Poonam Wankar ( पूरवा )

Romance Fantasy

3  

Poonam Wankar ( पूरवा )

Romance Fantasy

दो दिल एक जान - भाग अकरा

दो दिल एक जान - भाग अकरा

5 mins
249


       सिया घरी पोहचते. ती खूप चिडलेली होती. ती जोरात फाटक उघते, सायकल ठेवत घरात जाते. ती पावसामुळे पूर्ण भिजलेली होती. " अग सिया.. किती भिजलीस बाळा... थोडा वेळ थांबायचं ना! पाऊस कमी झाल्यावर निघायचं होतं!" सियाची आई म्हणाली.


सिया : " काय.. समजतो काय हा स्वतःला?? 😠

आई : " अग, काय झालं? कुणावर एवढ चिडलीस?? "

सिया : " कोण काय कोण? तुझा राघव आहे ना? त्याच्यामुळे पडले मी आज 😠.. मला नाही बोलायचं आता त्याच्याशी. "

बाबा : " अग हो..! पण काय झालं सांगशील की नाही? आणि त्याच्यामुळे कशी काय पडलीस तू? काय केलंय त्याने??

सिया : " अहो बाबा, हा ना वाटेत उभा होता. माझं लक्ष गेलं ना त्याच्याकडे 😏.. मग माझा तोल गेला आणि मी पडले 😠😠"

               सियाचे आई बाबा दोघेही हसायला लागतात.

बाबा : " अग वेडे त्यात त्याची ग काय चूक? उगाच कशाला बोलतेस त्याला? "

सिया : " काय हो बाबा? नेहमी त्याचीच बाजू घेता तुम्ही. " ( चिडक्या स्वरात )

आई : " बर.., तू आधी आवरून घे.. बघ किती भिजलिस ते.. तू आवरून ये.. मी चहा ठेवते तुझ्यासाठी. "

            आई ला होकार देत सिया आत निघून जाते. सायंकाळी पाऊस थांबल्यावर राघव सिया कडे येतो. हा त्याचा नित्यक्रमच होता. तो रोज सायंकाळी त्याला नवा जन्म देणाऱ्या सियाच्या आई वडिलांना भेटायला न चुकता यायचा. सिया अशी रस्त्यात पडल्यामुळे जरा रुसून बसली होती. आज ती काही राघवशी बोललीच नाही. तो हळूच सियाच्या आईला विचारतो, " काकू.. हा फुगा घरात कोठून आलाय?? 🤔"

सिया : " कुठे रे दिसतोय फुगा तुला?? मला कसा नाही दिसला??"🙄

राघव : " अग.., हा काय.. इथेच तर आहे... तुझ्या गालाचा फुगा 😉.( गाणं म्हणत )


नाकावरच्या रागाला औषध काय

गालावरच्या फुग्यांच म्हणण तरी काय😊


         असं म्हणत तो खिशातून एक चॉकलेट काढत सियाला देतो. चॉकलेट बघून तिच्या ओठांवर एक छान स्माईल येते. तिला हसताना बघून सगळेच हसायला लागतात. ती लगेच आत जाऊन थोडी हळद गरम करून आणते आणि राघवच्या हाताला झालेल्या जखमेवर लावून देते. " अग.., सिया याची गरज नव्हती.. फार नाही लागलंय मला.. होईल बर ते!" राघव म्हणाला.


सिया : " तू गप रे, किती फुटलाय बघ हात. याने बर वाटेल तूला. एरव्ही आई लावून देतेच की, आज मी लावलंय तर काय झाल? "

         सिया खूप प्रेमाने त्याच्या जखमेवर हळद लावून देते. सिया आणि राघवची मैत्रीच अशी होती. कितीही चिडले किंवा भांडले तरीही एकमेकांशिवाय राहत नव्हते दोघेही.

बाबा : " अरे राघवा, उद्या माझ्या ऑफिस मधल्या एका व्यक्ती कडे लग्नाला जायचंय. तुला ही उद्या सुट्टी आहे तर चल आमच्या बरोबर. तुला ही थोडं फ्रेश वाटेल. "

राघव : " हो काका, नक्की येतो. तसाही इतक्यात कुठे गेलो नाही मी. आणि हिला सुद्धा लागेल ना भांडायला कुणी तरी.. तिथे उगाच कुणाशी भांडत बसेल 😊त्यापेक्षा मीच येतो. 😊"

सिया : " गप रे, मी काय भांडत असते का? तूच चिडवतोस ना मला!😠"

राघव : " अग..! चिडतेस कशाला.. गंम्मत करतोय तुझी 😊"


