Shobha Wagle

Fantasy Others

3  

Shobha Wagle

Fantasy Others

अंतराळ

अंतराळ

6 mins
621


संध्याकाळचे सात वाजायला आले होते.ए तरी मुलांचा क्रिकेट खेळ संपला नव्हता. सुरेश फिल्डींग करत होता. राकेश ने एक शॉट मारला तसा बॉल लांब झाडीत गेला. सगळी पोरे ओरडली, "सुरेश, पळ लवकर. बॉल घेऊन ये". तो धावून गेला, पण त्याला बॉल कुठेच दिसेना. झाडी बाजूला करुन त्याने शोधले तरी बॉल दिसेना. तेवढ्यात बाजूच्या झाडीतून त्याला आवाज आला. तेथे त्याने बघितले तर तेथे एक रोबोट सारखा कोणीतरी होता व त्याच्या हातात बॉल होता. तो काही तरी बोलत होता पण सुरेशला ते कळत नव्हते. त्या रोबोटने बॉल पुढे केला. सूरेशने तो घ्यायला हात पुढे केला इतक्यात त्या रोबोटने त्याच्या अंगावर एक कपड्या सारखे काहीतरी टाकले व त्याला उचलला व उंच उंच उडू लागला. सूरेश जोराने ओरडून आपल्या मित्रांना हाका मारू लागला पण कुणालाच ऐकू गेले नाही. उंच उंच जाताना त्याला खूप भिती वाटली आणि त्याने डोळे गच्च मिटून घेतले. एवढ्यात मोठा आवाज झाला.

त्याने डोळे उघडले. बघतो तर काय! तो एका मोठ्या राज महलासारख्या जागेत होता. तेथे खूप जण होते पण ते माणसा सारखे दिसत नव्हते. तो खूपच घाबरला व गोंधळून गेला. एवढ्यात एक परी सारखी दिसणारी सुंदर आकृती त्याच्या जवळ आली व म्हणाली, " बाळ घाबरू नकोस. तू अंतराळात आहेस. तुला आम्ही वेगवेगळ्या ग्रहांवर घेऊन जाणार आहोत. तुला आवडेल तेथे तुला ठेवणार. हे बघ बाळा, तुमची पृथ्वी जास्त दिवस टिकणार नाही. आणखी काही वर्षांनी तिचा अंत होणार. तुम्ही सगळे बेजबाबदारपणे वागलात. झाडे कापली, त्यामुळे पाऊस कमी, पशू- पक्षी कमी होत आहेत. फक्त माणसेच माणसे आणि त्यातले बहुतांश भ्रष्टाचाराने मातलेले. त्यामुळे पृथ्वीवरचे वरूण, जल, माती, वनस्पती सगळे वैतागलेले आहेत. म्हणजे आणखी काही वर्षांनी तिचा अंत नक्की होणार आहे. तू आणि तुझ्यासारखी बरीच मुले आहेत त्यांचा काहीच दोष नाही. अशा मुलांना आमचे रोबोट स्पेस मध्ये घेऊन येणार, जसा तुला आज आणला तसा. आम्ही वेगवेगळ्या ग्रहावर तुम्हाला घेऊन जाणार व जेथे तुम्हाला आवडेल तेथे ठेवणार. तुम्हाला मीच मदत करू शकणार कारण मी एकटीच तुमची भाषा जाणते. तुम्ही पृथ्वी वरचे लोक मोठे शास्त्रज्ञ आहात आणि या आधीही अनेक शास्त्रज्ञ होऊन गेलेत. तुमच्या शोधक व जिज्ञासू वृत्तीची गरज ह्या ग्रहांना खूप उपयुक्त आहे. आज तू इथे थांबायचे. उद्या तुला मी मार्सवर घेऊन जाणार. तुला वाटते तसा तो लाल असला तरी थंडगार आहे. 

इथे एक कक्ष आहे. तेथे तुला नेणार. तेथे तू डोळे झाकून तुला आवडणाऱ्या शास्त्रज्ञाचे नाव घेऊन त्यांचे स्मण कर म्हणजे त्या शास्त्रज्ञाची सगळी कल्पकता, वैचारिक देणगी तुला प्राप्त होईल. त्या साहाय्याने तू इथे व बाकीच्या ग्रहांवर त्याचा उपयोग करू शकशील.

