सई
सई
सई एका वेगळ्या व्यक्तिमत्वाची वेगळ्या विचारांची, काहीतरी वेगळं करण्यासाठी धडपडणारी स्त्री. लहानपणातच तिची आई गेली. तिने आईला बघटल्याचे तिला आठवतच नाही. त्यावेळी ती अगदीच लहान होती फक्त दोन वर्षांची. आबानीच तिला मोठे केले. त्यांच्या साठी ती त्यांची जीव की प्राण होती.
आई ची माया तिला आबाकडूनच मिळाली. आबांचे संस्कार तिच्या नसानसात भिनलेले होते.
आबांनी हे सांगितलं तर हे असंच करायचं. अंबानी हे असं करायचं नाही म्हणून सांगितलं तर ते मुळीच नाही करायचं. हे तिच्या मनात अगदी ठाम बसलेले होते. त्यामुळे कुणाला ती जिद्दी वाटायची. पण तीच जिद्द तिचा एक सगुण होता.
लहानपणी ती गावात येणाऱ्या डॉक्टरांना बघायची. ते आजारी लोकांना औषध उपचार करून बरे करायचे. लोकही डॉक्टरांचे आभार मानायचे. त्यांना आपला देव मानायचे. सन्मान द्यायचे. तिला ते खूप छान वाटायचे. मग तिलाही वाटायचं आपणही डॉक्टर व्हायचं या गोर गरीब लोकांचे उपचार करायचे. त्यांना आनंद सुख द्यायचा. त्यांच्या साठी आपणही देवदूत व्हायचे.
सई जसजशी मोठी होत होती तसतसी तिची ती आत्मिक इच्छा आणखीच दृढ होत गेली. आणि मग ती एक निष्णात डॉक्टर व्हायला शहरातल्या मोठ्या मेडिकल कॉलेज ला दाखल झाली. अभ्यासात हुशार असल्यामुळे तिला अगदी सहज ऍडमिशन मिळाली आणि तिचे डॉक्टर होण्याचे स्वप्न पूर्ण झाले.
शहरात शिकायला आल्या नंतर ती साधी भोळी सई थोडी बावचळल्या सारखी झाली. गावात वेढलेली सई तिला ते शहरी वाटेवर जर वेगळंच वाटलं. तशातच तिच्या सोबत शिकत असलेला विकी , त्याचे सोबत तिची ओळख झाली. विकी त्याचे ते टोपण नाव होते, त्याचे नाव विक्रांत भाऊसाहेब देशमुख होते. पाहायला उंच पुरा, अगदी रुबाबदार अशी त्याची पर्सन्यालिटी होती. पण बोलायला तितकाच शांत होता. आवाजात गोडवा होता. दया माया, इतरांचा सन्मान हे गुण त्याच्यात पूर्ण भरलेले होते. त्याला तिने रागावलेला किंवा चिडलेला कधीच बघितले नव्हते. त्याची ही आई त्याच्या लहानपणीच सोडून गेली होती. तोही आपल्या बाबांच्या प्रेमातच मोठा झाला होता.
सई आणि विक्रांत दोघांची ओळख झाली. ती पण एक वेगळीच कहाणी आहे. एक दिवस क्लास सुरू होता. प्रॅक्टिकल ला जाण्यासाठी म्हणून सरांनी दोन दोन ची एक अश्या बॅचेस पडल्या. त्यात सई आणि विक्रांत दोघांची एक बॅच झाली. मग त्यातच दोघांची ओळख, मग मैत्री आणि त्यातूनच दोघांचे प्रेम झाले. दोघेही सुस्वभावी. दोघांचे खूप जमायचे. त्यांची झालेली ती जोडी अगदी कॉलेज च्या शेवट पर्यंत सोबत होती.
दोघांनीही मग एम एस ला पण सोबतच ऍडमिशन घेतली . शिक्षण सम्पवून नोकरी पण सोबतच जॉईन केली.
पण सई आपले उद्दिष्ट मात्र विसरली नव्हती. तिला आपल्या गावातल्या गरीब लोकांची सेवा करतायची होती. ते तिने एक दिवस विक्रांत जवळ बोलून दाखवले. विक्रांतला तिचा तो निश्चय खूप आवडला. त्यांनी मग ठरवले की रविवारी दोघांनाही सुटी असायची. तर दर रविवारी गावात जाऊन निशुल्क सेवा द्यायची.
आज त्यांचा गावाला जायचा पहिलाच रविवार होता. सकाळी उठून तयारी करून दोघेही बाईकनेच गावकडे निघाले. सोबत काही औषधे इंजेक्शन वैगेरे घेतले होते.
सई च्या आबांना त्यांच्या या उपक्रमा बाबत काहीच कल्पना नव्हती. ते त्यांना बघून चकित झाले. पण दोघांचा निषकय ऐकून. त्याना खूप आनंद झाला. त्यांचे डोळे भरून आले . डॉक्टरांच्या इलाजा अभावीच त्यांच्या पत्नीचा म्हणजे सईच्या आईचा मृत्यू झाला होता. त्यांच्या मनात ती गोष्ट नेहमीच खटकत असायची. सई डॉक्टर झाली आता आपले स्वप्न पूर्ण होईल याची त्यांना खात्री होती. पण सई त्याची अंमलबजावणी कधी करेल हे तीन माहीत नव्हते. आणि सईला, तू गावातल्या लोकांचा पण इलाज करायला गावात येत जा असे सांगणे त्याना जमले नाही. पण त्यांची पोरच इतकी सुसंस्कृत आणि शहाणी होती की त्याना तिला तसे सांगायची गरजच पडली नाही.
आता गावातल्या लोकांच्या आशा जगल्या होत्या. त्यांचा आजारात इलाज करणार कोणी तरी त्याना विचारत होत. अडीअडचणीच्या वेळी मदतीला धावत होत. त्याना समजून घेणारं त्यांच्यातलंच कोणी हक्कच त्याना मिळालं होतं.
हाच परिपाठ मग वर्षोन गणती चालत राहिला.