अपघाताने हरवलले गवसले
अपघाताने हरवलले गवसले
"ओ भैया ,ओ भैया बाहर आ देख तो उधर कोई अँक्सिडेंट हुआ है!"अण्णा जीवाच्या अकांतानं ओरडत शेतातून रस्त्या पर्यंत आले.मागून भैया ही धावत आला ,पहाटेची वेळ , रोडवरचा लाईट होता पण बराच लांब.
(शेक-यानां दिवसा लाईट नसल्या मुळे रात्री /पहाटे शेतात पाणी द्यावे लागते)
दोघांनी मोबाईलची टार्च लावून इकडे तिकडे पाहिल .
भैया,"आण्णा कोई नही दिखरहा इधर ,"
अण्णा,"अरे असेल बघ ,देखो देखो मुझे आवाज आई थी ,उधर की बाजु मे देख"
भैया रोडच्या पलिकडे जाऊन बघतो ,तर झाडांमधे कुणितरी पडलेल दिसत,मोटर सायकल आडवी झालेली.
भैया,"आण्णा ,ओ आण्णा ये इधर देखो कोई तो गिरा लगता है"
अण्णा लगबगीन ,"मैय बोला ना ,सुना मैने कुछ तो हुआँ" दोघ टार्चचा प्रकाश टाकून त्याला बघायला खाली वाकतात तर--
"सुमित!" अण्णा पुटपुटतात आणि मागे होत डोक्याला हात लावून खाली बसतात.
भैया,"अरे ये तो सुमित दादा ,अपने सुमित दादा"
भैया अजुन जवळ जाऊन त्याला हलवत ,"दादा ,सुमित दादा"
तो डोळे किलकिले करून जरा वर बघतो पण अपघातात बराच मार लागल्याने तो परत बेशुध्द होतो.
(भैया ,मध्यप्रदेशातले खंडवा ,झाबुआ या जिल्ह्यातले बरेच आदिवासी शेतात राखणदार म्हणून मध्य प्रदेश आणि महाराष्ट्राच्या बार्डरवर असलेल्या जिल्ह्यां मधे काम करतात , त्यांची बोली भाषा वेगळी असते पण इतरांशी ते हिंदीतच बोलतात.)
भैयाला अण्णांनच्या परिस्थीतीची कल्पना येते आणि तो शेजारीच शेत असलेल्या नंदूला फोन कतो,"नंदू भैया ,आप खेत मे है क्या?"
नंदू,"नही ,आ रहा हू ँ ,क्यों क्या हूआ"
भैया,"जल्दी आओ जरा बडी गाडी लेके आओ ,"
नंदू,"अरे बोल तो क्या हूआ"
भैया ,"अँक्सिडेंन्ट हुआ ,सुमित भैया का"
नंदू,"अरे सुमित का अँक्सिडेंन्ट हुआ तो तुझे कैसे पता,"
भैया ,"अपने खेत के पास हुआ अँक्सिडेंन्ट"
सुमित वर्षभरापूर्विच घर सोडून निघून जातो ,त्याला ऐका सोबत नोकरी करणा-या मुलि सोबत प्रेम होत, त्याला तिच्याशीच लग्न करायच असत आणि अण्णानां ते मान्य नसत कारण आधिच त्याचा साखरपुडा त्याच्या मामाच्या मुलिशी झालेला असतो.
नंतर बरेच महिने तो कुठे राहतो? काय करतो? याची चौकशीही अण्णांनी कधि केली नाही आणि सुमितनी हि त्यांच्याशी बोलायचा कधि प्रयत्न केला नाही.
पण मंदा काकू त्याच्या मित्रां करवी त्याचे हालचाल विचारत ,गावातन कुणि जणार असल की त्याच्या साठी काही तरी पाठवत अण्णाच्या चोरून.
तोच सुमित आज गावा जवळ कसा ?या विचारात नंदू गाडी घेऊन शेता जवळ पोहचतो.
विमनस्क अवस्थेत बसलेले अण्णा आणि जवळच बेशुध्द ,रक्तबंबाळ होऊन पडलेला सुमित .
भैया नंदूच्या गाडी जवळ येऊन ,त्याला परिस्थिती दाखवायचा केविलवाणा प्रयत्न करतो.
