Stifan Khawdiya

Tragedy

4.8  

Stifan Khawdiya

Tragedy

देव /बाप

देव /बाप

2 mins
974


बेशुद्धावस्थेत त्याला रूग्णालयात 

दाखल केले होते..

त्याच्या तोंडातून लाळ गळत होती

श्वास घेण्यास त्याला अवघड जात होतं

विष्ठा,मुत्र त्याने घातलेल्या कपड्यात केले असल्यामुळे अगदि त्याच्याकडे दुर्गंध येत होता.

त्याला तात्काळ खोलीत घेऊन त्यावर उपचार सुरु केला होता.

त्याचे हृदयाचे ठोके,रक्तदाब अति प्रमाणात दर्शवित होता.

पुढील उपचारासाठी त्याला अतिदक्षता विभागात ठेवण्यात आले होते. 

आधुनीक मशीन द्वारा त्याच्या पुर्ण शरिराची हालचाल क्षणाक्षणाला कळत होती

जणू जीवन मरणाच्या उंबरठ्यावर थकलेले शरिर घेऊन तो तिथ झोपला होता.

रक्त तपासणीचे कार्य पण तातडीने सुरू होते.

कृत्रिम श्वास,सलाईन,विविध प्रकारचे इंजेक्शन

त्याला मिनटामिनटाला देते होते. 

ब-याच प्रयत्नात ही त्याची प्रकृती चिंताजनक होती

त्यात त्याच्या रक्त तपासणीत खुप काही दोष आढळून आले होते.

रक्त प्रणाम कमतरता,किडणीच्या कार्यात अडथळा,

पाण्याचे प्रमाण कमी,बरेच दोष दर्शवित होते.

तसा तो ह्याच गावचा होता,मोलमजुरी करून त्यानं आपला प्रपंच थाटला होतो.

बघता बघता त्याने त्याच्या सर्व जबाबदा-या पार पाडाल्या होत्या.

दोन्ही मुलांना चांगले शिक्षण देऊण योग्य मार्गाला लावले होते.

पत्नीच्या मृत्यूनंतर तो थोडा खालावला होता

मुलं सरकारी नोकरीला असल्यामुळे वेळोवेळी बदली होत असत,

तसा तो कधी ह्या मुलाकडे कधी त्या मुलाकडे रहात असे. 

पण कालांतराने अधीक वृध्द अवस्थेत स्वतःला सांभाळणे त्याला जमत नसे.

चालतांना तोल जात असे,दम भरत असे 

त्यामुळे तो एका जागेवर पडून रहात होता

सुन मुलगा नोकरीला असल्याने बघता बघता त्याच्याकडे दुर्लक्ष करत असे.

तरी तो स्वत:ला कसाबसा सावरत असे.

मुलाची बदली जिल्यात झाल्याने आता त्याचे कुटुंब जिल्यात स्थलांतर करणार होतो.

त्या आगोदरच दोघा भावात वडिलांना कोण सांभाळणार यावर वाद घालत होता.

अशा स्थितीत रहात्या घरता त्याला एकट्याला सोडून स्वताच्या संसाराचे स्थलांतर मुलाने केले.

त्याला वाटल मोठा भाऊ येऊन वडिलांना सोबत घेऊन जाईल,पण अस काही घडलच नाही 

चार ते पाच दिवसांनी शेजा-यानी अचानक पाहील्यावर त्याला तातडीने रुग्णालयात दाखल केले होते.

हि सर्व हकीकत रुग्णालयचे समतिपत्र भरतांना त्याला दाखल केलेल्या शेजा-याने कर्मचारी भगीनीला सांगीतली होती.

बराच वेळ गेला तरि शेजा-या शिवाय त्याच्या समाचाराला कोणी आले नव्हते

औषधाच्या जोरावर त्याने ति रात्र पार केली होती 

सकाळच्या वेळी पण तो त्याच अवस्थेत होता 

अर्ध मेलेला जीवन मरणाच्या उंबरठ्यावर झोपलेला 

सुर्य माथ्यावर येण्याच्या वेळेस त्याचे दोन्ही मुलें रुण्नालयात आले होते.

डाॅक्टरांसोबत वडिलांच्या तब्येतीची चौकशी केली होती.

सर्व स्थिती चिंत्ताजनक होती तरी दोघा भावात हमरीतुमरी चालली होती.

रुग्णालयात त्याच्याकडे कोण थांबणार बिल कसा भरायचा

या वायफट गोष्टीत त्याचा वाद निर्माण झाला होता.

ज्या वडिलांनी उपाशी राहून मुलांच संगोपन केल होत

तीच मुल आता वडिलाची जबाबदारी झटकत होते

सारी हकीगत मनाला कसी बोतच होती.

स्वता उपाशी राहून मुलांना पोटभर भाकर तो खावू घालत होता

अन् आता तीच मूल स्वता पोटभर खावून 

बापाला उपाशी मारत होते.

कसा हा विचित्र भोग,बाप होण्याची ही शिक्षा 

तिथ तो मरणाची प्रतिक्षा करत बेशुद्धावस्थेत निजला होता

अन् देव असणारा डाॅक्टर त्याला मृत्यूच्या दारातून जीवनाच्या मार्गावर आणण्याचा प्रत्यन करत होता.

सार कसं विचित्र वाटत होतं त्या देहाची कवी येत होती 

अन् नकळत पापणी ओली होत होती.

मनात एकच प्रार्थना करत होतो तु एकदा असा बाप होऊन पाहा  

नाही तर देवा ह्याला मरण दे

देवा याला मरण दे.


Rate this content
Log in

Similar marathi story from Tragedy