Anuja Dhariya-Sheth

Classics

4.5  

Anuja Dhariya-Sheth

Classics

चंद्रमौळी झोपडीची आठवण

चंद्रमौळी झोपडीची आठवण

4 mins
318


रुख्मिणी आणि शंकर अगदी साधे मोलमजूरी करणार जोडप.. गावा पासून अगदी थोड्या अंतरावर यांचं झोपडं.. गाय, कुत्रा अशी काही जनावर पाळलेली.. आजू बाजूला काही भाज्या लावल्या होत्या. दूध- भाजी विकून जो पैसा येईल तो रुख्मिणी बाजूला ठेवायची. शंकर मोल-मजूरी करून जी हमाली करायचा त्यावर त्यांचा दिवस जात होता.


लग्नाला एवढी वर्ष झाली तरी पोर होत नव्हत.. या मुक्या जनावरांवर पोटच्या पोरावानी माया करायची रुख्मिणी.. शंकरला कधी काहीच काम मिळायच नाही.. तेव्हा हताश व्हायचा तो. काय दिल म्या तूला रुख्मिणी? कधी साडी-चोळी नाय घेऊ शकलो. खरंच तूला कोणतच सुख म्या देऊ शकलो नाय. बाप होता तवा नेहमीं बोलायचा थोडा तरी शिक, आकडेमोड तरी समजून घे. पर त्याच नाय ऐकलो म्या.. अन आता बघ माझ्याच भावाने आपल्याला फसवलं. तू पर मला सांगायचीस भावोजी तुम्हाला फसवतायत पर म्या तुलाच खोटं ठरवलं..


अहो, अस नका बोलू.. मी माझ्या चूलत्याच्या दुकानात राहून राहून थोडी आकडेमोड शिकले म्हणून मला संशय आला होता भावोजींचा.. पण आपल नशीबच खोट म्हणायचं नात्यांच्या बाबतीत आपली ओंजळ रितीच म्हणायची बघा.. पर तुम्ही नका मनाला लावुन घेऊ.. किती तरी लोकांच्या डोक्यावर छप्पर पर नस्तय बघा.. आपल्याला हि आपल्या हक्काची चंद्रमौळी झोपडी हाय. आपली एकमेकांची साथ.. अन् आपली हि पोर.. मुकी असली मनुन काय झालं पोरच हायत माझी. अजून काय नको मला..


असे म्हणून तिने बाजूला ठेवलेले काही पैसे त्याला देत डाळ-तांदुळ आणा. तो बाजारात गेला.. तिथे भिकू शेटची काही माणसं होती. शंकरला बघून त्यांनी पैशाच आमिष दाखवले आणि त्याला बेकायदेशीर मार्गाने दारूची वाहतूक करायला लावली.


शंकर घाबरला होता. पण पैसे मिळतील म्हणून तें लोकं सांगतील तें काम त्याने करायची तयारी दाखवली. ३-४ दिवस शंकर आला नाही म्हणून रुख्मिणी काळजी करत होती. गावात जाऊन आली पण त्याचा पत्ता कुठंच लागला नाही.. दोघांना कोणाचाच आधार नव्हता. रडवेल्या तिला बघून भीकू शेटची माणसे तिच्या अंगचटीला यायला बघत होती.. त्यांची घाणेरडी नजर चुकवत ती तिथुन जाताना एक जण मोठ्याने ओरडला, शंकर्याची वाट बघतेस न्हवं येईलच तो आता, आमच्याच कामासाठी गेलाय. तोपर्यंत तू ये इकडं तूला भी काम देतो.. असे म्हणतं रामाने तीचा पदर पकडला. तिने त्याला हूडकून लावल आणि त्याला एक कानाखाली मारणार तेवढ्यात शंकर आला.


अगं रुख्मिणी, थाम्ब कशाला मारतेस? अगं त्यांनी काम दिल मला, बघ किती पैसे मिळाले. माफ करा. असे म्हणत तो तिला घेऊन त्यांच्या त्या चंद्रमौळी झोपडीत आला. तिच्या साठी नवीन घेतलेली साडी, गजरा, बांगड्या त्याने दाखवल्या.