परिस्थितीच गांभिर्य लक्षात घेऊन ,नंदू "अण्णा ऊठा ऊठा,हे बघा सुमित परत आलाय ,आपण त्याला दवाखान्यात घेऊन जाऊ ,ऊठा अण्णा ,ओ भैया चलो ये सुमित भैया को ऊठावं "
अण्णानां गाडीत बसवून तो आणि भैया सुमितला उचलुन गाडीच्या मागच्या सीटवर ,अण्णांच्या मांडी
वर डोक ठेऊन निजवतात.
भैया समोर येऊन बसतो आणि नंदू गाडी हाँस्पिटलच्या दिशेने जोरात न्यायला लागतो.
अण्णा मांडीवर मलुल होऊन पडलेल्या लेकाच्या डोक्यावरून हात फिरवतात.मुक्यानेच त्याला विचारतात ,"काय रे किती महिन्यानीं परतलास ते ही असा ,तुला बापाची जराही पर्वा नाही.माझ्या मनाच्या वेदना नाही कळल्या तुला ."
त्याच त्या मुलि साठीच वेड आणि तिच्याशी लग्न करायचा तो हट्ट ,त्यातुन घरात त्यान घातलेला गोंधळ आणि ,"आज पासुन माझे आई वडिल मेले माझ्या साठी आणि मी तुमच्या साठी,ज्यानां मुलाच्या सुखाची पर्वा नाही ते नसलेलेच बरे.परत तुमच्या घराची पायरी चढणार नाही ,बसा तुमचा मान आणि दिलेला शब्द, नातीगोती कुरवाळत"हे शब्द कानात घुमत होते.
विचारांच्या गोंधळात गाडी केव्हा हाँस्पिटल च्या गेटजवळ आली हे अण्णांना कळलच नाही.
नंदू"अण्णा !अण्णा !! उतरायच ना"
तोवर भैय्या समोर दिसणा-या रिसेप्शनला जाऊन पेशंट जख्मी असल्याची सुचना देतो ,तिथली माणस लगेच स्ट्रेचर घेऊन येतात नि अण्णांनच्या मांडीवरून सुमित स्ट्रेचरवरून हाँस्पिटलात दाखिल होतो.
तोवर हि बातमी मंदा काकूं पर्यंत पोहचते तशीच त्याच्या सध्याच्या त्याच्या मित्र व शेजा-यां पर्यंत पण .
मंदा काकुनां गावातली सुमितची मित्र मंडळी घेऊन हाँस्पिटलला येते. बरिच मंडळी दिवस उजाडे पर्यंत आवारत हजर पण त्याची बायको अजुनही कुणाच्या नजरेस पडत नाही.
गावाकडच्या लोकांना तिचा फारसा परिचय नसल्या मुळे ते तिचा विचार करत नसले तरी इथली मित्र मंडळी आणि शेजारी तिच्या अनुपस्थितीची चर्चा करतानां अनेक तर्क लावायला लागतात.
अण्णा ,मंदा काकू अस्वस्थपणे आँपरेशन थेटरच्या बाहेर बसुन सुमितच्या तब्बेति बाबत काय कळत याची वाट बघत चिंतित अवस्थेत .मंदा काकूंचा आपला देवाचा धावा चालु, गजानन महाराज आणि तुळजा भवानीला साकड घालुन सुमितच्या सुरक्षीत असण्याच मागण मागून होत.
आता आकाश सुमितचा आँफिसातला मित्र म्हणजे त्याचा आणि त्याच्या बायकोचा 'काँमन फ्रेंड' येतो.
तो अण्णा आणि काकूं जवळ येऊन त्यांच सांत्वन करतो.
इकडे सुमितची परिस्थिती चांगली आहे ,वेळेवर उपचार मिळाल्या मुळे तो आता धोक्या बाहेर आहे अस डाँक्टर सांगतात नि अण्णा व मंदा काकू त्याला आता बघू शकतात अस सांगून डाँक्टर निघून जातात.
अण्णा आणि मंदा काकू आत थेटर मधे सुमितला बघायला जातात.
