Swapna Wankhade

Others

3.6  

Swapna Wankhade

Others

बालमनातील अंधश्रद्धा

बालमनातील अंधश्रद्धा

3 mins
270


   एके दिवशी अशीच निवांत क्षणी बालपणीच्या अठवणिना उजाळ देत होते. बालपणीच्या सोनेरी क्षणांची आठवण येताच मन भरून आले. सरकत्या वाळू प्रमाणे बालपण कसे सरले ,कळलेच नाही. विचारा विचारात नं कळत्या वयतील अंधश्रद्धाबद्दल विचार करायला लागले.

     मी अवघि पाच वर्षाची होते तेव्हा माझी एक वर्गमैत्रीण जी माझी शेजारीणही होती, ती सांगायची की ,देवाच्या हातात एक लोटा असतो, तो देवाने उलटा केला की पाऊस पडतो. मी नेहमी अकाशाकड़े बघून तो लोटा दिसतोय काय हे शोधायचा प्रयत्न करायचे. ती सांगायची की ,समुद्रात चुकुन मीठ सांड़ले म्हणून समुद्र खाराट झाला. मी विचार करायचे ,किती पोते मीठ सांड़ले असेल, अक्खी मिठाची फैक्ट्रीच समुद्रात वाहून गेली की काय?? कधी कल्पIनाही केली नाही की ,समुद्राच्या निघणारे मीठ इतकी प्रचंड मानवसृष्टी खाते. 

     एकदा ती सांगत होती ,की तिने कोणतीही खोड़ी केली तर तिची आई तिला डॉक्टर च्या दवाखान्यात परत सोडेल. मी असे बोलन्याबद्दल विचारले असता ती म्हणाली, की तिच्या आई बाबांनी तिला नागपुर च्या एका गायनॅकॉलॉगिस्ट च्या दवाखान्यातून वीकत आणले आहे, आणि तिने जर खोड़ी केली तर ते तिला परत तिथेच सोडून येतील. तिच्या चेहऱ्यावरील अगदी घाबरलेले भाव असायचे. इतके सुशिक्षित पालक आपल्या मुलांना खोड़ी करण्यापासून परावृत्त करण्याकारिता असली तथ्यहीन भिती त्यंच्या मनात का घालतात ? कुणास ठाऊक. आज ती मैत्रीण आणि तिचा नवरा स्वतः गायनॅकॉलॉगिस्ट आहेत. त्यांचे मूल झाल्यावर तेहि असे अवैज्ञानिक गोष्टी त्यंच्या मनावर बिंबवतील काय हाच प्रश्न आहे. 

     एकदा वर्गात off period असतांना माझी बेंच पार्टनर मला सांगत होती की तिच्या मोठ्या भावाला चकव्याने चकवले. मी चकवा म्हणजे काय?? हे विचारल्यावर ति सांगू लागली, की तिचा भाऊ रात्री रस्त्याने जात असतांना त्याला लाल दिवा दिसला, तो बघताच त्याला रस्ताच आठवेना. ती सांगत होती कि चकवा माणसाला खुप अंतर चालवितो आणि त्याने मनातही पाणी मागितले तर विहिरित ढकलून देतो. मी तिला विचारले ,जर कोल्ड ड्रिंक मागितले तर?? त्यावर ति उत्तरली ,मग चकवा कोल्ड ड्रिंक च्या विहिरित ढकलतो. कोल्ड ड्रिंक ची जाहिरात टी. व्ही. वर बघितली होती, पण कोल्ड ड्रिंक ची फैक्ट्री असते ,विहीर नव्हे याची कल्पना मला त्या वयात नव्हती. मी रात्री कुठेही लाल लाइट बघितला की मी चकवा समजून घाबरायचे. मोठी झाल्यावर हे सगळे गैंरसमज आपसुकच दूर झाले. वैज्ञानिक माहिती आणि दृष्टिच्या विस्तारासोबतच ते घडत गेले.

   2010 च्या दिवाळीत एका आप्तेष्टाच्या विनंतीवरुन मी परिवारासहित मध्यप्रदेश येथील  नर्मदेकाठावर स्थित एका बाबांच्या आश्रमात गेले होते. तेथे भरपुरसे भव्य आणि टुमदार आश्रम बघितले. बाबांचे भक्त उच्चशिक्षित, अतिश्रीमंत होते. बाबांना भविष्य वाचता येते ,असा बहुतेकांचा समज होता. बाबाजींचे चरण तीर्थ bottle मध्ये भरून ती मंडळी नेत होती. आमच्या हातावरही एका भक्ताने चरणतीर्थ दिले, किळस आली अक्षरशः. माझ्या हातून ते खाली सांडायला लागले, ते बघून त्या भक्ताचे आभाळ कोसळल्यागत हावभाव झाले. 

    दुसऱ्या दिवशी महाराजांनी नर्मदेची काही अंतर परिक्रमा यात्रा काढली. 2,3 किलोमीटर चालणे झाले, महाराज दमले, भक्तांनी मेटाडोर वर लादून आणलेल्या खुर्चीवर बाबांनी बसकाण मांडले. तेथून एक गाईंचा कळप चाललेला होता. त्यातील एक गाय चक्क महाराजांवर धावून आली ढुशी मारली त्यांना. भक्त त्यांच्याकडे सरसावले. महाराज ठीक आहे याची खात्री पटल्यावर त्यांचा जीव भांडयात पड़ला. त्यंच्या मनाला यत्किंचितही हा विचार शिवला नाही की, जे महाराज लोकांचे भविष्य वाचतात त्यांना गाय आपल्याला ढुशी मारणार आहे हे माहिती नव्हते?? 

तीन वर्षे अगोदर तेच अंतर्यामी महाराज एका रस्ते दुर्घटनेत मरण पावले. ही बातमी वृत्तपत्रात वाचली. तरीही सर्व भक्त त्यांच्या आश्रमातिल समाधिवर जातच आहेत. त्यांची उत्तराधिकारी आश्रम सांभळीत आहेत. भक्तांनी दिलेल्या दोन कोटी रूपयात आश्रमाचा विस्तार केला गेला. 

      या सगळ्या अंधश्रद्धांचे निर्मूलन फक्त सदसदविवेकबुद्धि जागृत ठेवून आणि प्रत्येक गोष्ट विज्ञानाच्या व तर्काच्या कसोटिवर पारखुनच होऊ शकते.


Rate this content
Log in