तिचा हट्ट
तिचा हट्ट
कधी कधी तिच्या हट्टा मुळे मला राग यायचा. ती अशी का वागते काही कळतचं नव्हत.
शब्दांना शब्द लागुन शाब्दीक भांडण व्हायचं. बरचा वेळ दोघांचाचं कलह.
घरकुलात अशांतता घरची मंडळी एक बाजुला अन् आम्ही दोघ एक बाजुला.
मग तिनचं स्व:ताला सावरत माझ्यावर रुसुनं घरकामाला जुंपत असे. मी आपला रागारागानं बेडरुम मघे पुटपुटत बसायचो. उगाच सुट्टीचा वार कामावर असलेलच बर असत.
घरी राहिलं की हा प्रकार एक तर मरमर काम करा. अन् एक दिवस सुट्टी असते त्यात हा त्रास स्व:ताशी पुटपुटत विचार करत बसायचो विचारांची चढ उतर करता करता दुपार कधी व्हायची कळल नव्हत. मग अचानक चला जेवायला, सोडा आता राग असा तिन आवाज द्यायचा.
अस वाटायच हा काय प्रकार! अन् विचारांच एक वेगचं वादळच सुटायच.
क्षणात अस जानवायचं आपनच स्वार्थी कधी एक कणभर पण अस वाटल नाही ती पण माझ्यासारखी थकत असेल. संपुर्ण घरकुल सांभाळतांना.
मला तरी सुट्टी असते आठवड्याला एक. पण तिला तर सतत कामचं बारा माह. घर घरातील काम या पलीकडे तिला विश्वचं नव्हत . कधी कुठे जायच म्हटल तरि घरकुल नडत असे.
स्व:ताच्या आनंदाचा त्याग करण हे तिला सहज हसत हसत जमतं. घरातील कोणी कस वागल तरि सर्वांशी प्रेमान वागायच.
अन् चार शब्द अपुलकिचे बोललो तर ती बहरलेल्या वेली सारखी वाटायची. तिच्या पण मनिषा आहेत म्हणुन ती हट्ट करते. याचा कधीच विचार केला नाही हे अस असुं शकत.
अशा निस्वार्थी प्रेमाच वागनं निरागस आहे याची जान मला झाली. म्हनुण आजपण तिचा हट्ट हवाहवासा वाटतो.