इकडे आकाश नंदू जवळ येऊन ," हा कुठे सापडलारे तुम्हाला ,हा जीव द्यायला निघाला होता रात्री "
नंदू,"काय??"
आकाश,"हो यार ,रात्री खुप घेतली होती त्यानं ,म्हणे रिया"
नंदू प्रश्नार्थक नजरेन ,त्याच्या कडे बघतो.
आकाश,"अरे त्याची बायको ,तिला ऐका जर्मन कंपनित जाँब मिळालाय ,ति तिकडे चल म्हणत होति त्याला हि नोकरी सोडून.गेले दोन महिने दोघांचे खुप वाद सुरू होते.हा जायला नकार देत होता आणि तिच यान तिच्या सोबत जाव , हेच सुरू होत.ति गेली पंधरा दिवसां पूर्विच आणि याला डिव्होर्सची नोटिस पाठवली .त्यान तिला फोन केला पण तिचा निर्णय तिनं घेतला होता.यानं रात्री खुप घेतली ,मला फोन केला खुप गप्पा मारल्या .त्यानं याच पोरी साठी आई-वडिलानां सोडल होत .याचा पश्चाताप करत होता, रडत होता "
नंदूच्या चेह-यावर कधि आश्चर्य कधि संताप तर कधि करूणा दिसत होती.
आकाश ,"अरे मला म्हटला कोणत्या तोंडान घरी जाऊ मी मेलो तुमच्या साठी अस म्हणून आलो होतो रे.खरच मरतोच आता ,अलविदा यार ,माझ्या कडून अण्णा आणि आईची माफी मागशिल?? तु त्यांच्या कडे लक्ष दे हं! मी नाही त्यांची सेवा केली रे पण तु कर, मित्राची शेवटची इच्छा पूर्ण करशिल ?करशिल ना यार??"
आकाश ,"अरे मी त्याला म्हटलो मी येतोच आपण गावी जाऊ ,अण्णा आणि आईशी बोलु ,आई -वडिल माफ करतात अरे मुलांना ,सगळ ठिक होईल ,मी येई पर्यंत कुठेच जाऊ नकोस."
"मी लगेच त्याच्या फ्लँटवर गेलो तर दार उघड , मोबाईल लावला तर तो घरातच वाजत होता.मी रात्रभर त्याला शोधतोय.ब-याच मित्रानां फोन केले तेही बिचारे जमेल तिथे शोधत फिरताय त्याला
मी त्याच्या वाँचमनला निरोप देऊन आलो होतो तो आला तर मला फोन कर ,सकाळी त्याच्या शेजारच्या काकांचा फोन आला कि सुमितला इथे अँडमिट केलय आणि मी इथे आलो."
नंदू ,"तु? " त्याची ओळख विचारत
आकाश,"मी आकाश ,सुमितच्या आँफिस मधे त्याच्या सोबत काम करतो"
नंदू,"अच्छा !तर आकाश आता तु मला जे काही सांगितल ते आपल्या दोघातच राहु दे ,सुमितशी आपण दोघ ही नंतर बोलु ,सावरेल तो ,अण्णा आणि काकू समजुनही घेतील आणि सांभाळुनही घेतील त्याला ,ठिक आहे ना ?"
आकाश ,"हो हो ,Ok done!"
काहि तासात सुमित शुध्दीवर येतो.
अण्णा आणि मंदा काकूनां समोर बघुन त्याच्या डोळ्यातन पश्चातापाचे अश्रू येतात,अण्णा त्याचा हात हातात घेत त्याला धिर देतात,काकू डोक्यावरून हात फिरवत त्या त्याच्या जवळ ,त्याच्या सोबत असल्याचा विश्वास देतात.
मागे आकाश आणि नंदू उभे असतात
आकाश कडे बघत सुमित केविलवाणा होतो ,त्याला नजरेतनच विचारतो,"मी यानां सोडून जाणार होतो?"
आकाश त्याला शांत रहायला सांगतो.
खरतर आकाशन सुमितला आई-वडिलां बद्दल जे सांगितलेल असत ते खर ठरत .अपघातेने का होईना सुमितल आई-वडिल परत स्विकारतात आणि त्यांना,त्यांचा लेक परत मिळतो.
