Poonam Wankar ( पूरवा )

Romance Fantasy

3  

Poonam Wankar ( पूरवा )

Romance Fantasy

दो दिल एक जान - भाग 5

दो दिल एक जान - भाग 5

5 mins
281


          निल सकाळी लवकर उठतो आणि सृष्टीला भेटावं म्हणून आजही तो कालच्याच पार्कमधे जातो. त्याच्या मनात वेगळीच घालमेल चालली होती. तो वारंवार याच प्रश्नच उत्तर शोधण्याचा प्रयत्न करत होता की, सृष्टीने त्याच्या स्वप्नातलं चित्र हुबेहूब कस काय रंगवल असेल?? ती त्या ठिकाणाला ओळखते का??? तिने पाहिलं असेल का कुठे? म्हणून तर तिने वर्णन केल नसेल ना?? त्याला कुठल्याच प्रश्नांची उत्तरे मिळत नव्हती. मात्र सृष्टीशी बोलून त्याला काही तरी कळलं असत. त्यामुळे तो ती येण्याची वाट बघत होता. इतक्यात समोरून त्याला सृष्टी येतांना दिसली. आज ब्लॅक ट्रॅक सुट मध्ये ती फारच सुंदर दिसत होती. कानात हेडफोन घालून ती जॉगिंग करत होती. निल लगेच तिच्या कडे धावत जातो...

निल : " गुड मॉर्निंग 😊... कशा आहात?? "

सृष्टी : " ओह! हाय..! व्हेरी गुड मॉर्निंग 😊.. कसे आहात?? "

निल : " मी मस्त!!😊... तुम्ही मला निल म्हणाल्या तरी चालेल..!"

सृष्टी : " त्यासाठी आधी तुम्ही फॉर्मॅलिटी करण सोडलं तर चालेल.. 😊 तू ही मला सृष्टी म्हणू शकतोस!!" (दोघेही हसायला लागतात)


          खरंतर निलला तिच्याशी कालच्या स्टोरीतील गावाविषयी बोलायचं होतं. तिला विचारायचं होतं. त्याला सांगावस वाटत होतं की, मी हे गाव स्वप्नात पाहिलं. तिने केलेलं हुबेहूब चित्र त्याने पाहिलं होत. पण तो तिला काहीच विचारू शकला नाही. त्याच्या मनात विचार सुरु होते, " हिला विचारू की नको? ही माझ्याविषयी काय विचार करेल? तिला काय वाटेल?? नको आपण असं डायरेक्ट नको विचारायला!! तिने चुकीचं समजलं तर?? नको..! नको...! त्यापेक्षा नको. ही डॉक्टर आहे.. मला वेड्यात काढलं तर, उगाच मैत्री पण तुटेल!! काय वाटेल तिला.. इतका शिकलेला मुलगा असून पुनर्जन्माच्या गोष्टी करतो? असू दे...! नाही विचारत.."

              

निलच्या मनात काही तरी चाललंय हे सृष्टी च्या लक्ष्यात येते. ती लगेच त्याच्या चेहऱ्यावरील भाव ओळखते आणि त्याला विचारते...., "निल..., काय झालं? कुठे हरवलास? काही विचारायचं आहे का?" निल जरा दचकल्या सारखा होतो. परत मनात विचार करतो, " बापरे!! काय ही एका क्षणात मनातलं ओळखते!! आता कस विचारू हिला?? जाऊ दे सहज काही तरी बोलतो." चेहऱ्यावर सहजतेचे भाव आणत नील सृष्टीशी बोलायला लागतो...

निल : " मी काल तुझी स्टोरी वाचली. खूप सुंदर लिहिली आहेस!! त्यातील गावाचं वर्णन तर फारच सुरेख. हल्ली लोक खेड्यांपासून दूर चाललेत. त्यांना गावात राहायला आवडत नाही. लोकांचा कल शहरांकडे जास्त वळलेला दिसतो. तू पाहिलेलं आहेस का ते गाव?? म्हणजे कधी गेली आहेस का अशा ठिकाणी?? खूप सुंदर वर्णन केलंस ना? म्हणून विचारलं.. सहज.. बर का!! 😊 मला वाचता वाचता असं वाटलं की, मी स्वतः तिथे उपस्थित आहो...; इतकं सुंदर वर्णन केलंस!"

सृष्टी : " नाही...! मी पाहिलेलं नाही ते गाव.., पण खूप वेळा ऐकलंय त्या गावा विषयी..! माझी माई.. म्हणजे माझी पणजी... बाबांच्या आईची आई .., तिच्या तोंडून ऐकलय मी या गावाबद्दल. ती सांगत असते मला जुन्या गोष्टी. मग तिच्या गोष्टींना मी माझ्या शब्दांमध्ये मांडत असते. 😊 "

निल : " वाह! मस्तच की, मज्जा येत असेल ना तुला तिच्याकडून गोष्टी ऐकायला..!"

