भुताचा वाढदिवस
भुताचा वाढदिवस
सोनूचा वाढदिवस असतो, सोळावा म्हणून सर्वजण घराच्या बाहेर पार्टी करायचं ठरवतात, पार्टी कुठे करावी हे मात्र कोनालाच माहीत नसते. ते एका सुनसान ठिकाणी थांबतात. कुठे पार्टी करावी हा विचार करत असताना तिथे एक माणूस येतो. सोनू त्या माणसाला विचारतो, इथे कोणतं ठिकाण आहे का आम्हाला पार्टी करायची आहे. तो माणूस म्हणतो, इथे एक फार्महाऊस आहे. पण तिथे कोणी जात नाही.
आदी विचारतो का कोणी जात नाही?
भूतबंगला म्हणतात... असं बोलतााना त्या माणसाचे हातपाय थरथर कापतात. तो माणूस भीतीने थरथरत बोलतो. तो माणूस थरथर कापत हनुमान चालिसा बडबडायला लागतो. तो माणूस सांगायला सुरुवात करतो...
दहा वर्षे झाली. एका मुलाची मौत झाली. तो भूत झाला आहे, तो खूप परेेशान करतो. जाताना तो म्हणतो, तुम्ही तिथे जाण्याचा विचार पण करू नका, असं बोलून पळ काढतो.
सर्वजण जायला तयार होतात. सोनू म्हणतो, आपण जायचं नाही. पण त्याचं कोणी ऐकत नाही. सर्वजण जातात. तिथे गेल्यावर दरवाजा खोलताच तेज हवा येते. लाईट बंद चालू होते. सर्वजण घाबरतात. गाडीतलं सामान काढून, किचनमध्ये ठेवतात. काही वेळाने सर्व सामान अस्ताव्यस्त होते, केकमध्ये रक्त भरुन जाते.
सोनूू आदीला शोधतो पण सोनूला आदी सापडत नाही. सर्व दोस्त जमा होतात आणि आदीला गट करून शोधायला लागतात. आदी एका रूममध्ये कोनाड्यात बसून काहीतरी बडबड करत असतो. सोनू आवाज देतो. तो खूप भिलेला असतो.
काय रे आदी तू येथे काय करतोस,
अरे इथं काहीतरी गडबड आहे. चल आपण इथून निघून जाऊ असं बोलताच आदी खूप रागाने सोनूकडे पाहतो. लाल डोळे करून खूप रागााने, भिंतीवर जोराने फेेेकतो. तो खूप जोरात आपटतो. तो खूप भीतो. त्याच्या सोबतचा दोस्त हे सर्व पाहताच भीतीने बेहोश होतो. सोनू त्याला ओढीत कसाबसा बाहेर पडतो. तो सर्वांना एका बाजूला करतो आणि त्यांना वाचवण्यासाठी तो दुुसऱ्या बाजूूला जातो.
भीती, भीती म्हणतो तू कोण आहेस आम्हाला कसाला परेशान करतोस, तुला काय पाहिजे ते सांग आणि आम्हाला जाऊ दे. तुला जे पाहिजे तेे मी देतो. तितक्यात तिथे एक स्वामी येतो. तो भूत आणखी घाबरतो आणि आदळआपट करायला लागतो. सोनू म्हणतो, तू घाबरू नकोस मी तुला काहीच
होऊ देणार नाही. साधू महाराज ओम लिहिलेलं लॉकेट देतात ते सर्वजण घालतात. ते भूत खूप भीतीने आणखी जास्तच धिंगाना घालते.
तेेव्हा सोनू म्हणतो, मी गळ्यातलं लॉकेट काढतो, तू मला वचन दे की कोणालाही काहीच करणार नाही.
ते भूत वचन देते. सोनू गळ्यातले लॉकेट काढून टाकतो. भुताला म्हणतो, आता सांग तुला काय पाहिजे तेे. ते दिल्यावर तू आम्हाला जाऊ देशील.
ते भूत म्हणते, मी promise करतो, मी तुम्हाला कधीच परेशान करणार नाही,
ते भूत म्हणते, माझं नाव सनी आहे. माझा दहावा वाढदिवस होता. मम्मी, पापा, खूप खुश होतेे. सर्व तयारी झाली होती. मी, माझे दोस्त खेळत होतो. खेेेळताखेळता आमचा बॉल स्टोररूममध्ये गेेला, तो आणण्यासाठी मी गेलो. अचानक करंट लागला. मी मेलो, माझा वाढदिवस मरणदिवस झाला. मला केक कापायचा होता, मम्मी, पप्पाला केक खाऊ घालायचा होता. ते राहून गेेलं आहे.
सोनू म्हणतो, मी तुुझी इच्छा पूर्ण करतो. मी वचन देतो. मला तू दोन तास दे. मी तुझ्या मम्मी पप्पाला घेेेऊन येेतो. माझ्या दोस्तांना काहीच झालं नाही पाहिजे, असं बोलून तो जातो. अगोदर त्याच्या घरचा पत्ता शोधून काढण्यासाठी दोन मिनिटं विचार करतो. तो पोलिस स्टेशनमध्ये जातो. पोलिसांना खूप विनंती करतो. तेव्हा त्याला पत्ता मिळतो. तो जातो त्याच्या मम्मी पप्पाला विनंती करून त्यांना नेेण्यासाठीपण टाईम त्याच्याकडे खूप कमी असतो... पण तो कसाबसा त्यांना घेऊन जातो. वाढदिवसाचं सामान घेऊन येतो. तेव्हाच दोन तास पूर्ण होतात. सनी जिवंत होतो आणि त्याच्या मम्मीला हाक मारतो. मम्मी, मम्मी, म्हणतो आणि समोर येऊन उभा टाकतो... त्याला पाहून त्याची मम्मी खूप खूप खुश होते. पप्पापण खूप खुश होतात.
तितक्यात सोनू आणि त्याचे दोस्त पूर्ण तयारी करतात, सनी केेेक कापतो. त्याच्या मम्मी, पप्पाला भरवतो. सोनूला म्हणतो, मला माफ कर मी तुम्हाला खूप परेशान केले. thank you तू माझी विश पूर्ण केलीस. तो म्हणतो, मम्मी, पप्पा सोनूू आजपासून तुमचा मुलगा आहे. मीच आहे असं समजा मी जातो... काळजी घ्या म्हणतो. गळ्याला मिठी मारतो. मम्मी, पप्पाला सर्व मुुलांना thank you म्हणतो.
सोनूला म्हणतो, तू गेल्यावर आम्ही खूप खेळ खूप मस्ती केली. त्याची इच्छा पूर्ण होते आणि तो गायब व्हायला लागतो. तो उभा असतो
सर्वांना बायबाय करतो. तो गायब होतो.
सनीची आई सोनूला गळामिठी घालून रडते. सोनूच्या गालाचा पापा घेते. सर्वजण खूप खुश होतात.
असा होतो, भूताचा वाढदिवस...
प्रभावती संदिप वडवळे नांदेडकर