तर सुरेश, आहेस ना तयार? मग चल", असे म्हणून त्याला ती एका वेगळ्या कक्षेत घेऊन गेली. तेथे आणखीही बरीच मुले होती.

आता आवडता शास्त्रज्ञ म्हणजे, सुरेशला तर सगळेच आवडत. जसे आयझॅक न्युटन, चार्ल्स डार्विन, जी.एन.रामचंद्रन, विक्रम साराभाई, राजा रामण्ण, होमी भाभा, जयंत नारळीकर अशी बरीच नावे त्याला आठवली. शेवटी त्याने आपले आवडते जयंत नारळीकरांचेच स्मरण केले. परवाच टिचरनी त्यांच्या बद्दल सांगितले होते आणि मुलांनी शंकेबद्दल त्यांना पत्र पाठवले तर ते लगेच त्याची उत्तरे स्वतः लिहुन देतात असे ही सांगितले होते. ते मोठे खगोल शास्त्रज्ञ. त्याने डोळे उघडले. परीने त्याला दुसऱ्या ग्रहावर आणले होते. गुरू, शनि आणि बाकिच्या ग्रहांवर बरेच लोक कार्यरत होते. सुरेशने आपला मार्स ग्रह पकडला. हा पृथ्वी जवळ आहे आणि आपल्या पृथ्वी करिता काही करून तिचा अंत होऊ नये यासाठी काही करता येतं का ते ही पहावे म्हणून तो मार्सवर आला.

आणखी शंभर वर्षांनी परिस्थिती खूप बदललेली असेल. आज जसा लॅपटॉप वापरतात तसं एक

यंत्र असेल. आता आपण लॅपटॉप हातात धरतो त्या ऐवजी माणूसच त्या यंत्राच्या पेटीत जाऊन बसणार. आतल्या बाजूला त्याला बसायला ऐसपैस जागा असेल. बसण्याची खुर्ची फिरणारी असेल आणि त्या पेटीच्या आतल्या भिंतीला वेगवेगळे बटण लावलेले असतील. आत एक लहान यंत्र मानव ही असेल त्याच्या मदतीला. आता आपल्याला खायचं असेल तर आपण घरी करुन, हॉटेल मध्ये जावून किंवा फोन करून मागवतो. तेव्हा आतल्या पेटीतला बटण दाबला की मेनू कार्ड येईल आणि जे जे खायचे असेल ते किल्क करत गेलो की मग तो जिन्नस समोर स्क्रीनवर दिसेल. त्यांच्याकडे बघताक्षणी तो खाल्ल्याची अनुभुती होईल. आनंद, समाधान आणि मुख्य म्हणजे पोट भरल्याचे जाणवेल. मग आपला वेळ भरपूर वाचेल. वस्तु आणायला नको. स्वयंपाक करायला नको, वाढायला नको, जेवायला नको. शेवटी काय, भांड्यांना बाई नको व मशीन ही नको. आपल्याकडे वेळच वेळ असेल.

पृथ्वीवर प्रवास करणे खूपच त्रासदायक. म्हणजे वेगवेगळी साधने आहेत तरी लोकांना ते फारच त्रासदायक होते. बस, रेल्वे, जहाज आणि विमान असले तरी ट्रॅफिक जॅम झाली किंवा हवामान ठीक नसेल तर त्रासदायक व खूप वेळ प्रवास करण्यात घालवावा लागतो. इथे अंतराळात प्रवास फारच सोपा . फक्त एक चष्मा डोळ्यांना लावायचा. कुठे जायचे ते ठिकाण निवडायचे व डोळे मिटायचे. थोड्या वेळाने डोळे उघडले की जेथे जायचे होते ते ठिकाण समोर दिसेल. असे करून 'अराऊंड द वर्ल्ड इन ऐठी डेज' करत होतो ते आता "अराऊंड द युनिवर्स विदिन ए मिनिट' असं होईल. अंतराळात रस्ते, रेल, पाणी काही ही लागणार नाही. तिकिटांची किटकिट नाही, रिर्जवेशनची गरज नाही. सगळा व्यवहार फक्त एका लहानशा चष्म्यानेच. मग ऑफिसला लेट मार्क लागणार नाही. पगार कट होणार नाही. आणि मुख्य म्हणजे प्रवासात जो पृथ्वीवर थकवा जाणवतो तो मुळीच जाणवणार नाही. एकदम फ्रेश व ताजेतवाने असतील सगळे.

