धागेदोरे नात्यांचे
धागेदोरे नात्यांचे
"आई मला एकत्र कुटुंबात नाही लग्न करायचं...!" किती वेळा सांगितलं....!"त्या आलेल्या स्थळाला नकार दे. आयुष्यभर स्वयंपाक, धुनी भांडी करूनच माझं आयुष्य जाईल. एकत्र कुटुंब म्हणजे सारखी भांडण, एकमेकांविषयी गॉसिप, त्यातून तिरस्कार यातुन मानसिक संतुलन बिघडणार.
"काम सुनेनच करायचं बाकीची आयते खाणार. त्यातून पुन्हा काहीतरी चूक काढून सुनेलाच दोष देणार. मला नाही जायचं अशा ठिकाणी,"मीनाक्षी आईला म्हणाली.
आई,"अग एकदा विचार कर . एकत्रित कुटुंबातही किती आनंदी होतें लोक. एकमेकांच्या विचारांचाही आदर करत होतें. घरातील स्त्रिया एकमेकींशी किती आपुलकीने वागत होत्या.त्यांनी तुला पसंद केलंय. मला तर मनानं खूप चांगली वाटली माणसं....! माझ्या मैत्रीनेने त्यांच्याबदल सांगितले,खूप माणसं चांगली आहे. स्थळं जावून देऊ नकोस असं ती म्हणाली," मुलीचं कल्याण होईल....!
मीनाक्षी मध्यमवर्गीय कुटुंबात वाढलेली,स्वविचारी मुलगी. तिच्या बाबांची साथ आईला खूप कमी लाभली. मीनाक्षी दिसायली सुंदर,नाकी डोळी रेखीव, आत्मविश्वासू.
समीर आणि त्याच्या घरातील लोकांना पाहताच आवडलेली होती. मीनाक्षीला मात्र एकत्रित कुटुंबात अजिबात राहायची इच्छा नव्हती.
आईचं बोलणं झाल्यावर मीनाक्षी नाही म्हणाली,मला नाही करायच लग्न त्याघरी.
त्यापेक्षा मला माझा राजाराणीचा संसार हवंय. ज्यामध्ये मी माझ्या मनाची राणी असेल.कुणाची कटकट नाही, मला हवा तसा मी संसार करेन.
आई "अरे बाळा मी ही तुला एकत्र कुटुंबात दिलं नसतं,पण तुला खूप समजून घेतील त्या कुटुंबात. तुला हवं तसं स्वातंत्र्य मिळेल. खूप काळजी पण करणारी लोक आहेत ही. आईने एकटीने कसं आयुष्य घालवलंय बघतेस ना....!त्यामुळे तू एकदा विचार कर.साथ देणारी माणसं आहेत.एकदा विचार करावा अशी माझी इच्छा आहे. तुझं मन नक्कीच जपतील.
"आईच्या सांगण्यावरून मीनाक्षी तयार झाली.आईचं मन मुलांसाठी तुटत असतं त्यांचं चांगलच व्हावं अशी आईची इच्छा असते.
मीनाक्षीला त्या लोकांनी लग्नाआधी घर पाहण्यासाठी बोलावलं होतं,जाताना सासूबाई आवर्जून सांगून गेल्या होत्या.
मीनाक्षी आणि तिचे घरचे मंडळी काका, मामा, आत्या तिच्या होणाऱ्या सासरी गेले. त्यांचं खूप छान स्वागत केलं. त्यांना मुलीकडचे आहेत असं वाटलंही नाही. चहा, सरबत नाश्त्यानंतर मोठयाची चर्चा सुरु झाली. सर्वात मोठे वडीलधारे असणारे केशवराव म्हणाले , मीनाक्षी आवडल का तुझं घर. तुला काही शंका असेल तर विचारून घे. मीनाक्षीने फक्त मान डोलवली.
