भाषेचे महत्त्व अगाध
भाषेचे महत्त्व अगाध
पृथ्वीवरील प्रत्येक प्राणीमात्राला एकमेकांशी संवाद साधण्याकरिता, एकमेकांपर्यत आपल्या भावभावना पोहोचविण्याकरिता माध्यमाची गरज असते. चेहऱ्यावरील हावभाव, देहबोली, आवाजातिल चढ़-उतार इत्यादि मानवी जीवनातील प्राथमिक भाषा मानले जातात. कालांतराने बोलीभाषेचा उगम झाला. अमोरासमोर असल्याशिवय बोलीभाषेतून संवाद साधने अशक्य असल्याकारणाने, ही मर्यादा ओळखून लिपी आणि लेखी भाषा उदयास आली. जगातील विविध खंड,देश,प्रांत, शहरे यांमध्ये विविध लीपिंमधुन तयार झालेल्या बोली आणि लेखी भाषा आढळतात. सद्यस्थितीत जगात 6500 ते 7106 बोलीभाषा अस्तित्वात आहेत. त्यापैकी 2000 बोलीभाषा अशा आहेत,ज्या बोलणाऱ्यांची संख्या हजार लोकांपेक्षाही कमी आहे.मेडिटेरेनियन चायनिज ही जगातील सगळ्यात लोकप्रिय बोलीभाषा एक अरब एकविस कोटी तीस लाख लोक बोलतात. जगातील 247 देशांत बोलल्या जाणाऱ्या बोलीभाषांच्या यादीत हिंदी,बंगाली आणि पंजाबी या तीन भारतीय भाषांचा पहिल्या दहा मध्ये समावेश आहे.
लिखित भाषेत लिपीलाअनन्यसाधारण महत्व महत्व आहे. लैटिन लिपी जगात सर्वाधिक म्हणजे 4.9 दशलक्ष लोक लिखित स्वरुपात उपयोग करतात. इंडो-यूरोपियन परिवारातील इंडो-आर्यन भाषा असलेली कोंकणी जी गोवा राज्याची अधिकृत भाषा आहे,ती देवनागरी,रोमन,कन्नडा, मल्यालम आणि परसो-अरेबिक अशा पाच लिपिंत लिहिली जाते. यामध्ये स्थळ, धार्मिक आणि सांस्कृतिक विविधतेचा पिरणाम आढळतो. इंडो-आर्यन भाषेतील डार्दीक उपसमुहातील कश्मिरि भाषा शारदा,देवनागरी आणि परसो-अरेबिक लिपित लिहितात. पंजाबी भाषा भारतीय हद्दित गुरुमुखी लिपित आणि पाकिस्तानी हद्दित शाहमुखी लिपित लिहिली जाते. भारतात 66 अधिकृत लिपी आहेत. देवनागरी लिपी चौथ्या क्रमांकाची सगळ्यात प्रसिद्ध लिपी आहे ज्यात 120 भारतीय भाषा लिहिल्या जातात.
हजारों वर्षांपासून ग्रंथ,शिलालेख आदींतून प्राचीन भाषा जपल्या गेल्या,काही विलुप्तही झाल्या. स्थलांतर, पलायन ,परकीय आक्रमण इत्यादींमुळे बोली आणि लेखी भाषेचा आणि लिपीचा प्रसार सर्वदूर झाला. आपभ्रंशांमुळे नवीन भाषा आणि लिपि उदयास आल्या. किती तरी भाषांतिल शब्द इतर भाषांचे अपभ्रंश आहेत. संस्कृत भाषेतील मातृ चे मदर,भ्रातृ चे ब्रदर, भूमिति चे जॉमेट्री आणि त्रिमिति चे ट्रिग्नोमेट्री हे इंग्रजी अनुसरण सर्वश्रुत आहेच.
