दो दिल एक जान - भाग आठ
दो दिल एक जान - भाग आठ
दुसऱ्या दिवशी निल आणि सृष्टीची फॅमिली एकमेकांना भेटून लग्नाची बोलणी करतात. त्यानुसार आधी एंगेजमेंट आटोपून घ्यायची आणि काही दिवसांनी लग्नाची डेट काढण्याच ठरवतात . दोन्ही कुटुंबाला कमेकांचे विचार पटतात.
सगळ्यांच्या गप्पा छान रंगलेल्या असतात .सगळ्यांचा चहा नाश्ता खाण पिणं होत. मात्र निल आणि सृष्टी एकमेकांच्या डोळ्यात हरवलेले असतात. मोठ्यांच्या काय गोष्टी चालल्यात याकडे दोघांचंही लक्ष नसत. ते डोळ्यांनी एकमेकांशी बोलत होते.
किशोर (नीलचे वडील त्याच्या आईला ) : " अग सुधा..., मला वाटत या दोघांना एकांत हवाय!! काय रे निल?? जाऊ का आम्ही आत..??? "
बाबांच्या या प्रश्नाला निल आणि सृष्टीचा काहीही प्रतिसाद नसतो. चिनू लगेच तिच्या जागेवरून उठते आणि, निल आणि सृष्टीच्या डोळयांपुढून तिचा हात हलवते. मात्र दोघेही एकमेकांत इतके मग्न झाले होते की त्यांना एकमेकांच्या डोळ्यांशिवाय दुसरं काहीही दिसत नव्हतं. चिनू लगेच गाणं गायला सुरवात करते...
लागे रे.. लागे रे... लागे... लागे रे..
नयनवा लागे रे.. लागे रे...
जब से तेरे नैना
मेरे नैनों से लागे रे
तब से दीवाना हुआ
सब से बेगाना हुआ
रब भी दीवाना लागे रे....
रब भी दीवाना लागे रे....
निल आणि सृष्टी दोघेही एकदम भानावर येतात. आणि सगळे हसायला लागतात.
चिनू : " काय रे दादा..!! हे.. 'आँखो ही आँखो में' काय चाललं होत तुमचं??? 👀(सृष्टीच्या खांद्यावर हात ठेऊन ) आणि आम्हाला ही बघू दे की वाहिनी चे डोळे... तुझी होणार.. म्हणजे एकटाच बघणार की काय तिला.. मला पण बघू दे ना!!☺️☺️"
निल : " ए चिनू.. गप ना! सर्वांसमोर अस नको बोलुस ?? "
चिनू : " ए वाहिनी... बघ ग माझा लाजरा दादा!!😄 कसचं होणार रे तुझं?? "
सृष्टी सुद्धा लाजेन मान खाली घालते. तिच्या गालावर सुंदर खळी पडते. ती बघून लगेच चिनू निल ला म्हणते.., " ए दादा!! काय गोड हसते रे ही!!😊 आता कळलं तुझा पतंग कुठं कटला ते?? 😄😄" इतक्यात किशोर त्यांना हाक मारतात.., " अरे मुलांनो.., इकडे या..!!.काय कुजबुज चालली आहे तुमची??? " चिनू लगेच मस्ती च्या मूड मधे तिच्या बाबांना निल आणि सृष्टी च काय चाललं होत हे सांगण्याचा प्रयत्न करते..., " अहो बाबा!! 😁 हे दोघे ना....." निल लगेच तिचं तोंड दाबतो आणि.., " कुठे काय??? काहीच नाही हो बाबा.. ही चिनू ना वेडीच आहे!! " सृष्टी ही गालात हसते आणि जाऊन तिच्या आई जवळ बसत. " काय ग सृष्टी?? आवडलंय का आपलं घर?? " निल ची आई सृष्टीला विचारतात.
सृष्टी : " हो.. खूप सुंदर!! घरही आणि घरातील माणसे ही 😊"
सृष्टीची आई : " माणसे की एक माणूस?? " 😊
सृष्टी : " काय ग आई.. तू पण ना!! ( सृष्टी लाजून मान खाली घालते )
सगळे हसायला लागतात. 😊 इतक्यात सृष्टी चे वडील निलच्या वडिलांना म्हणतात, " किशोरराव, मला वाटतं की आपण सगळ्यांनी एकमेकांबरोबर थोडा वेळ घालवायला हवा. म्हणजे एकमेकांना नीट समजून घेता येईल. तुम्हाला काय वाटतं?? " " हो हो..! अगदीच बरोबर बोललात तुम्ही विश्वासराव. आता दोन दिवस सुट्ट्या आहेत तर कुठे बाहेर जाऊ या सगळे मिळून. आमच्या फार्म हाऊस ला जाऊन येऊ या!! या सगळ्या गोंधळापासून लांब.. शांत ठिकाणी.. मुलांनाही एकमेकांना वेळ देता येईल म्हणजे?? कस वाटतंय तुम्हाला?? " यावर सगळेच आपला होकार कळवतात. निल आणि सृष्टी तर मनातल्या मनात फारच खूष झाले होते कारण आता पूर्ण दोन दिवस त्यांना एकमेकांनबरोबर घालवता येणार होते.
