The Stamp Paper Scam, Real Story by Jayant Tinaikar, on Telgi's takedown & unveiling the scam of ₹30,000 Cr. READ NOW
The Stamp Paper Scam, Real Story by Jayant Tinaikar, on Telgi's takedown & unveiling the scam of ₹30,000 Cr. READ NOW

Charumati Ramdas

Inspirational

3.8  

Charumati Ramdas

Inspirational

डोळे आणि कान

डोळे आणि कान

3 mins
1.3K
लेखक: विताली बिआन्की

अनुवाद: आ. चारुमति रामदास


जंगलाच्या वाकड्या-तिकड्या नदीच्या काठावर इन्क्वोय-बीव्हर* राहात होता. बीव्हरची झोपडी मस्तंच होती: त्याने स्वतःच लाकडं कापले, स्वतःच पाण्यातूंन त्यांना खेचंत आणलं, स्वतःच भिंती आणि छत बनवली.

बीव्हरचा फ़र-कोटपण मस्त आहे: हिवाळ्यांत ऊब असते, आणि पाण्यांतसुद्धां त्याच्यामुळे ऊबदार वाटतं, हवा पण त्याला नाही उडवंत.

बीव्हरचे कान फार तिखट आहेत : मासळीचे शेपूट पाण्यांत फडफडलं, कुठे एखादं पान पडलं, तरी त्याला सगळं ऐकू येतं.

पण बीव्हरच्या डोळ्यांनी मात्र त्याला धोका दिलाय: खूप कमकुवत आहे त्याची नजर. बीव्हर अर्ध-आंधळा आहे, आपल्यापासून शंभर पावलांच्या दूर पर्यंतपण त्याला नाही दिसंत.

पण बीव्हरच्या शेजारी, जंगलातल्या स्वच्छ तळ्यांत राहत होता होत्तीन-राजहंस. सुन्दर होता आणि गर्विष्ठपण, त्याला कुण्णाशीच मैत्री करणं आवडायचं नाही, ‘नमस्कार’सुद्धां अगदी मन नसल्यासारखा करायचा. आपली पांढरी मान उंचावून शेजा-याकडे अगदी तुच्छतेने बघायचा – त्याला सलाम-नमस्कार केला, तर बस, आपली मान किंचित हालवून द्यायचा.   

एकदा काय झालं, की इन्क्वोय- बीव्हर नदीच्या काठावर काम करंत होता, श्रम करंत होता : पहाडी पिंपळाला दातांनी कुरतडंत होता. चारीकडून कुरतडंत-कुरतडंत त्याने त्याच खोड अर्ध करून टाकलं, जो-याचं वारं सुटलं आणि पहाडी पिंपळ पडलं. इन्क्वोय-बीव्हरने सोलून-सोलून त्याच्या काठ्या केल्या आणि एक-एक करून त्यांना खेचंत नदी पर्यंत आणू लागला. एक काठी आपल्या पाठीवर टाकली, एका हाताने तिला पकडून ठेवलं – अगदी जसा कोणी माणूस चालतोय, बस तोंडांत पाइपच धरायचाच शिल्लक आहे.

अचानक बघतो काय, की नदींत होत्तीन-राजहंस तरंगतोय, अगदी जवळ. इन्क्वोय-बीव्हर थांबला, पाठीवरची काठी खाली टाकली आणि आदराने म्हणाला : “ऊज़्या-ऊज़्या!”

म्हणजे नमस्कार म्हणतोय.       

राजहँसाने आपली गर्विष्ट मान उचलली, हळूच डोकं हालवलं आणि म्हणाला.

 “ तू तर इतक्या जवळ आल्यावर मला बघितलं! मी तर तुला नदीच्या वळणावरंच बघितलं होतं. असल्या डोळ्यांमुळे तर तू मरूनंच जाशील.

आणि तो इन्क्वोय-बीव्हरची खिल्ली उडवूं लागला:

“अरे, आंधळ्या! तुला तर शिकारी हातांनेच पकडून खिशांत टाकून घेतील.”


इन्क्वोय-बीव्हर ऐकंत होता, ऐकंत होता, आणि मग म्हणाला:

“ह्यांत काही शंकांच नाही, की तुझी नजर माझ्यापेक्षा तीक्ष्ण आहे. पण तू काय एखाद्या शांतश्या लाटेची छपछप तिथून, नदीच्या तिस-या वळणापासून, ऐकूं शकतोस कां?

“तू तर बस, कल्पना करतोय, काही लाटे-बीटेची छप-छप नाहीये. जंगलात एकदम शांतता आहे.”

इन्क्वोय-बीव्हर थोडा थांबला, आणि त्याने पुन्हां विचारलं:

“आतां ऐकूं येतेय का छप-छप?”

 “कुठे?” होत्तीन-राजहँसाने विचारलं.

 “अरे, तिकडे, नदीच्या दुस-या वळणावर.”

“नाही,” होत्तीन-राजहँस म्हणाला, “काहीच ऐकू येत नाहीये. जंगलांत शांतताच आहे.”

इन्क्वोय-बीव्हर आणखी थोडा थांबला. पुन्हां विचारलं:

“ऐकतोय?”

 “कुठे?”

 “इथे, नदीच्या तोंडाशीच, अगदीच जवळच्याच पाण्यांत!”

 “नाहीं,” होत्तीन-राजहँसाने उत्तर दिलं, “काहीसुद्धां ऐकू येत नाहीये. जंगलांत शांतताच आहे. तू उगाचंच विचार करतोय.”

 “तर, मग,” इन्क्वोय-बीव्हर म्हणाला, “गुडबाय. तुझे डोळे तुलाच लखलाभ असोत, माझ्यासाठी तर माझे कानंच बरे आहेत”

त्याने पाण्यांत बुडी मारली आणि लपून गेला.

होत्तीन-राजहँसाने आपली पांढरी-शुभ्र मान उंचावली आणि गर्वाने चारीकडे बघितलं: त्याने विचार केला की त्याची तीक्ष्ण नजर नेहमी वेळेपूर्वीच धोक्याचा अंदाज लावते, आणि म्हणूनंच तो कशालांच घाबरंत नव्हता.

तेवढ्यांत जंगलाच्या मागून एक हल्की-लहानशी नाव, शिकारी-नौका उसळंत बाहेर आली. त्यांत एक शिकारी बसला होता.

शिका-याने बन्दूक उचलली – आणि होत्तीन-राजहँस आपले पंखसुद्धां फडफडवूं नाही शकला, की गोळीचा आवाज़ घुमला.

होत्तीन-राजहँसाचं गर्विष्ठ डोकं पाण्यांत पडलं.

म्हणूनंच जंगलांत राहणारे हुशार लोक म्हणतात, “जंगलात सगळ्यांत महत्वाचे आहेत कान, आणि त्यानंतर – डोळे.


-------------------------------------------------------------------

*बीव्हर – मऊ लोकर असलेला प्राणी, जो पाण्यांत आणि जमिनीवर राहतो..”Rate this content
Log in

Similar marathi story from Inspirational