              सगळे हसायला लागतात. दुसऱ्या दिवशी सायंकाळी सगळे सोबतच कार्यक्रमा करीता निघतात. सियाने आज सुंदर गुलाबी रंगाचा ड्रेस घातला होता. तो तिच्यावर खूप सुंदर दिसत होता. राघव कार्यक्रमात आलाय म्हटल्यावर सगळ्यांना त्याच गाणं ऐकायचं होत. सगळे त्याला गाण्याची विनंती करत होते. तिथे राधिका, सियाची मैत्रिण देखील आलेली होती. राधिकाला राघव फार आवडायचा. ती मुद्दाम सियाच्या जवळ जवळ राहायची. कारण तिला माहिती होतं की तिला जर राघवशी मैत्री करायची असेल तर सिया शिवाय पर्याय नाही. राघव होताच असा की कुणीही त्याच्या प्रेमात पडावं. पण तो कधी कोणत्याही मुलींना भाव देत नव्हता. राधिका सिया ला म्हणते, " सिया, आज राघवशी माझी ओळख करून दे ना ग? "


सिया : " का? तुला काय काम पडलं त्याच्याशी?? "

राधिका : " काम नाही ग, मला ना तो आवडतो. काय हँडसम आहे ग तो. आणि काय गातो यार.. त्याला ना ऐकतच रहावस वाटतं.. " 😊


               राधिकाच बोलणं ऐकून सियाला तिचा जरा रागच येतो. कारण राघव तिचा मित्र होता. त्यामुळे तिला त्याच्या बद्दल कोणी असं बोललेल आवडायचं नाही. सिया सगळा राग गिळते आणि एका कोपऱ्यात राधिका पासून जरा लांबच जाऊन बसते. लोकांच्या आग्रहाला मान देत नव्या वधू वरा करीता राघव छान गाणं गायला सुरु करतो....


 सांसो की ज़रूरत है जैसे,

सांसो की ज़रूरत है जैसे

ज़िंदगी के लिये

बस एक सनम चाहिये

आशिक़ी के लिये

जाम की ज़रूरत है जैसे

जाम की ज़रूरत है जैसे

बेखुदी के लिये

हाँ एक सनम चाहिये

आशिक़ी के लिये

बस एक सनम चाहिये

आशिक़ी के लिये


           त्याच गाणं ऐकून सगळेच आनंदी होतात. त्या कार्यक्रमात उपस्थित असलेल्या मुली तर सगळ्याच राघवच्या फॅन होत्या . सगळ्यांनाच त्याच्याशी बोलाव वाटायचं, मैत्री करावी वाटायची. मात्र राघवला फार मोजकेच मित्र मैत्रिण होते. आणि सिया सगळ्यात जवळची होती... तो तिच्याशी त्याच्या सगळ्याच गोष्टी शेअर करत असे. सिया देखील राघवजवळ मनातलं सगळं बोलून मोकळी होतं होती. त्यामुळे त्या दोघांनाही कोणत्या दुसऱ्या व्यक्तीची गरजच भासली नाही.


         राघवच गाणं संपल्यावर सगळ्या मुली त्याच्या भोंवती घोळका करतात. तो ही सगळ्यांशी हसूनच बोलत होता. मात्र हे सगळं बघून सियाला फार चीड येतं होती. त्या घोळक्यात जाऊन ती राघवला हाताला धरून बाहेर ओढते.


राघव : " अग सिया, काय झालंय?? "

सिया : " काय रे, त्या मुलींच्या घोळक्यात काय काम होतं तुझं?? कळत नाही का तुला?? कशाला त्यांच्याशी बोलत बसलास? आणि ती राधिका... 😏काय म्हणतं होती ती? "

राघव : " मी कुठे गेलो त्यांच्यात? त्याच आल्यात ना माझ्या भोंवती. मी काय करणार ना मग? 🤔 आणि राधिका माझी स्तुती करत होती. फार छान बोलत होती ग ती 😊"

           एव्हाना राघवला कळलं होतं.., की राधिका आपल्याशी बोलल्यामुळे सियाची चीड चीड झाली ते. पण तरीही,तो मुद्दाम तिला चिडवण्यासाठी, तिच्यापुढे राधिकाची तारीफ करत असतो .


सिया : " हो का?? 😠 मग ऐकत बस तिच्या तोंडून तुझी तारीफ.. 😏 जाते मी 😠"

          असं म्हणतं सिया दुसरी कडे जाऊन बसते. मात्र तिथेही राधिका तिला शोधत पोहचते.

राधिका : " काय ग सिया? किती शोधत होते मी तुला?? आणि तू इतक्या कोपऱ्यात येऊन बसलीस?? "

सिया : " काय ग? काय झालंय? मला का शोधतेस? "

राधिका : " सिया, राघव तुझा चांगला मित्र आहे ना? मग माझ्याविषयी बोल ना ग त्याच्याशी.. मला तो खूप आवडतो. त्याला सांग ना माझ्याबद्दल. तू सांग ना त्याला, माझ्या मनातलं पोहचव ना त्याच्या पर्यंत. "


           खरं तर सियाला राधिकाचा अजूनच राग येतं होता. प्रेम व्यक्त करायला कशाला हवं कोणी मध्यस्ती?? मुळात हेच तिच्या लक्षात येतं नव्हतं. पण या राधिकाच बोलणं सिया मनावर घेईल का?? सांगेल का ती राघवला हे सगळं??


Rate this content
Log in

Similar marathi story from Romance