            "हो, सदियों से हैं मेरा-तुम्हारा मिलन

               तू है सूरज, मैं हूँ तुम्हारी किरण

               फूलों से ख़ुशबू कैसे जुदा होगी?

              नदिया से धारा कैसे ख़फ़ा होगी?

मिल ना सकेंगे अगर इस जनम में तो लेंगे दोबारा जनम"

             निल ला हे सगळं जवळून पाहिल्यासारखं वाटत होत. तो स्वतः हे सगळं जगलाय असच त्याला वाटत होत. त्याला त्या क्षणी सृष्टीशी बोलावंसं वाटत होत. तिने त्याच्या स्वप्नातलं हुबेहूब वर्णन त्यात केल होत. त्याला तिच्याकडून जाणून घ्यावसं वाटत होत की तिने नेमकं तेच चित्र कस काय त्या स्टोरीत उभ केलं?? तो आता दिवस उजाडण्याची वाट बघू लागला. त्याच्या अस्वस्थ मनाला शांत करण्याचा प्रयत्न करू लागला.

काय असेल निलचा त्या देवाळाशी संबंध?? सृष्टीने नेमकं तेच सगळं कस काय लिहिलं असणार?? सृष्टीचाही असेल का काही संबंध या साऱ्याशी?? हे कळण्यासाठी पुढील भाग नक्की वाचा.....


Rate this content
Log in

Similar marathi story from Romance