तुला एक सांगतो, या घरात सगळ्यांना स्वातंत्र्य आहे. त्यामुळे एवढं मोठं कुटुंब टिकलं आहे. त्यादिवशी मोजकिच माणसं तुला पाहायला आली होती. तुला सर्वांची ओळख करून देतो, मीनाक्षी फक्त ऐकत होती, सगळ्या जावा चांगल्या शिकलेल्या होत्या. जॉब सांभाळत गृहिणीपद सांभाळत होत्या. एकमेकींना मदत करून वेळेचे मॅनेजमेंट सांभाळत होत्या. असं मीनाक्षीच्या लक्षात आले. या घरात कुणालाही बंधने नाहीत.त्यामुळे अजूनही एकत्रित गोकुळ नांदतय. त्यामुळे अजून एकत्रित चूल आहे.
त्यानंतर मीनाक्षी आणि तिचा होणारा नवरा समीरला एकत्र बोलायला पाठवलं.
समीरने आधी बोलायला सुरुवात केली,
आवडली का माझी फॅमिली...?
मीनाक्षी, "हो खूप छान आहे फॅमिली . तुम्ही पाहून गेलात तेव्हा मला एकत्रित कुटुंबात येण्याची इच्छा नव्हती. पण आता तुमची फँमिली पाहून माझे काही गैरसमज दूर झाले.
बोलता बोलता सगळा वाडा समिरने मीनाक्षीला फिरून दाखवला.
समीर, तू आल्यावर अजून कळेल माझी फॅमिली तुला....! माहेरीही जाऊ वाटणार नाही एवढ प्रेम देणारी माणसं आहेत.
दोघांच्या गप्पा झाल्या की ते दोघे बाहेर आले. केशवराव म्हणाले सुनबाई वाडा आवडला का आमचा...?
मीनाक्षी,हो खूप छान आहे.
कोणीतरी एकाने देण्याघेण्याचं विचारलं,
केशवराव म्हणाले, आम्हाला काही नको तेवढी नारळ आणि मुलगी द्या. तुमच्या इच्छेने मुलीला काही करायचं असेल तर करा. लग्नाची तारीख आणि त्याच नियोजन करूनच मीनाक्षी आणि तिचे घरचे निघाले.
मीनाक्षी घरी आल्यावर समीर आणि त्याच्या घरातील लोकांचा विचार करत होती. एवढी श्रीमंत असूनही एकोपा किती त्यांच्यात,श्रीमंत असूनही गर्व तर आजिबात नव्हता. समीर मनाने खूप छान होता. तोही तिला आवडलला.
काही महिन्यातच दोघांचे लग्न थाटामाटात पार पडले. मीनाक्षीला आजिबात वाटले नाही ती या घरात नवीन सुन म्हणून आली आहे. तिला भरभरून मिळालेल्या प्रेमाने तिने सर्वाना आपले केले.
"आज किचनमध्ये तिचा पहिला दिवस. गाजरचा हलवा करायचा तिने ठरवले. त्यावर तिला प्रत्येकाने काहींना काही मदत केली. कोणी गाजर किसून दिले तर कोणी बदाम, काजू चिरून अशा प्रकारे सर्वांनी मिळून काम केलं. हलवा खाल्यावर मीनाक्षीचं तोंडभरून कौतुकही झालं.
दुसऱ्या दिवशी मीनाक्षीला अचानक चक्कर आली. ते लग्नामध्ये झालेल्या धावपळीमुळे अशक्तपणा आला होता . ज्यावेळी तिला जाग आली,तेव्हा अवतीभवती तिच्या सगळे टेन्शन मध्ये उभे होतें. सासूबाईं तिच्यासाठी गरम सूप घेऊन आल्या. सगळ्यांना पाहताच ती उठून बसली. तिला सगळ्यांनी आराम करायला सांगितला. तबेत कशी आहे चौकशी केली . रात्रभर तिच्याबरोबर रूममधेच बाकीचेही झोपले होतें,तिच्या काळजीपोटी हे तिला जेव्हा समजलं, "तेव्हा तिच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले.आज विणलेला प्रेमाचा एका धाग्याने किती मजबूत आणि टिकाऊ नात्याचे दोरे विणल्याचे तिच्या लक्षात आले. एकत्र कुटुंबाविषयीचे तिच्या मनातील मळभ आज पूर्णपणे नाहीसे झाले.

