Jyoti gosavi

Comedy

3.4  

Jyoti gosavi

Comedy

बाथटब

बाथटब

4 mins
34


बाथ टब म्हणा किंवा टब बाथ म्हणा, शेवटी बाथ टब असेल तर त्यात टब बाथ घेता येईल.

तर आपल्यासारख्या मध्यमवर्गीय लोकांचे बाथ टब हे एक स्वप्नच असते.

 आपण सिनेमांमध्ये पाहिलेलं असतं अगदी फेसाचा मोठा डोंगर आणि त्याच्या आडून गोरे गोरे हात पाय बाहेर आलेले असतात आणि हिरोईनचा चेहरा दिसतो. 

त्यामुळे आपल्यालाही असा टब बाथ कधी घेता येईल असे मनात असते.

आता कुठे ट्रिपला गेलो आणि एखाद्या थ्री स्टार हॉटेलला राहिलो तरच या गोष्टी साध्य होतात .


मला तर खूप दिवसापासून टब बाथ घ्यायचा होता. पण अजून काही तो नशिबात नव्हता.

एकदा ट्रीप मध्ये हॉटेलमध्ये टब होता मग मी अगदी मनात स्वप्न रंगवलं चला उद्या गरमागरम पाण्यामध्ये चांगलं अर्धा तास म्हशीसारखं बसायचं आणि शेकून घ्यायचं .

पण करता काय सकाळी साईट सीन साठी गाडी वाला लवकर येऊन उभा राहिला .

मग काय!आपल आवरा घाईघाईने त्यात पण मी टॅप सोडला तर, पाणी कोमट येऊ लागलं.

 आता कुठे जरा उबदार पाणी आलं आणि मी पाण्यात उतरणार तोच बाहेरून दरवाजा वाजला. लवकर आवर गाडीचा ड्रायव्हर येऊन थांबला आहे. 

मग काय आपलं प्लास्टिक बादली आणि मगडाच नशिबाला. 

नंतर अजून एका हॉटेलमध्ये टब होता तेव्हा !

 तुझं नेहमीचच आहे, तुला उशीरच होतो, तुला आवरायलाच नको, अशी बाहेरून बडबड चालू होती त्यामुळे रागा रागाने मी भरलेल्या टबचं झाकण काढून टाकलं ,पाणी वाहून गेलं आणि मग काय लवकर गरम पाणी येईना , चला आपल्या नशिबात काही तो टबभर फेस करून त्याच्यामध्ये लोळत पडायचं नाही आपली बादलीच बरी.


तर गंमत म्हणजे परवाच्या टूरमध्ये बाथरूम मध्ये चांगला मोठा प्रशस्त टब होता, चला आज आपलं स्वप्न पूर्ण होईल असा विचार केला आणि काय सांगू रात्री स्वप्नात श्रीदेवी आली. 

मग सकाळी काय टब मध्ये उतरण्याची हिंमत होईना.

 टब बाथ म्हणलं की मला नेहमी दोन गोष्टी आठवतात.

एक म्हणजे लहानपणापासून विज्ञानाच्या पुस्तकात वाचलेला आर्किमिडीज ,आणि त्याचं ते तत्व😁 म्हणजे काय ते तुमच्या लक्षात आलंच असेल.

 सुज्ञास सांगणे नलगे.

तरीपण काही लोकांसाठी फोड करून सांगते.

 तो म्हणे अंगाला भरपूर साबण फासून टबा मध्ये लोळणार होता, म्हणजे त्याने टबामध्ये उडी मारली आणि त्याच्या वजना एवढं पाणी बाहेर उडालं. आणि त्याला वस्तुमानाचा शोध लागला.

 मग तो म्हणे रस्त्याने तसाच युरेका युरेका करत धावत सुटला आता युरेका म्हणजे त्यांच्या भाषेमध्ये सापडला सापडला. 

मी म्हटलं चला आपण काही वैज्ञानिक नाही ,आपल्याला काही नवीन शोध लागणार नाही ,😁आणि त्यामुळे आपल्यावर काही तशी वेळ येणार नाही.

