Ajay Nannar

Horror Crime Thriller

4.3  

Ajay Nannar

Horror Crime Thriller

डॉक्टर Death.....🗡🗡💉💉

डॉक्टर Death.....🗡🗡💉💉

3 mins
380


नवे वर्ष नुकतेच सुरू झाले होते. नव्या वर्षाचा शुभारंभ करण्यासाठी अमित ने हॉस्पिटल चे उदघाटन करण्याचे  ठरवले. अमित आता साधासुधा नाही तर डॉक्टर अमित देशमुख झाला होता. गावातच नाही तर शहरात देखील अमित चे हॉस्पिटल चांगलेच प्रसिद्ध झाले होते. लोक येता जाता नमस्कार घालत आणि जर लांबुनच जर डॉक्टर दिसले तर लोक " ये डॉक्टर आले, डॉक्टर आले म्हणत.....बाहेरील लोकांसाठी डॉक्टर तर गावातील लोकांसाठी देवमाणूस होते. कारण डॉक्टर वर सगळ्यांचा विश्वास होता. डॉक्टर खूप साधे आणि भोळे होते जर कोणाकडे देण्यासाठी पैसे नसतील तर डॉक्टर त्याचे पैसे न घेता उपचार व औषधांचा खर्च स्वतः करत. कारण डॉक्टरांचे म्हणणे होते की कोणत्याही रूग्णाची सेवा हे त्यांचे प्रथम कर्तव्य आहे. डॉक्टरांनी कित्येक रूग्णांना मरणाच्या दारातुन बाहेर काढले होते म्हणून त्यांचे नाव एवढे मोठे होते.


    एकेकाळी गावात खूप मोठा विषाणू पसरला त्या विषाणूचा प्रभाव इतका होता की गावातले लोक आजारी पडले. गावात एकच हॉस्पिटल होते म्हणून सगळे लोक हॉस्पिटलमध्येच गर्दी करून होते. डॉक्टरांना प्रत्येक रूग्णाचा जीव वाचवायचा होता म्हणून काही रूग्ण ICU मध्ये तर काही वेगवेगळ्या खोलीत ठेवले होते. डॉक्टरांनी रूग्णांच्या नातेवाईकांना धीर दिला आणि सांगितले " हे बघा घाबरण्याचे काही कारण नाही सगळे होतील बरे " आम्हाला आमच काम करू द्या आणि आपण सगळे आपआपल्या घरी जा आणि उद्या या. आणि सगळे घरी गेले.


    डॉक्टरांनी उपचार सुरु केले. सगळ्या पेशंट ना भुलीच इंजेक्शन दिले. भुल दिल्यावर डॉक्टरांनी कोणाची किडनी, कोणाचे डोळे, तर कोणाचे ह्रदय काढून घेतले तर काहींचे मेंदू देखील बाहेर काढले. आणि ते एका काचेच्या बाटलीत भरून अडगळीच्या खोलीत ठेवले. कारण कोणाच्या हाती लागले तर सगळे समोर येईल. रात्री पर्यंत सगळ्या पेशंट ची काटछाट झाली आणि हॉस्पिटल बंद केले.


    दुसऱ्या दिवशी सकाळी सगळे लोक हॉस्पिटलमध्ये आले आणि एकच गोंधळ निर्माण झाला कारण सगळे पेशंट गायब झाले होते आणि डॉक्टर ही फरार झाला. गावातील लोकांनी पोलीस स्टेशन मध्ये जाऊन हॉस्पिटलमधील सगळ्या प्रकाराची माहिती दिली. डॉक्टरांनी गावकऱ्यांना वचन दिले की आम्ही तुम्हाला न्याय मिळवून देऊ आणि " त्या नराधम डॉक्टर च्या मुस्क्या आवळु. पोलिसांनी काही डिटेक्टीव आणि स्पेशल फोर्स पोलिसांकडे दिला मात्र हे काही साधेसुधे प्रकरण नसुन यामागे खूप मोठे रँकेट आहे आणि आपल्याला ते शोधून काढावेच लागेल. पोलिसांनी CID ची मदतीने तपासणी सुरू केली आणि शेवटी तो नराधम डॉक्टर सापडलाच . डॉक्टर वेष पालटून पोलिसांना गुंगारा देऊन पळून जाण्याचा प्रयत्न करत होता. पण शेवटी सापडलाच. पोलिसांनी डॉक्टरची तपासणी सुरू केली पण डॉक्टरांनी कबूल केले नाही ते म्हणाले " आहो मी गरीब डॉक्टर आहे ओ , मी पेशंट ची सेवा करतो आणि मी का कुणाचा जीव घेईल, मला सोडा ओ, मी काहीच नाही केलयं. पोलिसांनी डॉक्टर ला चांगलाच हिसका दाखवला पण डॉक्टर कबुलच होत नव्हते. 


    पोलिसांनी सगळ्या हॉस्पिटलची झडती घेतली आणि जे समोर आले ते पाहून पोलिस थक्क झाले कारण हॉस्पिटलमध्ये रक्ताचे पार पाट वाहत होते. आणि अडगळीच्या खोलीतून खूप घाण वास येत होता. पोलिसांनी सगळा प्रकार विडीओ कँमेऱ्यात रेकॉर्ड केला आणि जवळपास 15 ते 20 डेड बॉडीज ताब्यात घेतल्या. डॉक्टरांनी शेवटी सगळे गुन्हे कबूल केले आणि हे सगळे पैशासाठी आणि दागिन्यांसाठी केले. डॉक्टरांनी भोळ्या भाबड्या लोकांचा फायदा घेतला होता.


शेवटी पोलिसांनी डॉक्टर विरूद्ध पुरावे गोळा करून ही केस कोर्टात आणली आणि त्या नराधम डॉक्टर ला मोठ्यात मोठी शिक्षा व्हावी म्हणून प्रयत्न केले. आणि केस 15 - 20 दिवस चालली आणि शेवटी तो निकालाचा दिवस आलाच आणि कोर्टाने " गुन्ह्याला माफी नाही " म्हणून डॉक्टर ला फाशीची शिक्षा सुनावली. शेवटी डॉक्टर ला फाशी झाली पन त्या गरीब कुटुंबातील लोकांचा कोणी न कोणी व्यक्ती गेला होता म्हणून त्यांची जबाबदारी आता पोलिसांनी घेतली आणि त्यांना राहायला घरे दिली आणि आर्थिक मदत ही केली. गावात एक चांगले हॉस्पिटल बांधले आणि त्यात पोलिस बंदोबस्त ठेवला.


  शेवटी गावाला न्याय मिळाला आणि सगळे गाव आता या संकटातून मुक्त झाले होते म्हणून गावात सगळीकडे आनंदीआनंद होता. आणि आता सगळे गुण्यागोविंदाने संसार करू लागले.


Rate this content
Log in

Similar marathi story from Horror