Best summer trip for children is with a good book! Click & use coupon code SUMM100 for Rs.100 off on StoryMirror children books.
Best summer trip for children is with a good book! Click & use coupon code SUMM100 for Rs.100 off on StoryMirror children books.

Pradnya Vaze-Gharpure

Comedy Drama


2.3  

Pradnya Vaze-Gharpure

Comedy Drama


Chill बाबा

Chill बाबा

2 mins 9.6K 2 mins 9.6K

102 not out चा ट्रेलर पाहून माझा मुलगा कॉलेजला जाताजाता मला म्हणाला, " बाबा, थोडं थंड घ्यायला शिका, नाहीतर त्या सिनेमातला ऋषी कपूर होईल तुमचा ” मी ऋषी कपूर ऐकून आधी खूष झालो, पण माझ्या ह्याचा बाण अजुन कुणीकडे तरी खुणावतोय, हे लक्षात आल्यावर आधी त्या सिनेमाची स्टोरी शोधून वाचली. बापरे ! ह्याला मला खडूस, चिडका, दुर्मुखलेला, वगैरे म्हणायचंय की काय ? छे ! मी असा कुठे आहे ? कसा मस्त असतो मी ! एक आदर्श जीवन कसं असावं, तर ते माझ्याकडे कुणी बघावं ! ह्याला काय कळणार ते ! मुळात ही पिढीच अशी ! पटकन ज्याला त्याला आपलं वय, पातळी न बघता शेरेबाजी करणारी. आता माझी छोटी कन्या, ऊठसूट शाळेतल्या एकन्एक शिक्षकाची टर उडवत असते ! नकलासुद्धा वठवते ! आमची हिम्मत मुळी व्हायची नाही, शिक्षकांकडे वर तोंड करून बघायची ! उगाच मनात वाटून जातं, की घराबाहेर ही पोरं आपली टर उडवत नसतील ना ! त्यांच्या बालपणी त्यांचं जे-ते ऐकलं, आमच्यावेळी नव्हतं म्हणून मागतील ते ते overtime करून ह्यांना हाती दिलं. घरी मागच्या पुढच्यांचे सगळे व्याप उठवताना नाकी नऊ यायचे, पण त्याची झळ म्हणून कधी ह्यांच्यापर्यंत पोहोचू दिली नाही आणि हे आम्हाला सांगतात काय तर “Chill Dad !! ”

माझ्या लेकाला श्रेयसला तशी थोडं ‘नाही’ ऐकण्याची सवय आहे, त्याच्या बालपणी अगदी राहत्या घराचा देखील प्रश्नच होता. सौ.चा हातभार होता, म्हणून पुढची वर्षं अधिक सुरळीत गेली. प्रिया होईपर्यंत थोडं स्थैर्य आलेलं होतं. तिचा इवलासा हात छातीशी धरून मी तिला पहिल्याच दिवशी सांगितलं होतं, की श्रेयससारखं हट्ट कमी करत तुला मोठं व्हावं लागणार नाही. तू कर हट्ट, तुझा बाबा आहे समर्थ तुझ्या साऱ्या इच्छा पूर्ण करायला आणि तिने व्यवस्थित लक्षात ठेवलेलं आहे. आताच असे एकेक उपद्व्याप करून ठेवतेय, पुढच्या कल्पनेनेच गोळा येतो पोटात. थोडं समजावायला गेलं की नेहेमीचं पालुपद आहेच आहे.. "नका एवढा विचार करू बाबा ! Just Chill ! सगळं नीट होणारे ! " आता या बाबाला chill करता येत नाही. काय करा?

कुणाला सांगू, रोजच्या बातम्याही अशा एकेक येतात ना, न जाणो आपल्याच मुलाबद्दल तर वाचत नाहीयोत ना, अशी भीती वाटते. पूर्वी दोघांनाही शाळेत सोडायला जाताना आपली पोरं सर्वांत नीट मिसळून रहातील ना, अशी काळजी वाटे. आता एवढ्या मुलांच्या घोळक्यातून माझ्या मुला / मुलीला बाहेर येताना बघवत नाही. ह्या सतत बदलणाऱ्या अपरिचित जगात दोघं वाहत, हरवून जातील की काय वाटत रहातं उगाच. माझी सौ. मात्र अगदी दमाने त्यांच्या कलाकलांनी आणि नेटाने सगळं नेत असते. कुठून तिला एवढा विश्वास आणि ताकद येते काय माहीत ! सध्या सौ.कडूनच प्रेरणा घेत असतो, माझ्या मुलांशी बोलतावागताना.. फक्त ते पोरं सांगतात तसं ‘चिला’यचा प्रयत्न मात्र अगदी chilled modeवर, पण चालू आहे.


Rate this content
Log in

More marathi story from Pradnya Vaze-Gharpure

Similar marathi story from Comedy