बस स्टॉप 2
बस स्टॉप 2
आयकार्ड परत मिळाल्यावर स्वराज निर्धास्त झाला होता. खरं तर त्याच्या चेहऱ्यावरील आनंदाचा झरा हरवलेलं आयकार्ड परत मिळाल्यामुळे नाही तर त्या दिवशी भेटलेली मुलगी आज पुन्हा भेटली म्हणून संथ गतीने फेसाळून वाहत होता. त्यावेळी निर्झर झऱ्यात स्तब्ध होऊन अखेर बोलता झाला. स्वराजने नाव विचारताच तिने "हिंदवी" असे चटकन उत्तर दिले. तेव्हा पासून दोघे पुन्हा रोज बस स्टॉपवर भेटू लागले. दोघेही एकमेकांसमवेत रममाण होऊन जात असत. कुठेही जायचे झाल्यास दोघे सोबत जाणार, सोबत येणार. हा त्यांचा दिनक्रम रोजचा ठरलेला असे. बस स्टॉपवरील मैत्री दिवसेंदिवस अधिकाधिक घट्ट होत चालली होती. दोघानाही एकमेकांशिवाय करमने अशक्य होऊ लागले. स्वराजची परीक्षा असली की घरी त्याचं अभ्यासात मन लागत नव्हते म्हणून तो हिंदवीच्या घरी जाऊन अभ्यास करत होता. हिंदवी ही त्याला अडल्या नडल्या अडचणीत साथ देत होती. दोघे ही एकमेकांच्या समवेत वावरताना जणू त्यांची जोडी मैना राघू सारखी दिसायची. पण ही सगळे क्षण काही ठराविक काळापुरते मर्यादित होते किंबहुना हिंदवी स्वराज यांची साथ ठराविक काळापुरती मर्यादित होती हे याची त्या दोघांनाही कल्पना नव्हती. अर्थात साक्षात भगवंताला दोघांची संगत, दोघांचं मैत्रीचं नातं अमान्य होतं की काय, कुणास ठाऊक? पण,
त्या दिवशी काही आक्रित घडलं जे आजही स्थिरस्थावर झाले नाही.
दिवाळी तोंडावर येऊन ठेपली होती. आणि तेव्हाच नेमकी स्वराजची सेमीस्टर एंड परीक्षा चालू झाली होती. परीक्षा चालू होण्याच्या आधी स्वराजने हिंदवीला तशी कल्पना दिलेली होती. आता अवघ्या दोन दिवसांचा काळ परीक्षेस उरला होता. कॉलेजला जाता जाता त्याने हिंदवीला सांगितले,"अगं, परवा पासून माझी परीक्षा चालू होणार आहे ना तर दुसराच पेपर नेमका mathematics and statistics चा आहे. आणि तो subject काही कळत नाही. त्यातले sum पण सुटत नाही माझ्याकडून. आणि त्यात थिअरीचा पण काही अभ्यास नाही झालेला माझा." तेव्हा ती स्वराजला बोलली,"अरे, आम्हाला होता तो subject." स्वराज ने विचारलं,"कसं काय?" तिने सांगितलं,"अरे, माझं BSC Science झालं आहे ना, आता मी त्यात Masters करते आहे." मग त्यावर स्वराज बोलला,"तू मला शिकवशील का? त्यातलं पेपरला जे महत्त्वाचं आहे तेवढं जरी तात्पुरतं सांगितलं तरी बस होईल." हिंदवी बोलली,"तुझा पेपर असेल तेव्हा आदल्या दिवशी फोन कर मला, मग बोलू आपण." एवढं बोलून दोघे घरी परतले. स्वराजची परीक्षा सुरू झाली. पहिला पेपर झाला. त्याच दिवशी संध्याकाळी स्वराजला हिंदवीचा फोन आला,"काय रे कसा गेला पेपर?" स्वराज बोलला,"चांगला होता." दुसरा पेपर झाला. त्या दिवशी सुद्धा संध्याकाळी तिचा स्वराजला फोन आलेला. स्वराज खुश होता.
त्याच रात्री हिंदवीने स्वराजला मेसेज केला,"उद्या किती वाजता आहे तुझा पेपर?" स्वराजने सांगितलं,"१० वाजता पेपर आहे मी ८ वाजेच्या बसने जाईल." असं सांगितल्यावर हिंदवी पण बोलली,"अरे, मला पण उद्या १० वाजेपर्यंत जायचं आहे कॉलेजला, तर आपण दोघे एकत्र जाऊ." स्वराज बोलला,"हो, चालेल मी तुला सकाळी ७:३० वाजता फोन करतो." असं म्हणून दोघांचं सकाळी ७:३० वाजता बस स्टॉपवर जायचं ठरलं. सकाळी ठरल्याप्रमाणे स्वराज परीक्षेला जाण्यास निघाला त्याच वेळेस स्वराजचे वडील बाहेर जाण्यास निघाले होते. ते स्वराजला म्हणाले,"चल, मी सोडतो तुला बस स्टॉपपर्यंत." स्वराज म्हणाला,"नाही बाबा मी जाईल माझ्या मित्रांबरोबर." बाबा म्हणाले,"अरे, मी चाललोच आहे त्या बाजूला तर सोडतो कशाला उगाच पायपीट करून जातो. परीक्षेला जितक्या लवकर पोहोचशील तितकं जास्त चांगलं आहे." स्वराज म्हणाला,"अहो, मी जाईल माझं रोज जातो तसं. बाबा म्हणाले,"नाही रोजची गोष्ट वेगळी आहे आणि आजची गोष्ट वेगळी आहे. आज परीक्षा आहे तुझी. मी सोडतो आहे तुला तू चल पटकन.
