STORYMIRROR

Sanjay Ronghe

Abstract Tragedy Action

3  

Sanjay Ronghe

Abstract Tragedy Action

बाप - राणी भाग आठ

बाप - राणी भाग आठ

4 mins
377

   आता हळूहळू मुलांचे आणि राणीचे जमायला लागले होते. राणी मुलांना मुद्दाम वेळ काढून त्यांच्याशी कधी गप्पा कधी मुलांना बाहेर घेऊन जाणे, कधी त्यांच्या अभ्यासात मदत करणे, कधी त्यांच्या आवडीच्या वस्तू आणून देणे, तीन के हवे काय नको त्याकडे लक्ष ठेवणे याकडे जास्त लक्ष देत होती. त्यामुळे मुलं खुश होती. मुलांना खुश बघून नाईकही खुश असायचे. त्यांच्याकडेही राणी तेवढेच लक्ष द्यायची. त्यांना आनंदी करण्याचा प्रयत्न करायची. दोघनमध्ये प्रेमही वाढले होते. नाईक स्वतःच राणीला तिच्या कामात पण छोटी मोठी मदत करायचे. त्यामुळे दोघांमधली जवळीक अजूनच घट्ट झाली होती. नाईक कधी कधी राणी साठी मोगऱ्याचा गजरा आणायचे. राणी तो गजरा मळून नाईकांच्या रम मध्ये जेव्हा जायची. वातावरण मोगरीच्या सुगंधाने धुंद व्हायचे. नाईकांचा कल ओळखून ती त्यांच्या मिठीत विसावायची. मग ती रात्र त्या दोघांची सम्पूर्ण सुखाची रात्र असायची. इतकं प्रेम इतका आनंद राणी साठी मात्र एक पर्वणी असायची. तिने अगोदर कधीच तो आनंद ते प्रेम तो सहवास अनुभवला नव्हता. ते तिच्यासाठी स्वर्ग सुखच होते.


      राणीचे आता आनंदाचे दिवस परत सुरू झाले होते. तिला आपल्या संसाराला आनंदी करायची जणू किल्लीच गवसली होती. मुलं पण आता तिच्या सोबत खूप आनंदी होते. त्यांना आता समज आली होती. राणी त्यांच्या साठी किती धडपडत असते हे ते बघत होते. तेही राणीला छोटी मोठी मदत करायचे. दुपारी एकटी असताना मात्र तिला बिलकुल करमत नसे. मग ती काहीतरी काम काढून त्यात आपले मन रमवायची तर कधी सरिता ताई कडे जाऊन यायची. कधी त्यांच्यासाठी काहीतरी घेऊन जायची. त्यामुळे सरीतालाही राणी बद्दल आपुलकी प्रेम वाटायचे. तिनेही राणीला आपली भावजय म्हणून स्वीकारले होते.


      आज राणी एकटीच घरात बसून आपले काम आटोपत होती. मुलं शाळेला गेली होती. नाईक ऑफिसला गेले होते. अचानक दार वाजले तिने कोण म्हणून दार उघडले. तर समोर तिच्या जुन्या घरापुढे राहणारे गृहस्थ उभे होते. क्षणभर राणीला काही सुचलेच नाही. ती आपले जुने आयुष्य पूर्णतः विसरली होती. आता तिला कुणाचीच आठवण येत नव्हती. आई तिच्या दुःखातून मुक्त झाली होती. बाप कुठे गेला ते कळलेच नव्हते. आणि आज अचानक ते गृहस्थ दारा पुढे बघून तिच्या सगळ्या आठवणी जाग्या झाल्या . शेवटी ते गृहस्थच बोलले. राणी कशी आहेस . ठीक आहेस ना बेटा. मी सहजच इकडन जात होतो तर तुझी आठवण आली. तुला बघावसं  वाटलं. म्हणून आलो बघ. तुला एक निरोप पण द्यायचा होता. त्यांना राणीला तो निरोप देऊ की नको असे होत होते. मग तीच म्हणाली अहो काका सांगा ना काय निरोप आहे. कुणाचा निरोप आहे. काही झालं का सांगा ना. राणीची उत्सुकता वाढली होती. सोबत काळजी ही वाढली होती. ते गृहस्थ भानावर येत म्हणाले. राणी अग तुझा बाप, तो आजारी आहे. झोपडीत आता एकटाच पडून असतो. चार पाच दिवसच झाले तो आल्याला. मध्ये कुठे होता, कसा होता काहीच सांगत नाही. खूप आजारी आहे. शेवटच्या घटका मोजत आहे. फक्त तुझे नाव तेवढे घेतो. काही खात नाही पिट नाही. आम्हीच त्याला बघतो. आता त्याला कोण दवाखान्यात नेणार. बघ तुला जमलं तर तू जाऊन भेटून ये त्याला. कदाचित तुझ्या भेटीने त्याला मुक्ती मिळेल. बघ बेटा तो तुझा बाप होता. कसाही असेना पण बाप तर होता ना. एकदा भेट त्याला. आणि मुक्त कर या जीवनातून. आणि ते गृहस्थ निघून गेले.


       राणीला काय करावे काहीच सुचत नव्हते. तिच्या डोळ्यांना मात्र अविरत धारा लागल्या होत्या. शेवटी धीर एकवटून तिने आपला तोल सांभाळला. तिने नाईकांना घरी बोलवून घेतले. आणि त्या गृहस्थाने सांगितलेले सगळे नाईकांना सांगितले. नाईकही ते ऐकून व्यथित झाले. त्यानी ताबतोब राणीला सोबत घेतले आणि राणीच्या त्या झोपडीकडे दोघेही निघाले. झोपडीची बरीच तूट फूट झाली होती. दार उघडेच होते. आत राणीचा बाप पडून होता. त्याची हालत खूपच खराब दिसत होती. पोट पाठीला लागले होते. हातापायाच्या काड्या झाल्या होत्या. चेहरा सुकून गेला होता. डोळे खोल गेले होते. तो डोळे मिटून पडून होता. जोरजोरात श्वास सुरू होते तोंडातून काही अस्पष्ट पुटपुटत होता. राणीने त्याला आवाज दिला बा बा पण त्याने बघितलेच नाही तेव्हा राणीने त्याला हलवून जागे केले. त्याने हळूच डोळे उघडले. आणि पुटपुटला राणी. राणी म्हणाला होय बा मी राणी आहे, बघ ना माझ्याकडे. मी आली आता, तू नक्की बरा होशील रे. राणीने त्याच्या डोक्यावरून हात फिरवला. तशी त्याच्या चेऱ्यावर समाधानाची लकीर उमटली. त्याने कसा बसा आपला हात उचलून राणीचा हात आपल्या हातात घेतला. आणि मुखाने उद्गारला बाई सुखी राहा. श्वास थांबले होते. चेहऱ्यावर समाधानाची झलक दिसत होती. राणीच्या डोळ्यातून आसवे गळत होती.


       नाईकांनी अंतसंस्काराची पूर्ण तयारी करून अंत्यसंस्कार आटोपले. आणि दोघेही घरी परतले.राणीला आपल्या बालपणासुनचे सम्पूर्ण चित्र दिसत होते. तिचे अश्रू थांबत नव्हते. आयुष्यभर कधीच लक्ष न देणारा बाप मरतेवेळी मात्र भरभरून आशीर्वाद देऊन गेला होता. त्याने तिच्या मांडीवर डोके ठेऊन आपले प्राण सोडले होते.


Rate this content
Log in

Similar marathi story from Abstract