 म्हणजे एका संकटातून सुटलो बुवा! आता निर्धास्त टबबाथ घ्यायला हरकत नाही.


मग आठवली श्रीदेवी ,अरे बापरे रात्रीच तर स्वप्नात आली होती.

 काय आपल्याला इशारा द्यायला तर आली नसेल? 

अरे पण आपण कुठे दारू पितो? आपण कुठे बेवड्या आहोत, त्यामुळे आपल्याला काही टबात बुडून मरण्याची भीती नाही.

पण नुकताच तिचा मोठ्या रकमेचा विमा उतरला होता म्हणे!

 आता आपल्या पण अकाउंट वर भरपूर पैसा आहे ना ! शिवाय कुठेतरी वाचलं होतं की जर कोणीतरी पाय ओढून धरले तर कोणीही व्यक्ती टबात बुडून मरू शकते.

मग काय करायचं ,नको रे बाबा  मला काही टबात डुंबायचं नाही.

आपलं चार बाय चार च बाथरूम बरं आणि ती बादलीच बरी.

तरीपण हो ना करत करत शेवटी म्हटलं आज आपले हौस पूर्णच करायची ,आर या पार मेलो तरी  बेहत्तर !पण कोणती इच्छा अपुरी राहिला नको.

मोठी हिम्मत करून गरमागरम पाण्यात उतरले ,अगदी छान वाटलं सगळ्या अंगाला शेकून घेताना आणि म्हशीसारखं डुंबताना आवडलं.

तेवढ्यात बाहेरून दरवाजा वाजलाच,

 आवरा !आवरा! उशीर झाला आहे आपल्याला बाहेर पडायच आहे.


 आधी तर दरवाजा वाजल्यावर मला भीतीच वाटली, आता कोणी आत येणार आणि मला टबात बुडवणार! पण का? मी कुणाचं काय केलंय? आणि बाहेर तर अहो आहेत ते का मला टबात बुडवतील?

पण एवढ्यात कोणीतरी आत आलंच, आणि माझं डोकं पाण्यात दाबू लागलं .मी घुसमटले डोकं हलवू लागले. 

नको! नको! मला नाही टबात आंघोळ करायची.

 नको नको मला बाहेर येऊ द्या ,मी परत कधी हट्ट करणार नाही की टब असणार हॉटेल बघा, टब असणारी रूम बघा,


 अग उठ !तू काय श्रीदेवी नाहीस, आणि बेवडी पण नाहीस , आणि तुझा काही मोठा विमा देखील उतरवलेला नाही .तुला कोण कशाला बुडवतोय?

 जा खूप दिवसाची हौस होती ना पुरी कर.

जा एकदाची म्हशीसारखी डुंबायला, तोपर्यंत मी बाहेर जाऊन एक चक्कर मारतो नाहीतर तुझ्या साठी चहा घेऊन येतो. 


नको! नको! तुम्ही कुठे जाऊ नका मी एकटी टबात बुडाले तर?


 अग वेडी काय ,एवढस ते पाणी!

 ते तुमच्या पोटरी एवढ पण नाही, कोण कशाला बुडणार?


मग श्रीदेवी कशी बुडाली ?

अग मोठ्या लोकांच्या मोठ्या गोष्टी आपल्याला काय करायचंय.

शिवाय म्हणतात की ती पिऊन तराट झालेली होती 

तू प्याली आहेस का ?


 शी बाई काहीतरी काय बोलता!

 मी कधी अशी दारू पिणारी आहे का?

नाही ना मग जा तुझी हौस पूर्ण करून घे ,मी थांबतो बाहेर.

 तुझी आंघोळ सॉरी सॉरी टब बाथ झाल्याशिवाय मी कुठे जात नाही मग तर झालं.

आणि मग एकदाचा त्यादिवशी मी टब बाथ चा आनंद लुटला.


Rate this content
Log in

Similar marathi story from Comedy