Sanjay Ronghe

Abstract Tragedy Inspirational

3  

Sanjay Ronghe

Abstract Tragedy Inspirational

प्रवास

प्रवास

2 mins
138


जन्मापासून सुरू इथे

आयुष्याचा प्रवास......

आहेत मार्ग अनेक

फक्त मनात हवा ध्यास.....

प्रवासात या

जगणे फार कठीण.......

असेल मरण सोपे

पण होते तेही कठीण.....

जन्मापासून अंतापर्यंत

येतात अनेक टप्पे......

जगण्याच्या या शर्यतीत

रोजच भोगायचे धक्के.....

आई बाबा ताई दादा

काका मामा आत्या......

आजी आणि आजोबा

किती किती ही नाती....

प्रत्येक टप्प्यात लाभतात

मित्र मैत्रिणी सोबती.....

सगळी नाती संभाळण

आहे किती कठीण....

मन जुळले तर

घट्ट होते नात्याची विण....

परिश्रमाने इथे मिळतो

मान आणि सन्मान.....

पैश्या शिवाय होते काय

सगळ्यांचे असते तिकडेच ध्यान....

करत पैसा पैसा जगायचे

सोडून सारे शेवटी असेच मरायचे...

नको तो लोभ

क्रोध मोह मत्सर नकोच ती तऱ्हा...

माया ममता प्रेम

हवा वात्सल्याचा झरा.....

सखे सोबती

मिळतात इथे खूप....

मोजकेच असतात त्यात

ओळखा त्यांचे रूप.....

काही सुटतात नवीन मिळतात

प्रवास चालतो निरंतर.....

जुने जाणार नवे येणार

पडत नाही अंतर .....

हसत हसत जगायचे

दुःख मागे सारायचे.....

दुखाविना सुख नाही

दुःखही हसत जगायचे......

बालपण सोपे इथे

आई बाबा देतात हात...

तारुण्याची हवाच न्यारी

मिळते तिथे सोबतीची साथ....

येकाचे होतात दोन

बांधून एकमेकांशी गाठ....

दोनचे जेव्हा होतात चार

जबाबदारी मग धरते पाठ.....

जगणे मरणे तिथेच कळते

जीवनाची लागते वाट....

रात्र सरते दिवस उजाडतो

ती असते नवी पहाट.....

हळू हळू मग दिवस जातात

वार्धक्याची मिळते साद....

कठीण असतो हा प्रवास

माणूस ठरतो इथेच बाद....

आयुष्यभराचे चित्र डोळ्यात

विचार असंख्य असती मनात....

नको नको वाटे साऱ्यास

धावा करतो ने क्षणात.....

अंत यात्रा असते कठीण

उरते तिथे क्षीण काया....

उतरतिचा तोच काळ

का सरते तेव्हाच माया......

लढण्याचे जेव्हा नसते बळ

नियती गाठते आपला तळ....

लेक मुलगी करी दुर्लक्ष

भोगतो स्वतः स्वतःचा छळ....

दिवस येतो अंत्यविधीचा

चार सोबती घेई खांद्यावर....

अग्निचा तिथे डोंब उसळतो

देती सोडून मध्यावर.....

प्रवासाचा होतो अंत

सोडून जातो इथेच सारे...

भस्म होते शरीर नश्वर

राख उडते येताच वारे....



Rate this content
Log in

Similar marathi story from Abstract