" आता बाबांना कसं सांगणार की त्याला त्याच्या मैत्रीण बरोबर जायचं आहे. म्हणून त्याने सांगितलं,"नाही बाबा माझा मित्र खूप कधीपासून माझी वाट बघतो आहे जातो मी." तेव्हा परत बाबा म्हणाले,"त्याला सांग तू जा पुढे मला बाबा सोडवत आहेत." आता बाबा तर काय ऐकून घेण्याच्या मनस्थितीत नव्हते. तेव्हा स्वराज निघाला बाबांसमवेत. तेव्हा नेमक हिंदवीने रागात बघितलं स्वराजला जाताना. तेव्हा स्वराजच्या ही लक्षात आलं हिंदवी चिडली आहे राग आला आहे तिला म्हणून. पण स्वराज ही काही करू शकत नव्हता.
स्वराज पोहोचला बस स्टॉपवर. काही वेळाने हिंदवी ही आली. स्वराज तिच्या जवळ गेला तिला सॉरी बोलायला पण तिने स्वराजकडे बघून न बघितल्यासारखं केलं. बस आली आणि दोघे बसमध्ये चढल्यावर स्वराज तिच्याजवळ उभा राहिला. तर ती त्याच्याशी न बोलता मागच्या सीटवर जाऊन बसली. मग स्वराज ही गेला तर ती परत त्याला दुर्लक्षित करून पुढे निघून आली. तो तिला आवाज देतो आहे आणि ती काहीच न बोलता दुर्लक्ष करते आहे. असं करता करता शेवटी कॉलेजचा स्टॉप आला तरी आख्खा रस्ता हिंदवी काही त्याच्याशी बोलली नाही. ती गुपचूप उतरून कॉलेजला निघून गेली. हिंदवी काही बोलत नसल्याने स्वराजला चांगलेच टेन्शन आले होते. त्या टेन्शन मुळे त्या दिवसाचा पेपर ही अवघड गेला. घरी आल्यावर रोज संध्याकाळी हिंदवीचा फोन येत होता तो ही त्या दिवशी आला नाही. आणि त्या दिवशी तर स्वराजला mathematics चा अभ्यास समजून घ्यायला तिच्याकडे जायचं होतं. म्हणून घरी आल्यापासून स्वराज हिंदवीला फोन करत होता. पण ती काही उत्तर देत नव्हती. स्वराजला वाटलं नंतर ती करेल फोन राग शांत झाल्यावर. रात्रीचे ९ वाजत आले तरी स्वराजला हिंदवीने काही फोन केला नाही. मग रात्री ९ वाजता स्वराजनेच हिंदवीला पुन्हा फोन केला तर तिने कट केला. स्वराजने पुन्हा फोन केला तिने परत कट केला. असं दोन तीन वेळा झाल्यानंतर स्वराज आणखीनच टेन्शन मध्ये आला. तिच्या विचारात हरवून गेला. रात्रभर त्या दिवशी झोपला देखील नाही. अभ्यास तर दूरच राहिला. दुसऱ्या दिवशी पेपरला ही नैराश्याच्या अवस्थेत गेला तो ही पेपर अवघड गेला. स्वराजने त्या दिवशी ही खूप फोन केले हिंदवीला पण ती सारखा त्याचा फोन कट करत होती. म्हणून तो तिच्या घरी गेला. तर तिच्या घरातल्यांनी सांगितलं ती कॉलेज मधून आल्या आल्या झोपून गेली. असं रोज व्हायला लागलं. आणि असं होता होता स्वराजला त्या सेमीस्टरचे सगळे पेपर अवघड गेले. निकाल लागल्यावर चार विषय राहिले.
आता स्वराज सगळ्या बाजूंनी मोठ्या कचाट्यात सापडला होता. एकतर एका बाजूला जी हिंदवी त्याची मैत्रीण रोज त्याच्या सोबत असायची ती बोलायची बंद झाली. इकडे सगळे पेपर अवघड जाऊन सेमीस्टर परीक्षा नापास झाला. त्यात घरातले ही रागावायला लागले. आता स्वराज चांगलाच वैतागला होता. कॉलेजला गेल्यावर सुद्धा कॉलेजचा मास्टर काय शिकवतो ते सगळं डोक्यावरून जात होते. तेव्हाच स्वराजने ठरवले होते. आता या IT sector मधून बाहेर पडायचं पुढे continue करायचे नाही. असं म्हणून दुसरी सेमीस्टर परीक्षा जवळ आली तरी त्या विषयांचा अभ्यास त्याचा काही झाला नव्हता. त्या परीक्षेचे पेपर ही कसेतरी पास व्हायचे म्हणून दिले. आता तर दुसऱ्या सेमीस्टर परीक्षेचा ही निकाल लागला, त्यात झालं असं मागच्या परीक्षेचे राहिलेले चार विषय सुटले आणि आताच्या परीक्षेचे पुन्हा चार विषय राहिले. थोडक्यात आख्ख एक वर्ष वाया गेलं. स्वराजला पुढच्या वर्षात प्रवेश मिळत असताना सुद्धा त्याने घरी सांगून टाकलं,"मला काही यात continue करायचं नाही मला यात रस नाही." असं सांगून IT मधून प्रवेश कायमचा काढून घेतला, कॉलेज ही सोडून दिलं आणि दुसऱ्या कॉलेजला बीकॉम मध्ये प्रवेश घेतला. आज स्वराज बीकॉम करून settled आहे. हिंदवीचे लग्न झाले. पण त्या दिवसापासून आजही हिंदवी आणि स्वराज एकमेकांशी बोलले नाही. सहा महिने असलेली मैत्री एका क्षणात तुटली.