रुख्मिणीने त्या वस्तू घेतल्या नाहीतच.. पण चार समजूतीचे बोल शंकरला सांगून बघितलं.. आव ती माणसं चांगली न्हाईत.. त्यांच्या नादी नका लागू. मला नको हि साडी चोळी, त्यापेक्षा आवडते मला ही आपली झोपडी चंद्रमौळी..


नको तो पापाचा पैसा.. त्याला सांगा, नका करू असली काम.. त्यांनी तुम्ही यायच्या आधी माझ्या अंगावर हात टाकला, म्हणून म्या त्याला.. पर तेवढ्यात तुम्ही आलात.. ऐका माझं यडीच. असा पैसा नको आपल्याला, आपली कष्टाची मीठ- भाकर बरी, ती खावून आपल्याला लागतें तीचं सुखाची झोप खरी.. ही असली दौलत नको..


शंकरला रुख्मिणीचे म्हणणं पटत, तो राहिलेले सर्व पैसे त्यांना परत देतो, म्या काम नाय करणार म्हणून सांगितलं.. पण गुंड ते काहीतरी दगाबाजी करतिल म्हणून रुख्मिणी पोलीसांना घेऊन आधीच तिथे आली होती.


काळा-बाजार करणार्या त्या टोळीला पोलिस किती तरी दिवस त्यांच्या शोधात होती. शासकीय नियमानुसार काही रक्कम या जोडप्याला मिळाली.


त्यांनी तें गाव सोडून दुसऱ्या गावात छोटेसे घर बांधलं. मोठ्या प्रमाणावर दूध विकून शंकर आता बरेच पैसे कमवत होता. सर्व छान चालु होते.


रुख्मिणीला मात्र आपली चंद्रमौळी झोपडीची आठवण आली म्हणून त्यांच्या जुन्या गावात ते आले. त्यांची झोपडी तशीच होती. सगळीकडे प्रेमाने हात फिरवत होती रुख्मिणी.. तेवढ्यात तिला जवळच कोणाच्या तरी रडण्याचा आवाज आला..


बघते तर काय मुलगी झाली म्हणून पैशाने श्रीमंत असलेला पण मनाने गरीब असलेला बाप आपल्या त्या एवढ्याश्या पिल्लाला रस्त्यावर सोडून, आजू बाजूला कॊणी नाही बघून गाडीत बसून निघून गेला.


रुख्मिणीने त्या जीवाला उचलले, आपल्या झोपडीत आणले.. चंद्राच्या त्या प्रकाशात तीच्या त्या चंद्रमौळी झोपडीत आज ती पोर चांदणी सारखी चमकत होती. तिला ऊराशी धरून रुख्मिणीने तिला शांत केले.. आपल्या घरी आणून तिला वाढवले. तिच्या या चंद्रमौळी झोपडीने तिने बघितलेली सर्व स्वप्न पूर्ण तर केलीच पण आज मातृत्वाची रिती असलेली तिची ओंजळ सुद्धा भरून काढली होती. त्या मुलीचे नाव तिने चंदा ठेवले.


दूधाचा व्यवसाय करत करत त्यांनी चंदाला मोठे केले. तीच्या जन्माचे सत्य आणि तिची चंद्रमौळी झोपडी अजूनही रुख्मिणीच्या मनात तशीच आहे.


कथा पूर्ण काल्पनिक आहे. कशी वाटली कथा? आवडली असेल तर खाली ❤️ असा आकार आहे तो नक्की प्रेस करा.

अभिप्राय द्यायला विसरू नका हं..!! अर्थात तुमच्या कंमेंटमधून.. अजून लेख वाचत राहण्यासाठी मला फॉलो करायला विसरू नका.... साहित्य चोरी हा गुन्हा आहे.

सदर कथेच्या प्रकाशनाचे, वितरणाचे आणि कुठल्याही प्रकारच्या सादरीकरणाचे सर्व हक्क लेखिकेकडे राखीव आहेत. कथेत अथवा लेखिकेच्या नावात कुठलाही बदल हा कॉपीराईट कायद्याअंतर्गत गुन्हा आहे याची नोंद घ्यावी.

कथा जशी आहे तशी नावासकट शेअर करण्यास हरकत नाही.


Rate this content
Log in

Similar marathi story from Classics