Poonam Wankar ( पूरवा )

Romance Fantasy

3  

Poonam Wankar ( पूरवा )

Romance Fantasy

दो दिल एक जान - भाग 2

दो दिल एक जान - भाग 2

4 mins
207


       निल लगेच आवरतो आणि चिनू ला कॉलेज ला सोडत पुढे ऑफिस ला निघतो. निल ची एक सवय होती, कुठल्याही कामाची सुरवात करण्याआधी तो त्याचा लॅपटॉप काढून त्याच्या सोशल साईट वर एक पोस्ट लिहायचा..., जुन्या पोस्ट वर आलेल्या कंमेंट्स वाचून त्यावर रिप्लाय द्यायचा.., आणि नंतरच त्याच्या कामांना सुरवात व्हायची. काल त्याने प्रेमावर एक कविता पोस्ट केली होती....

"प्रेम म्हणजे तू

खळखळणाऱ्या झऱ्यापरी

प्रेम म्हणजे मी

तुज मिठी मारू पाहणाऱ्या खडकापरी"

           त्याच्या या पोस्ट वर त्याला एक रिप्लाय आला...

"प्रेम म्हणजे जाणीव

दोघातल्या विश्वासाची

प्रेम म्हणजे उणीव

एकमेकांच्या सहवासाची"


          आणि खाली नाव होत सृष्टी. ही कंमेंट वाचून का कोण जाणे पण त्याला खूप छान वाटल. असं वाटलं कि ही सृष्टी त्याच्या स्वप्नात येणारी तर मुलगी नाही ना!! त्याने तिला फक्त थँक्यू सृष्टी असा रिप्लाय दिला. खरं तर त्याला तिच्याशी बोलावंसं वाटलं, पण उगाच तिचा गैरसमज नको म्हणून तो बोलला नाही. मात्र त्या दिवशी पहिल्यांदा त्याने कमीत कमी पन्नास वेळा तरी ती कंमेंट वाचली असावी. सृष्टी देखील त्याच साईट वर लेखन करायची. या पूर्वी कधी त्याने तीच साहित्य वाचलेलं नव्हतं. पण त्या दिवसापासून तो न चुकता तीच साहित्य वाचायला लागला. तिच्या लेखनात कमालीची पॉजिटीव्हीटी होती. एखाद्या खचलेल्या, हरलेल्या व्यक्तीला नवी उमेद, नवी दिशा दाखवणार असं तीच लेखन होत. ती विविध विषयांवर लेख आणि समजप्रबोधनात्मक कथा सुद्धा लिहायची. तिच्या साहित्यावरून तरी असं वाटत होत कि ती कुणीतरी सोशल वर्कर असावी..! पण नेमकी कोण🤔?? काही कळत नव्हतं. आज निल..पूर्णत: सृष्टी च्या भोंवऱ्यात अडकलेला होता. 😊


विनय : " निल.... अरे ए...! कुठे हरवलास??? लक्ष कुठे आहे तुझं??"

निल : "अरे, विन्या..! तू कधी आलास?"

विनय : "जेव्हा तू स्वप्नात हरवला होतास ना! तेव्हाच..!"😄

निल : " काय रे!😂.. तू पण ना!, बोल, काय काम होत..? "

विनय : " अरे.. काम काय काम!! मिटिंग आहे ना! विसरलास की काय...??

निल : " ओह!! शीट्टट्ट.....!!! सॉरी यार... खरंच डोक्यातून निघालं रे माझ्या.. चल निघू या..!"

विनय : " काय रे..! बरा आहेस ना?? काही होतय का?? मघापासून बघतोय तुला.. गालातल्या गालात हसतोय..!! काय प्रेमा बिमात तर नाही ना पडला..??? "

निल : (हसत) " 😊नाही रे, असं काही नाही!! चल निघू या. "


       खरं तर निल च्या आयुष्यात कुणाचं तरी पदार्पण झालेलं होत. तो मनातल्या मनात सृष्टी विषयीचे चित्र रंगवू लागला होता. खरं तर ती कुठे राहते, काय करते, कशी दिसते, मॅरीड की अनमॅरीड याचा कुठलाही विचार न करता तो फक्त तिच्या नावाच्या आणि लेखनाच्या प्रेमात पडला होता.


       निल आणि विनय मिटिंग साठी जायला निघतात. निल त्याची गाडी काढतो आणि एफ एम ऑन करतो. आणि त्याच्या चेहऱ्यावर गाणं ऐकून एक छोटीशी स्माईल येते...


"मेरे सपनों की रानी कब आएगी तू

आई रुत मस्तानी कब आएगी तू

बीती जाए जिंदगानी कब आएगी तू

चली आ, तू चली आ"


         जनु काही हे गाणं आपल्याच साठी असावं असं त्यावेळी त्याला वाटलं. त्याच्या मनात वेगळेच तरंग उठायला लागले होते. एरव्ही फक्त कल्पनाविश्व निर्माण करणारा निल स्वतःच कल्पनाविश्वात हरवून जाईल हे कुठे त्याला ठाऊक होत. 


         निल आणि विन्या त्यांनी मिटिंग संपवून निघणारच तर इतक्यात त्यांच्या गाडीपुढे एक आजोबा चक्कर येऊन पडतात. त्यांच्या बरोबर कुणीही नसत. त्यांच्या कडे बघून ते कुणीतरी चांगल्या घरचे वाटत होते. विनय आणि निल दोघ मिळून त्यांना कार मध्ये बसवतात आणि जवळच सिटी हॉस्पिटल ला घेऊन जातात.


निल: " डॉक्टर...! प्लीज जरा या आजोबांना बघा ना! रस्त्यात चक्कर येऊन पडलेत ते. "

डॉक्टर : " सिस्टर, जरा यांना आत घ्या. डॉ सृष्टी च्या केबिन मध्ये. "


        परत सृष्टी... आज सृष्टी हे नाव आपला काही पिच्छा सोडणार नाही याची त्याला आता खात्रीच पटली. 😊 ही डॉ सृष्टी नेमकी कशी असेल आता हे त्याला जाणून घ्यावसं वाटत होत. आत केबिन मध्ये त्याला एक कोणी मुलगीशी डॉक्टर दिसत होती खरं.. पण तो नीट तिचा चेहरा बघू शकत नव्हता. वाऱ्याने हलणारा पडदा सतत मधे मधे करत होता. तिचे मोकळे केस वाऱ्यामुळे तिच्या चेहऱ्यावर येत होते. तिच्या डाव्या हातात एक ब्रेसलेट लटकत होत आणि त्यावर S हे अक्षर दिसत होत. छोटे छोटे मोती तिच्या कानाला जणू बिलगून बसले होते. तिचा चेहरा न बघता ही त्याच्या मनाच्या तारा वाजायला लागल्या होत्या.. 'मै हू ना ' मुव्ही च्या शाहरुख खान सारखं काहीस त्याच होत होत. सगळी कडे बॅग्राऊंड म्युजिक वाजू लागलं. होत...! ही सृष्टी... ती सृष्टी की पावसामधली ती... त्याला काही कळतच नव्हतं की हे काय होतय.. या पूर्वी त्याच्या मनाची अशी अवस्था कधीही झालेली नव्हती... 😊...

(क्रमशः)


Rate this content
Log in

Similar marathi story from Romance