सृष्टी : " हो.. खूप जास्त.. आणि फक्त मज्जाच नाही.., तर ती म्हणते, मी तिची मुलगी म्हणजेच माझी आजी.. तिच्या सारखी दिसते. 😊 काही तरी सांगत असते... तिच्या गोष्टी ऐकून हसायला सुद्धा येतं... पण खूप भारी आहे माझी माई. 😊ती म्हणते तिच्या मुलीने पुनर्जन्म घेतलाय माझ्या रूपाने. खूप लाड करते ती माझे. आणि मी ही करवून घेते😊😊. "

निल : " सृष्टी एका विचारू का ग?? तुझा आहे का विश्वास असा पुनर्जन्मवार?? म्हणजे... तुला वाटत का की, असं काही असेल म्हणून?? खरंच लोक पुन्हा जन्म घेतात का ग?? "

सृष्टी : " खर तर.... नाही माझा विश्वास यावर. पण माहिती नाही कधी कधी काही गोष्टी अशा घडतात ना! की त्यावर विश्वास ठेवावाच लागतो. कधी तरी मला असे आभास व्हायला लागतात, जे मला खूप मागे घेऊन जातात आयुष्याच्या त्या वळणावर जे मी कधी पाहिलेलं ही नाही.. मग या साऱ्या गोष्टी विचार करायला भाग पडतात रे...! खरं तर मी सायन्स ची मुलगी, मेडिकल फील्ड ची, आमच्या फिल्ड मधे या साऱ्या गोष्टींचा संबंध मानसिकतेशी जोडला जातो.. पण कधी कधी या निसर्गापुढे आम्हालाही झुकावंच लागत. काही गोष्टींच्या तळापर्यंत जाण शक्यच होतं नाही...! अरे बापरे!! काय हे बोलत बसलोय आपण?? उशीर झालाय... निघायला हवं आता...! ओके निल, बाय!! काळजी घे...!😊

निल : " 😊हो... पण, खूप छान वाटलं तुझ्याशी बोलून. एक सांगू.. राग तर नाही ना येणार?? "

सृष्टी : " अरे, बोल ना! "

निल : " तुझी स्माईल... खूप सुंदर आहे!😊"

सृष्टी : 😊...ती पण माझ्या आजीसारखीच आहे... सगळे असेच म्हणतात... थँक यू!! चल बाय निघते आता. 😊"


                निल आणि सृष्टी आपापल्या मार्गाने निघून जातात. आज निल च बोलणं ऐकून सृष्टीला ही त्याचे हे शब्द या पूर्वीही ऐकल्यासारखे वाटले. तीच्या मनात विचार आला की, " निल ला कस सांगितलं असत मी की, माई ज्या गावाबद्दल सांगते ते मी ही स्वप्नात बघत असते. या साऱ्या गोष्टी माझ्याही आकलना पलीकडे आहेत. पण हे तितकंच खर आहे रे...! दिसतात मला अशा काही गोष्टी ज्याचा संबंध माझ्या पूर्वीच्या आयुष्याशी जोडला जातोय. माई नेहमीच म्हणते, ' माझी सिया परत आली..., आता राघवही येणार....!!' पण, हा राघव कोण?? मला नाही रे माहिती. पण निल... तू आवडतोस रे मला 😊"


               सृष्टी मनातल्या मनात हसते. तिच्याही मनात नीलच्या प्रेमाची वेल फुलायला लागली होती. निल ला भेटण्या आधी त्याच्या कवितेच्या प्रेमात आणि त्याला भेटल्यावर त्याच्या प्रेमात पडली होती. आज सकाळी तिच्याही मनात विचार आले होते की निल ने आजही त्या पार्क मधे यावं. आणि तसंच घडलंही...! तिला खूप छान वाटत होतं. निल सुद्धा सृष्टीच्या प्रेमात पडला होता. त्यांची मैत्री हळूहळू बहरायला लागली होती. ते एकमेकांच्या जवळ यायला लागले होते. गोष्टी एकमेकांशी शेअर करायला लागले होते. पण दोघेही अजूनही त्यांना पडणारी स्वप्ने मात्र एकमेकांना सांगू शकत नव्हते. त्यांच्या मनात थोडी भीती वाटत होती.. कदाचित एकमेकांना गमावण्याची भीती असावी ती...! कारण आता एकमेकांपासून लांब जाण दोघांनाही अशक्य होतं... दोन शरीर जरी असले तरी मात्र त्यांचे हृदय आता एक झालेले होते. ❤️

                  सृष्टी घरी येते तेव्हा माई अंगणात तुळशीला पाणी घालत होती. ती येऊन माईला मिठी मारते.

माई : " काय ग चिमणे! काय झालं?? "

सृष्टी : " ए माई..!! आज ना मला निल भेटला पार्क मध्ये. पण ना आज तो मला म्हणाला की माझी स्माईल खूप सुंदर आहे. तस तर एरव्ही सगळेच म्हणतात ग! पण आज तो जेव्हा असं म्हणाला तेव्हा माहिती नाही ग.. पण असं वाटलं की या पूर्वीही कोणीतरी असं मला म्हणाल आहे...!! असं का असेल ग..??

माई : " बाळा.. होतं ग असं कधी कधी.., अचानक काही शब्द कानावर पडतात आणि असं वाटतं की या पूर्वी ही आपण ऐकल्या असाव्यात. आपल्या भूतकाळाशी त्याचा असतो काही नाही काही संबंध..., आणि आपल्या आयुष्यात येणाऱ्या व्यक्ती काही सहज नाही हो येतं आपल्या आयुष्यात... काही नाही काही संबंध असतो आपला त्यांच्याशी...! "


          माईच बोलणं ऐकून सृष्टी विचारत पडते..., " खरच कुठे ऐकलं असेल मी हे.. माई म्हणाली तस नीलशी असेल का काही संबंध या सगळ्यांचा..?? काय मी पण.. उगाच विचार करत बसले?? 😊 चला सृष्टी डार्लिंग.. आवरा लवकर लवकर... उशीर होईल जायला.. 😊" सृष्टी तिचं आवरून क्लिनिकला निघते पण हे विचार सतत तिच्या मनात घोळत असतात. सकाळी नीलचे शब्द ऐकून तिच्या मनात खोल कुठेतरी काहीतरी हलल्यागत झालं होतं तिला. खरंच काय असेल हे?? असेल का या दोघांचा काही संबंध एकमेकांशी?? हे बघण्यासाठी पुढचा भाग वाचायला विसरू नका... 😊


Rate this content
Log in

Similar marathi story from Romance