The Stamp Paper Scam, Real Story by Jayant Tinaikar, on Telgi's takedown & unveiling the scam of ₹30,000 Cr. READ NOW
The Stamp Paper Scam, Real Story by Jayant Tinaikar, on Telgi's takedown & unveiling the scam of ₹30,000 Cr. READ NOW

Nayan Dharankar

Others

3.5  

Nayan Dharankar

Others

चोरीचा मामला

चोरीचा मामला

2 mins
129


विकासचा भाऊ महेश नाशिकला कामासाठी आला होता. दोन दिवसांनी परत श्रीरामपूरला आपल्या गावी जाण्यास निघाला. विकास त्याला बस स्टँडवर सोडायला निघाला तेवढ्यात जोरात पाऊस सुरू झाला. घरातले सर्व त्याला गावी पाठवण्यास तयार नव्हते. पण तो ऐकेनाच. शेवटी भरपावसात विकास आणि महेश निघाले. बस स्टँडवर खूप गर्दी होती. किती वेळचे बसची वाट बघत बसले होते. बस काही येईना. एक तासाने नाशिक- नगर बस आली गर्दी असतानाही महेश चढला. महेशने चढता चढता चालू असलेला फोन कट करून खिशात ठेवला. आणि थोड्या वेळात उतरला. विकासला महेशच्या नंबरवर फोन करायला सांगितला तेव्हा फोन उचलला न गेल्यामुळे महेशला समजले आपला मोबाईल चोरीला गेला. महेश आणि विकासने तडख नाशिकरोड पोलिस स्टेशन मध्ये जाऊन तक्रार नोंदवली. आणि सांगितले आम्ही तुम्हाला पाहिजे तेवढी मदत करू पण आम्हाला आमचा मोबाईल मिळवून द्या.

 

पोलिसांनी महेश आणि विकासच्या साहाय्याने तपास सुरू केला. काही दिवसांनी दोन मुले पोलिस स्टेशनला तक्रारीसाठी आलेले दोघांची विचारपूस करू लागले. दोघांनी घडलेली सर्व घटना त्या मुलांना सांगितली ते मुल बोलले, "मोबाईल चोर आमचे मित्र आहेत तुम्ही आमच्या मागे या आम्ही तुम्हाला त्यांच्या अड्ड्यावर घेऊन जातो त्यांच्याकडे असलेल्या मोबाइलमधून जो तुमचा असेल तो तुम्ही घेऊन जा". विकासला थोडा संशय आला म्हणून त्याने त्याच्या मोबाईलवरून लोकेशन सेट केले आणि पोलिसाना पाठवले. पोलिस त्या लोकेशनच्या दिशेने आले व त्या दोन मुलांना रेड हॅंड पकडले. आणि त्यांच्याकडून तिथेच खरे काय ते वदवून घेतले. त्या मुलांनी शेवटी आपल्या चुकीचा कबुली जबाब दिला.


ती मुले म्हणाली, "आमचे आईवडिल लहान असताना अपघातात गेले. तेव्हापासून आम्ही अनाथ आहोत. आमच्याकडे उदरनिर्वाहचे काही साधन नाही. सुरुवातीला आम्ही भीक मागायला लागलो तर लोक आम्हला पैसे देईना म्हणून असा व्यवसाय चालू केला. आमची खूप मोठी साखळी आहे. आम्ही रोज बसमध्ये चढणाऱ्या प्रवाशांचे मोबाईल चोरून ते रोजच्या बसने दिल्ली, मुंबई, गोवा या ठिकाणी विक्रीसाठी पाठवतो त्यातून आम्हाला जे पैसे मिळतात त्याच्यातून आमचा उदरनिर्वाह करतो." हे ऐकून पोलिसांचे डोळे पाणावले. त्यांनी मुलांना योग्य प्रकारे समजावून त्यांना पैसे मिळवण्यासाठी काम मिळवून दिले. तसेच त्यांना त्यांच्या चुकीची जाणीवही करून दिली आणि त्यांचा मोबाईलचा काळा बाजार बंद केला.


Rate this content
Log in