बायकोचा वाढ दिवस...!
बायकोचा वाढ दिवस...!


बायकोचा वाढदिवस लक्षात राहीला तर तो अत्यन्त महत्वाचा दिवस.सर्वार्थानी लक्षात राहिला तर झोप मोड १००%, नाही लक्षात राहिला तर हिरमोड १००% जणू दुधारी तलवार .कोणत्याही परिस्थितीत
इजा करणारी.पण खरं सांगू यातून वाचण्याचा उपाय मला काल तिच्या वाढदिवसा दिवशी सापडला.अगदी साधा सोपा उपाय.मला वाटत बऱ्याच विवाहितांना
थोड्या फार प्रमाणात उपयोगी पडेल अस वाटत म्हणून हा शब्द प्रपंच.खर म्हणजे तिचा वाढ दिवस आपल्या लक्षत न राहणं यातच तिचा खरा आनंद दडलेला असतो,आपला नवरा बिंडोक,साधाभोळा,विसराळू आणि अनेक टाकाऊ गुणांनी संपन्न नवरा लाभलेला आहे हा तिच्या आनंदाचा प्लस पॉईंट असतो.
सकाळी सकाळी किंव्हा अगदीच आनंदात रात्री बरलाच वाढदिवसाच्या शुभेच्छा दिला की सारा दिवस मोकळा मोकळा सरतो,तिला त्या दिवसाची जाणीवच रहात नाही.पण आपण विसरलो किंव्हा दुर्लक्ष केले गेले की तिच्या मनात सारखा विचार चालू राहतो.माघारी सर्व बिरुद लावून उद्धार होतो आणि आपलं वेटेज वाढत.सरप्राईज वगैरे मध्ये काही दम नाही.शेवटी सय्यमाचा बांध फुटतो मग जी मजा येते ती औरच.आपली अनुपस्थिती जेंव्हा उपस्थिती होते तेंव्हाच खरे मोल ठरते.म्हणून गडबड जरून कधी वाढ दिवसाच्या शुभेच्छा देण्याच्या फँदात पडायचं नाही,सावकाश शुभेच्छा देऊन वाढ दिवस साजरा करण्याने निदान पुढच्या वर्षी तरी लक्षात ठेवा म्हणून बोळवण होते आणि दिवस सौख्यमय होतो यात शंका नाही.आपलं हंस होणं यातच तिच्या वाढ दिवसाचे सुख सामावलेले असते हे पक्क लक्षात ठेवावं हेच चांगलं.
हे दोनचार शब्द लिहिण्या मागचा हेतू इतकाच की अर्धांगिनीचा वाढ दिवस हा अविस्मरणीय व्हावा इतकंच...!