अतृप्त आत्मा
अतृप्त आत्मा


एक गाव होते. त्या गावाचे नाव मिरचीनगर होते. त्या गावात प्रवेश करण्याआधी एक पहाडी असते. अशी मान्यता असते की, तेथे एक चेटकीण राहते. गावातील लोक संध्याकाळ झाली की, घरात लपतात. गावातल्या लोकांचे मत असते की, रात्री ती चेटकीण दार वाजवते. जर कोणी दार उघडले तर ती त्याला खाऊन घेते. गावातील लोक त्या चेटकिणीला घाबरत असतात.
गावात दोन तरुण असतात जे मित्रही असतात. त्यांच्यातला एक म्हणतो की, आपण त्या पहाडीवर जाऊन दाखवू. तर एक त्यांच्या मताशी सहमत नसतो. तरी ते दोघे जातात. रात्र झाल्यावर ते दोघे पहाडीवर जातात. तर त्यांना एक युक्ती सुचते, ते लाकडाची शेकोटी करतात. आणि हात शेकतात. त्या दोघांना भूक लागलेली असते तर ते त्या शेकोटीवर अन्न शिजवतात.
हरणाची मान त्यांच्या शेकोटीवर येऊन पडते तर ते दोघे खूप भयभीत होतात. दोघे एकमेकांना भयभीत नजरेने पाहू लागतात. पहाडीवर एक दगड असतो. त्याजवळ एक बाई उभी असते. तिच्या डोळ्यांतून रक्त निघत असते. ती बाई हरणाचे मांस खात असते. तर ते दोघे घाबरुन घराकडची वाट धरतात.
ग्रामस्थ विचारतात काय झाले, ते दोघे सांगतात की, पहाडीवर खरंच चेटकीण राहते. मग गावातले लोक घरी झोपायला जातात. त्या दोन मित्रांच्या घरचा दरवाजा वाजतो. दोघेही घाबरु लागतात. दरवाजा उघडण्याआधी दरवाजा आपोआप उघडतो. ते लपतात. त्यांना त्या बाईचे उलटे पाय दिसतात. ते दोघे ओरडू लागतात. गावातले लोक जमा होतात व विचारपूस करतात. चेटकीण गायब होऊन जाते.
गावातले लोक तांत्रिक बोलवतात. तांत्रिक सांगतो की,"चेटकिणीची शेवटची इच्छा बाकी आहे."
चेटकीण सांगते की,"माझे श्राध्द करुन गावात अन्नदान व्हावे मग मी गाव सोडून जाईल".
तसेच गावातले लोक करतात व तिला मुक्ती मिळते.