दो दिल एक जान - भाग 1
दो दिल एक जान - भाग 1
सोशल नेटवर्क च जाळं आज सर्वत्र इतकं पसरलं आहे की, जो तो आज सोशल मीडियावर, साईट्वर गुंतलेला दिसतो. या नेटवर्किंगच्या जंगलात अनेक लोक भेटतात हरवून जातात, काही विसरतात, काही आठवणीत राहतात तर काही आयुष्य होऊन जातात. अशीच एक स्टोरी त्याची आणि तिची. ते दोघेही पहिल्यांदा याच जंगलात भेटले आणि नंतर आयुष्याची वाट सोबत चालताना तो आणि ती कधी एक झाले.... त्यांचं त्यांनाही कळलं नाही.
ओळख, मैत्री आणि प्रेम. त्यानंतर हळू हळू गतजन्मीचा, त्यांच्या अधुऱ्या प्रेमाचा प्रवास पूर्ण करण्यासाठी देवाने त्यांची भेट घडवून आणली, याच्या क्षणोक्षणी मिळालेल्या खुणा त्यांना आणखीन एकमेकांच्या जवळ घेऊन येत होत..... चला तर मग, बघूया या दोघांचा तो आणि ती पासून तर "दो दिल💞 एक जान...❤️" पर्यंतचा प्रवास.
*************
मुसळधार पाऊस सुरू होता. वाऱ्याच्या वेगाने हातात छत्री सुद्धा टिकत नव्हती. रस्त्यावर सगळीकडे पाणीच पाणी साचलेले होत. पावसाचे टपोरे थेंब डोळ्यांवर इतक्या जोरात लागत होते की , पुढल बघणं ही अशक्य झाल होत. छत्री सांभाळत कसातरी चालत होतो तर मध्येच समोरून सायकलवरून जाताना ती येऊन मला धडकली. मी खाली, ती माझ्यावर आणि त्यावर तिची सायकल असे आम्ही तिघेही रस्त्यावर पडलो होतो. पावसात चिंब भिजून ती खूपच सुंदर दिसत होती. तिचे काळे काळे डोळे, लांब केस, ते गुलाबी ओठ मी तिच्यात हरवून गेलो होतो..तर इतक्यात अलार्म वाजला.. "भर पावसात कोणी अलार्म लावला?" मी खिशे चाचपडून पाहिले...! ती माझ्यावर असल्यामुळे मी उठू शकत नव्हतो...आणि कोणी तरी सारख 'अलार्म बंद कर..!अलार्म बंद कर..!' सांगत होत. इतक्यात मग्गाभर पाणी तोंडावर पडलं आणि मी उठून बसलो. स्वप्न होत ते... ☺️
निल : " अरे यार.., काय ग चिनू??? किती सुंदर स्वप्न बघत होतो ना?? मधेच का पाणी टाकलं....??? "
चिनू म्हणजेच चिन्मयी, निल ची लहान बहीण.
चिनू : " काय रे दादा...! परत तेच स्वप्न का?? किती बोर आहे रे तुझं स्वप्न!! रोज एकाच ठिकाणी पावसात भेटतो आणि सायकल वरून पडतो...! पुढे जाण्याचा विचार आहे कि नाही?? आणि काय रे? कोण आहे कोण ही मुलगी??? प्रत्यक्षात आहे कि फक्त स्वप्नातच भेटणार?? ( चिनू चिडवण्याच्या स्वरात बोलू लागली.)
निल : " ए.. तू गप ग!! माझ्या स्वप्नातली ती... मला नेहमीच दिसत असते... काय माहीत... कोण आहे ती.. ?? जुन्या फिल्म ची एखादी हिरोईन असावी..! इतकी सुंदर आहे ती. आणि काय माहित कदाचित मागल्या जन्मीच काही तरी कनेक्शन असेल आमचं म्हूणन ती भेटत असेल रोज..! "
चिनू : " तुम्ही लेखक ना वेडे असता. 😄 त्या पुनर्जन्माच्या स्टोरी लिहून ना तू पण वेडा झालाय...!!😂 चल उठ, आवर लवकर तुझं..., मला उशीर होतोय! मला कॉलेज पर्यंत सोडून दे."
नील.., एक कवी आणि लेखक आहे. या निळ्या आभाळाखाली दिसणार हे सुंदर जग त्याच्या लेखणीने टिपण्याचा एक वेडा प्रयत्न करत असतो. संगीत जणू काही त्याचा प्राण. त्याला गाणी ऐकायला आणि गायला देखील आवडतात. घरी आई, वडील आणि लहान चिनू इतकचं त्याच कुटुंब. हा... तसे मित्र मैत्रिणी आहेत बरेच... पण त्याची सगळ्यात जवळची मैत्रीण म्हणजे त्याची लेखणी . तो तासंतास तिलाच कवटाळून बसलेला असतो. आणि सगळ्यात जवळचा मित्र म्हणजे त्याचा लॅपटॉप त्यातच कुठल्याश्या अँप वर तो लेखन करत असतो. तसा तर तो इंजिनिअर आहे. एका सॉफ्टवेअर कंपनी मध्ये चांगल्या पोस्ट वर आहे. पण लेखन त्याचा 'जीव कि प्राण.' दिसायला ही एखाद्या हिरोसारखाच. आता या हिरोला खरंच त्याच्या स्वप्नातील हिरोईन भेटेल का नाही ते बघू या पुढल्या भागात..😊
(क्रमशः)

