Pradnya Vaze-Gharpure

Inspirational

1.0  

Pradnya Vaze-Gharpure

Inspirational

मी Superwoman

मी Superwoman

2 mins
22.6K


पहाता पहाता आमची बाळं, मोठी होऊ लागली. गेल्या वर्षांच्या आठवणी काही ना काही कारणाने येतंच रहातात. ह्यांना घेऊन आम्ही घरात पहिल्यांदा केलेला प्रवेश आठवला, की अजूनही गहिवरायला होतं. माझ्या कुशीत निजून रहाणारी एव्हढीशी दोन पिल्लं, आता घरभर चिवचिवाट नाही, गोंगाट करत असतात. त्यांच्या अवाजातूनच जणू मला ‘प्राण’वायूचा पुरवठा होतो, असं वाटतं कधीकधी.

काही मैत्रिणी मला चेष्टेनी Superwoman किंवा SuperMom म्हणतात.. घर-दारासहीत दोन बाळांना एकटीने काय कमाल सांभाळतेय्स, असं देखील कौतुकाने म्हणतात. माझ्या बरोबरीच्या किंवा मोठ्या वयाच्या आयांकडून अशी शाबासकी मिळाली, की जोम ही नव्याने येतो खरा! पण त्याचबरोबर ह्या जोखमीतल्या माझ्या सहकाऱ्याला पहिले मी मनोमन धन्यवाद देते. काय आहे, बाळाची संपूर्ण जबाबदारी घ्यायचं काम फक्त आईचं असतं असं आपल्याकडे पूर्वापार समजलं जातं! पण आजच्या काळातले अनेक SuperDads पाहिले, की कुठून बरं येतो, ह्यांच्यात एवढा patience! असं वाटल्याशिवाय राहात नाही.

मला आठवतंय, आमच्या पिल्लू झाल्याझाल्या आमच्या नव्या बाबानी माझ्या आईकडून बाळाचा लंगोट किंवा डायपर व्यवस्थित स्वच्छ कसा करायचा, हे शिकून घेतलं होतं! एवढ्या बायका घरात असताना आणि मी दिवसभर ऑफिसमधून दमून येऊन पुन्हा ही असली घाणेरडी कामं का बरं करावी, असा विचार त्याने करण्यात गैर काहीच नव्हतं! त्यावर माझ्या बाळाची सफाई मलाही नीट करता आली पाहीजे, हा विचार किती आदर्श आहे ना! एकेकाळी प्रवासात सुद्धा कुणाची पोरं शेजारी दिसली, तरी वैतागणारा आमचा हा बाबा सहा महिन्यांपर्यंत माझ्याबरोबर रात्री-बेरात्री बाळांसाठी उठायचा, झोपवायचा, जागायचा! दोघींचा diet प्लॅन, दुधाच्या, औषधांच्या, vaccinesच्या वेळा, त्यांचे सकाळ-संध्याकाळ दात घासणे, दोघींच्या अंघोळी, कपडे, या सगळ्यात त्याचा समान सहभाग असायचा. रात्री यायला कितीही उशीर झाला तरी न चुकता थोडा वेळ पिल्लांशी बोलणे, खेळणे, हे तो चुकू देत नाही. तसंच स्वयंपाकाला घरात कुणाची मदत असताना आणि नसतानाही आजच्या काळातल्या पुरुषांची जेवणाबद्दलची flexibility फार मोठया मदतीची ठरते.

एक पाहिलंय, की मुलांच्या संगोपनाचं श्रेय कोणत्याही आईला by deafault मिळून जातं, पण त्यामागे कार्यरत support system फारशी कुणाच्या लक्षात येत नाही. एक बिचारी/धडपडणारी आई SuperMom ठरण्यासाठी, अशा SuperDadsची फार गरज असते. तिचा निर्णय जरी पटला नसला, तरी त्याने तिच्यावर दाखवलेला विश्वास, तिची ताकद बनतो, आणि कदाचित अशक्य असंही एखादं कार्य तिच्याकडून सहज पार पडतं!


Rate this content
Log in