इतक्या प्राचीन आणि आधुनिक भाषांचा खजिना अस्तित्वात असतांना आपली भाषाविषयक सद्यस्थिति काय आहे? यावर एक दृष्टिक्षेप टाकुया. हल्ली शेकडो जागतिक बोली आणि लिखित भाषेत विविध दुरचित्रवाहीन्या,दैनिके, नियतकलिके, ग्रंथ,अनुवादित साहित्य उपलब्ध आहेत. अभियांत्रिकी, वैद्यकीय, विज्ञान, इत्यादी क्षेत्रातील मजकूर भाषेच्या मध्यमातूनच आपल्यापर्यंत पोहोचतो. ही झाली मध्यमिय जगतातील भाषेची स्थिती. लेखी भाषेच्या माध्यमातून साकारलेल्या वाङ्गमयातून जगभरातिल धार्मिक पुराणग्रंथकार, कवि, लेखक, साहित्यकारांना अमरत्व प्राप्त झाले. जागतिक
आणि राष्ट्रीय स्तरावर भाषेवर प्रभुत्व असलेल्या उत्तम वक्त्याना फार महत्व आहे.
भाषेबद्दल बोलायचे झाल्यास मध्यातरी कावेरी पल्याडच्या दक्षिण भारतीय प्रांतावर हिंदी भाषा लादली जाऊ नये अशी ओरड सुरु झाली. दक्षिणी भाषांची लिपी देवनागरी पेक्षा फार वेगळी असल्याकारणाने ते एकप्रकारे योग्यच. महाराष्ट्र पासून सुरु होऊन उत्तरेकडे जाणाऱ्या देवनागरी लिपीतील भाषिक पाट्यात राहणाऱ्या लोकांनाही दक्षिण भारतीय भाषांबद्दल तिच अड़चन भासते. मात्र विदेशी लोकांनी भारतीय भाषा शिकल्याचे दाखलेही कमी नाहीत. आता वळूया मातृभाषेच्या विषयावर. या वर्षी उत्तर प्रदेशात लाखो विद्यार्थी बोर्डच्या परीक्षेत त्यंच्या मातृभाषेत म्हणजेच हिन्दीत अनुत्तीर्ण झालेत. वाटल्यास ते विद्यार्थी गणित आणि विज्ञान या कठिण मानल्या गेलेल्या विषयांत उत्तीर्ण झाले. तिच गत आपल्या महाराष्ट्राची . येथील मोठया संख्येने विद्यार्थी एकतर मराठी भाषेत अनुत्तीर्ण झाले किंवा जेमतेम गुण मिळाल्यामुळे त्यांची टक्केवारी तरी घसरली. तेव्हा पालकांनी मराठी विषयाची सक्ति करू नये अशी विनंती केली. याचे पडसाद विधिमंडळतही उमटले. इंग्रजी मध्यमातील शाळांवर याचे खापर फोडण्यत आले. प्रत्यक्षात मातृभाषा शिकविण्याची जबाबदारी पालकांची असते,या गोष्टीकड़े सोइस्काररित्या कानाडोळा केला गेला. कितीतरी जागरूक पालकांनी आपल्या पाल्यांना पहिलेपासून किंवा मध्यमांतर करून मराठी शाळेत दाख़ल केल्याचे अहवाल भाषेच्या दृष्टीने खरोखरीच सकारात्मक म्हणावे लागेल.
विद्यार्थी दशेत आपण किमान दोन सक्तीच्या आणि दोन पर्यायी भाषा अभ्यासक्रमात शकतो. त्यमधील सर्व नव्हे मात्र एका तरी भाषेवर आपले प्रभुत्व असणारे क्वचितच आढळतील. बोलतेवेळी साधारणपणे आपण एकापेक्षा अधिक भाषांची सरमिसळ करून वेळ मरून नेतो. मात्र लिहितेवेळी असली सोय उपलब्ध नसते. त्यावेळी तुमच्या भाषे वरिल प्रभुत्वाचा खरा कस लागतो. मातृभाषेबद्दल आदर,आपुलकी जिव्हाळा बाळगुन त्याचे जतन व संवर्धन करण्याच्या दृष्टिने बोली आणि लेखी स्वरुपात दैनंदिन व्यवहारात तिचा अंतर्भाव करण्याचा प्रयत्न करावा. भाषेचे महात्म्य अगाध आहे, त्याचे मोल समजावे.
