Stifan Khawdiya

Others

4.6  

Stifan Khawdiya

Others

पिंजरा

पिंजरा

2 mins
266


काडीमोड होऊन एक वर्ष झालं. मुलावर हक्क तिला मिळाला. तशी ती शिकलेली सरकारी खात्यात मोठ्या पदावर होती. घडलेल्या घटनेचा विसर पडावा म्हणून तिनं स्वतःची बदली जिल्ह्यात करुन घेतली. जिल्हा म्हटलं की मोठं शहर. धावपळीची अनोखी दुनिया. वेळ कसा जायचा कळतचं नव्हत. आता ती हळुहळु सावरली होती. जरी काडिमोड देऊण बाप म्हणारा त्याचं कर्तव्य विसरला होता तरी मात्र तिन आईची भुमिका ठाम बजावली होती. लागणारं सारं सुख तिनं त्या आठ वर्षाच्या चिमुकल्याला दिल होत. शिक्षणसाठी त्याला उत्तमाोत्तम इंग्रजी शाळेत घातल होत. तिच्या मायन तो सुखावला दिवस कसे आनंदान चालले होते. पण कधी कधी त्याच्या प्रश्नांनी ती भुतकाळातील घटनेचा सामना करत होती. त्याच्या कोणत्याचं प्रश्नांच उत्तर ति देऊ शकत नव्हती. त्याला टाळाटाळ करुन सत्य लपवून ती स्वतःला अंधारात ठेवत होती. याचा परिणाम त्याच्यावर होत होता. ती घरकामात असली की तो बाल्कनीत जायचा अन् येणाऱ्या जाणाऱ्याला एकटक बघत बराच वेळ उभा राहायचा. त्यातल्या त्यात आई बाबा बरोबर फिरायला निघालेल्या लेकरांना पाहून तो गालातल्या गालात हसायचा अन् ते दृश्य दृष्टीआड गेल्यावर त्याच्या चेहऱ्यावर एक वेगळीच निराशा यायची अन् तो तेचं प्रश्नं तिला विचारायचा. ती नेहमीप्रमाणेच त्याला टाळायची. असं रोज चालायचं. आता त्याच लक्ष कशातच लागत नव्हतं. खेळणं न शिक्षण जणू त्याचं बालपण कुठं हरवलं होतं.


जरी सारं जीवनाचं आकाश त्याच्यासाठी उडण्यास खुलं होतं तरी त्याच्या आई बापाच्या एक चुकीमुळे त्याचं अस्तित्व अशा एका पिंजऱ्यात कैद झालं होतं. याची थोडीशीसुद्धा जाणीव कोणाला नव्हती. तो असा पिंजरा होता. कधी न खुलणारा पिंजरा जरी सुखाचा सागर त्याच्या वाटेला तिन दिला होता तरी त्याच्यासाठी तो फक्त... पिंजराचं होता फक्त पिंजरा.  


Rate this content
Log in