बालपणी च एक भूत
बालपणी च एक भूत
माझ कुटुंब खूप मोठ आहे .माझे आईबाबा पुण्यात राहायचे.मी आणि माझे दोन भाऊ गावी राहायचो,आजी आजोबा, दोन काका काकू त्यांची मुलं आत्या तीच्या मुली. आम्ही सगळे एकत्र राहायचो.
आमच घर छोटेे होते पण आम्ही सगळे खूप आनंदात राहायचो. आम्ही सर्व मुलं लहान होतो, दिवस भर खेळत बसायचो काका काकू शेतात कामाला जाायचे ,आजी आजोबा आमच्या कडे लक्ष ठेवनया साठी घरी बसायचे .
आमच हे रोज च ठरलेलं होत, दिवस भर खायचं, प्यायच दिवस भर हींडायच.
रात्री मात्र खूप वेगळी परिस्थिती होती. रात्री आम्ही तिघं एकत्र झोपायचो, तीघही लहान होतो. मी खूप घाबराायचे पण माझ्या भावांकडे बघून गप्प बसायचे, माझ्या दोन बाजूला दोन भाऊ मी मधे अस झोपायचो, पण रोज रात्री विचित्र
आवाज यायचा आम्ही तिघं खूप घाबरायचो. काय भानगड माहित नाही पण रोज रात्र तो आवाज यायचा, रोज रात्री
आम्ही तिघं खूप घाबरायचो,
आम्ही तिघं रात्र भर जागायचो आणि काय माााहीत का पण हे रोज च ठरलेलं होत. हे काय घडत होत तेेव्हा आम्हाला माहीत नहवत, आम्हाला वाटायचं की हे भुत आहे .
आता त्या गोष्टींवर खूप हसू येते आहे. त्या वेळेस जो आवाज यायचा तो छूम छूम आसा होता. अम्हाला वाटायचं की पायात पैंजण घालुनं कोनतर फिरतय. पण नंतर समजल कि रात्री एक किडा असतो जो ,आसा आवाज काढत असत. पण ते बालपणी च एक भूत, आमच्या कायम लक्षात राहील.