सगळे जाण्याची तयारी करू लागतात. निल आणि सृष्टी तर त्या दोन दिवसांची स्वप्नेच रंगवू लागतात. निल सृष्टीला रात्री कॉल करतो.., " हाय जान..!!❤️ कशी आहेस?? "
सृष्टी " जी हमारा दिल❤️ तितली बन कर उड राहा हैं!!"
निल : " ओहो!! क्या बात हैं!! हमारी नींदे उडाकर?? जी ये ठीक बात नही!! जरा अपने दिल को समजायीए.. हमारा हाल बुरा हुए जा राहा हैं!!" 😊😍
आय फ़ील लव
व्हेन आय लुक इंटू योर आइज़
आय बिलीव
इफ यू मूव आउट फ्रॉम माय साइड
आइल बी लूज़िन
ग्रिप ऑन यू
सृष्टी : " जनाब!! जरा संभालिए.. कही कुछ हो ना जाए.. 😊
अल्फ़ाज़ क्या कहूँ मैं
बेचैन सी रहूँ मैं
तू बिन कहे ये हाल जान ले
मौसम मोहब्बतों के
लम्हें ये चाहतों के
अपने लिए बने हैं मान ले
निल : "फिर क्यों फ़ासला.. मैं कहाँ और तुम कहाँ..??" 😊
आज दोघेही एकमेकांच्या विचारत गुंतून जातात. त्यांचं प्रेम आता नाजूक अश्या रेशमी धाग्याने बांधलं जाणार होत. दोघेही आपल्या नव्या आयुष्याची सुरवात करण्यासाठी आतुर झाले होते. नव्या आयुष्याची स्वप्ने डोळ्यांत सजवून दोघेही झोपी जातात.
दुसऱ्या दिवशी सकाळी दोन्ही फॅमिली फार्महाऊसला पोहचतात. सृष्टी ची माई मात्र त्यांच्या बरोबर येत नाहीत. त्या दुसऱ्या दिवशी तिथे पोहचणार होत्या. तिथे पोहचल्यावर सगळे लोक फार्महाऊसचा परिसर फिरायला निघतात. सगळे मोठे एका दिशेने आणि लहान एका दिशेने वेगवेगळे फिरायला निघतात. शंभर एकराचा तो परिसर फारच सुंदर आणि हिरवागार होता. आंब्याची बाग, फणसाची बाग, नारळाची मोठ मोठाली झाडें चारही बाजूनी उंच उंच वाढलेली होती. वेगवेगळ्या फळ बागा, फुलांच्या बागा संपूर्ण परिसर खूप सुंदर आणि मनमोहक होता. तिथे स्विमिंग पूल आणि सुंदर अस गार्डन होत. सगळी मंडळी फिरून दमून जातात. तोपर्यंत तेथील काम पाहणारे लोकं त्यांच्या खाण्या पिण्याची व्यवस्था करून ठेवतात. सगळे फ्रेश होऊन डायनिंग टेबल वर येऊन बसतात. मस्त चुलीवर केलेल्या स्वयंपाकाची चव सगळे मोठ्या चवीने चाखतात. मोठी मंडळी फिरून दमल्याने ते थोडावेळ आराम करायला त्यांच्या त्यांच्या बेडरूम मधे जातात. चिनू ही दमून झोपी जाते.
निल आणि सृष्टी मात्र जागेच असतात. निल सृष्टी ला घेऊन बाहेर स्विमिंग पूल च्या एरियात जातो. तिथे आजू बाजूला सुंदर चाफ्याची, मधुमालतीची झाडें होती. त्या फुलांचा सुगंध सर्वत्र दरवळत होता. बाजूला सुंदर हिरवगार लॉन होत. निल आणि सृष्टी लॉन वर बसून खूप गप्पा करतात. आज सृष्टी खूप गोड दिसत होती. निल तिच्या डोळ्यात एकसारखा बघत होता. " अस काय बघतोय?? " सृष्टी निल ला विचारते. निल सृष्टीचा हात हाती घेऊन म्हणतो.., " तुझ्या या काळ्या डोळ्यांच्या सागरात बुडून जावस वाटतंय मला. " इतक्यात अचानक वातावरण बदलत आणि पाऊस पडायला लागतो. दोघेही पावसात भिजण्याचा आनंद घेऊ लागतात. निल सृष्टीच्या डोळ्यात बघून गायला लागतो...
