धंदा
धंदा
नाक्यावर येणा-या जाणा-या प्रत्येक व्यक्तीला,
तो देवाच्या नावाने भीक मागत असे..
साहेब देवाच्या नावाने द्या.
पाच,दहा रूपये द्या,
काल पासुन अन्नाचा तुकडा पोटात नाही..
द्या साहेब द्या देव तुमच भलं करेल,
तुमच्या मुलाबाळांना आशिर्वाद लाभले..
हातातलं ताट समोर करत तो केविलवाणी बोलत असे..
मग कोणी दया दाखउन त्या ताटात,
एक रुपया, दोन रुपये, पाच रुपये,
कोणी लय दिलदार असेल तर दहा रुपये,
त्यातल्या त्यात कोणी दिखाऊ असेल तर
मग पन्नास रुपये भिक मिळत असे...
मग काय चंगळच त्याची..
नाक्यावरचा लाल दिवा लागला की लगेच,
तो थांबलेल्या वहानातील प्रत्येक व्यक्तीला
विनवणी करत भिक मागत असे...
जसा हिरवा दिवा पेटला कि
रस्त्याच्या बाजुला शौचालय कडे पळत जाऊन उभा रहात,
अन् शौचालयाला येणा-या जाणा-याला भिक
मागत असे..
तसा तो तरुण हट्टाकट्टा होतो..
केस,दाढी वाढलेली मळके कपडे
हातात छोटया आकाराचे ताट भिकारी असल्याची पुर्ण ओळख
त्याच्यात स्पष्ट दिसत होती...
सुर्याच्या उगवती पासुन तर सुर्यास्त होई पर्यंत भिक मागणे त्याचे ते काम होते..
दिवसभर दयेणे मिळवलेले अन्न फळफळाऊ तो खात असे,
उरलेलं जवळ असलेल्या पिशवीत जमा करत असे..
एखाद्या वाटसरुणे त्याला विचारले अरे तु हट्टाकट्टा आहेस !
मग भीक का मागतो, त्यावर तो म्हणत असे मी भिकारी आहे...
द्या साहेब काहितरी खुप भुक लागली आहे..
असे तो बेंबीच्या देठा पासुन बोलत असे...
कि समोरच्याला त्याची किव आली पाहिजे...
अन् समोरच्यान् खिशात हात घातलाच पाहीजे..
संध्याकाळ होता तो वाण्याच्या दुकानात जात असे..
जमा झालेली चिल्लर शे दोनशे वाण्याला देत असे..
व चिल्लर ऐवजी नोटा घेत म्हणत असे....
आज धंदा कमी झाला शेठ,
आज कल लोक साले दिल खोलकर नही देते....
