एक संध्याकाळ अशी
एक संध्याकाळ अशी
आईला सौभाग्याच्या श्रृंगारात पाहूनमाझे डोळे गच्च भरुन यायचेअन् क्षणातचं विचारात दंग होऊन वरंड्यातल्या बाजेवर अचेतन असल्यासारखा होऊन घडून गेलेल्या परस्थितीचा उजाळा करतदिवटणीवर लटकवलेल्या चाबूकला एकटक पहात वर्तमानातजणू मी भुतकाळ जगायचोछनछनछन दुरवरुनच बाच्या टांग्याचा आवाज यायचा सकाळच्या चार गाड्यांचे भाडे मारुन बा न्याहरीला घरी यायचा आल्या आल्या खेचराला हलक करुन पाणी पाजून घास टाकायचा अन् त्याच्या पाठिवरुन हात फिरवत म्हणायचा... माझ्या लेकरा घे चारापाणीदमला ना कर घडीभर आरामम्या पण माझा चारा घेतो खाऊनसुमन ये सुमन वाढ तुकडा जायचंय परत आज बाजार हाय गावचा आवर ग पटकनमी आपला बाच्या हातातला चाबूक घेऊन वरंडाभर चल मेरे घोडे टिक टिक टिक धावत सुटायचोआर पडशील र माझ्या वाघ्या बा एका सुरात मला बोलायचा दम नाह्य पोराला दिसभर पळत सुटतोय आई वैतागुन बोलायची
न्याहरी करता करता आई बाला सांगायची राजगावच्या पाहुण्यानं निरोप धाडलाय आपल्या वैशूला मागण आनलंय काय करायच निरोप धाडायचा का धाड बा आनंदान बोलायचा चांगल असेल तर जमून टाकू सोयरीक पोरगा काय करतो समदी इचारपूस करुन या म्हणाव पोरीला पाहायलात्याची न्याहरी आवरुन बा बाजाराकडे रवाना होताना बाच्या चेहऱ्यावर एक वेगळीच निराशा दिसायचीपण बा न कधीच त्याच दु:ख त्याची अडचण कुणाला सांगितल नाहीबघता बघता वेळ भरभर सरली ताईचं लग्न थाटात करुन दिलं तोपर्यंत मी आठवी पास होऊन पुढच्या वर्गात गेलो होतोसारं कसं सुरळीत असतांना एक दिवस सरतेवेळी सावकार येऊन बा ला कर्जा बद्दल बोलून गेला नाना पोरीच लग्न होउण साह महिन झालं आता घेतलेल कर्ज परत कर बाबानाही तर मी घरावर हक्क गाजवील अवघ्या दोन दिवसाची वेळ देतो तुला अस धमकावून सावकार निघुन गेलाआव्ह काय केल तुम्ही आई ढसाढसा रडू लागली सांगायच तरि लगीन लांबनीवर टाकल असतंबा एका जागेवर बराच वेळ बसुण बोलला मी तरि काय करणार पोरिच्या सुखासाठी केल समद
दोन दिवस लय भयानक सरली कुणी कुणीचं बा ला मदत केली नाहीबा पैसासाठी गोतावळ्यांच्या दारी फिरला पण काय बी फायदा झाला नाय शेवटी सावकारान घरावर हक्क घेतलाबा चा टांगा पण त्यान हडपलाबा तर पुरता वेडावून गेला एका संध्याकाळी बा समदं सोडून कुठ निघुन गेला काहीच माहित नाहीआता कोणाची ही मदत नाही सहानुभूती नाहीसारंच संपल्यासारखं झालंआई तर पूर्ण धास्तावली होती सारखीच स्वतःशीच पुटपुटायची आवरायचंय आता आता येईलच टांगाथकला असल तुझा बा सोन्याकाय कराव कळतंच नव्हतं स्वतःची कीव यायचीवाटायचं विहिरीत धोंडा बांधून उडी टाकावी अन् मरुन जावंपण हिम्मतच नव्हती होतदु:खाच्या ओघात सुखाचा झरा शोधत शोधतजीवनाचे कडू गोड अनुभव घेत खूप कष्टान मी सार समदं परत उभ केलं पण आजपर्यंत बा चा पत्ता नाहीआई आज पण त्याच भ्रमात जगतेबा परत येईल या आशेवर रोज सायंकाळी सौभाग्याच्या शृंगारात ती स्वतःला बा साठी सजवतेपण आईला काय ठाव ती एक संध्याकाळ अशी आहे की तिची कधीच सकाळ होणार नाही