मोहब्बत बरसा देना तू सावन आया है
तेरे और मेरे मिलने का मौसम आया है
सबसे छुपा के तुझे सीने से लगाना है
प्यार में तेरे हद से गुज़र जाना है
इतना प्यार किसी पे पहली बार आया है
मोहब्बत बरसा देना तू सावन आया हैं..
थोड्याच वेळात काळे काळे ढग दाटून येतात. आणि मुसळधार पाऊस कोसळायला लागतो. निल आणि सृष्टी स्वतःला वाचवत एका शेड चा आडोसा घेतात. दोघेही चिंब भिजलेले होते. सृष्टी खूपच सुंदर दिसत होती. तिच्या मोकळ्या केसातून पाण्याचे थेंब गळत होते. तिच्या चेहऱ्यावर ओघणारे पावसाचे थेंब निल ला अलगत त्याच्या ओठांनी टिपावेसे वाटतं होते. त्याच मन सृष्टीला त्याच्या जवळ घेण्यास आतुर झालं होत. सृष्टीच्या मनाची अवस्था ही काही अशीच झाली होती. तिला ही निल च्या कुशीत शिरून जावस वाटतं होत. इतक्यात जोरात वीज कडाडते आणि सृष्टी निल ला घट्ट मिठी मारते. निल सुद्धा तिला घट्ट त्याच्या कुशीत घेतो. निल हळूच तिचा चेहरा तिच्या हनुवटी ला धरत वर करतो. तिच्या डोळ्यात बघून म्हणतो...,
भीगे भीगे तेरे लब मुझको कुछ कहते हैं
दिल है ख़ुश मेरा की ख्याल एक जैसे हैं
रोको ना अब खुदको यूँ सुन लो दिल की बात को
ढल जाने दो शाम और आ जाने दो रात को
अस म्हणत तो सृष्टीच्या ओठांवर त्याचे ओठ हळूच टेकवतो. तो पहिला स्पर्श दोघांच्याही मनाला मोहरून टाकतो. सृष्टी लगेच लाजत थोडी बाजूला होते. निल ला वाटतं त्याच काही चुकलं तर नही ना! त्याच्या मनाची अवस्था लक्ष्यात घेऊन सृष्टी पुन्हा त्याच्या जवळ जाते, त्याला घट्ट मिठी मारत म्हणते...,
मैं सिर्फ तेरी रहूँगी
तुझसे है वादा ये मेरा
तू मांग ले मुस्कुरा के
मेरा प्यार हक़ है तेरा
सृष्टी हळूच तिचे ओठ नीलच्या गालांवर टेकवते. दोघेही एकमेकांच्या कुशीत विरघळून जातात. पावसाच्या धारा त्यांच्या प्रेमाच्या पावसापुढे फिक्या पडायला लागतात. दोघेही एकमेकांच्या खूप जवळ यायला लागतात. दोघेही एकमेकांच्या कुशीत असतात. कोसळणारा पाऊस त्यांना मनसोक्त भिजवत होता. आणि अचानक दोघांनाही काही तरी आठवायला लागत.
निल : " सृष्टी, मला असा का वाटतंय या पूर्वी ही तू अशीच माझ्या कुशीत होतीस?? "
सृष्टी : " हो निल!! हा पाऊस, तुझा स्पर्श मला सगळंच आधी अनुभवल्या सारख वाटतंय रे! निल आपण पूर्वी भेटलोय का रे?? निल मला वेगळीच भीती वाटतं आहे.. असा वाटतंय की तू माझ्यापासून लांब जाणार!! मला सोडून नाही ना जाणार कुठेही?? "
निल : " नाही सृष्टी.., कधीही नाही.. तुझ्या साठी मी पुन्हा जन्म घेतलाय.. आता नाही कुठेही जाणार!! "
अस बोलून निल एकदम शांत होतो. दोघांची मिठी सैल होते. दोघेही एकमेकांच्या डोळ्यात बघतात. निल अचानक असा कसा बोलला दोघांनाही कळत नव्हतं. दोघांच्याही मनात असंख्य प्रश्न दाटून आले होते.