विज्ञानाची एवढी प्रगती होईल की बाळाचा जन्म आईच्या पोटातून व्हावा असं काही नसेल. आताच बायका आपलं करियर आणि फिगर नीट ठेवण्याकरता मातृत्व स्वीकारत नाहीत. कधी पुरूष अथवा स्त्री मध्ये दोष असतो. अशावेळेला टेस्ट ट्यूब बेबीची निर्मिती झाली. पण ह्या टेस्ट ट्यूब बेबीला सुध्दा आईचा आधार किंवा गर्भाशय लागतो. पण यापुढे त्याला आईची मुळीच गरज लागणार नाही. ज्यांना मुल हवे त्यांचे बीज घेऊन बेबीचा जन्म सरळ लॅब मध्येच करतील. हे बेबी जन्मताच चालू बोलू शकेल आणि त्याच्या संभाळासाठी रोबो असेल. हा रोबो त्या बेबी बरोबर सतत असेल. त्याची सगळी कामे रोबोच करेल. आता कसं आई बाबा कामावर गेले की बेबी आजी आजोबांकडे, आयाकडे किंवा बेबी सिटिंग मध्ये असते तसे काही ही नसेल. त्या बेबीचा सखा मित्र एकमेव तो रोबोच असेल. मग बेबी एकटं पडणार नाही. दुसरी गोष्ट, सध्या आपण कुटुंब म्हणून आई वडील आजी आजोबा आणि मुले एकत्र राहतो, तसं मुळीच नसेल. सगळे वेगळे वेगळे राहतील. भाऊबंध, आपुलकी

काही ही नसेल. आई आणि मुल म्हणून एक वेगळं अनोखं नातं आहे, ते राहणार नाही. आपुलकी, माया, काळजी, जिव्हाळा, चिंता, विवंचना कशाचाच पत्ता नसणार. प्रत्येक जण स्वतंत्र असणार. एकमेकांची बांधिलकी मुळीच नसणार. भावनांना महत्वंच नसेल.

आपण आपल्या पृथ्वी वरचेच जाणतो. पण सुरेश व त्याच्या सारख्या मुलांनी प्रत्येक ग्रहवरचा शोध घेतल्यावर समजून चुकले की पृथ्वी सारखे सगळीकडे सगळ्या ग्रहावर लोक राहतात. त्याच्यात व आपल्यात बराच फरक आहे. काही खूप मागासलेले तर काही ठिकाणी आपल्या पेक्षा जास्त उन्नती केलेले ही आहेत. तिथली सगळी कामे यंत्र व यंत्रमानवाकडूनच केली जातात. काही ठिकाणी तर आपल्या पृथ्वीवर असल्यासारखेच स्थिती आढळले. तिथले लोक, त्यांची राहणी, तिथलं निर्सग बरंच आपल्या पृथ्वी प्रमाणेच होता. एकवेळ सुरेशला वाटले आपण परत पृथ्वीवर आलो की काय? पण नाही तो मार्स ग्रहच होता. इतकी वर्ष पृथ्वी वरच्या लोकांना त्याची माहिती नव्हती. आता समजली. बरं झालं. आता पृथ्वीवरच्या लोकांना इथं येता येईल. इथल्या व तिथल्या लोकांनी मिळून कार्य केलं तर आपल्या पृथ्वीला विनाशापासून वाचवता येईल.

जसे आपण विमानाने प्रवास करून एका देशातून दुसऱ्या देशात जातो तसे ग्रहयानातून प्रवास करावा लागेल. एका ग्रहावरून दुसऱ्या ग्रहावर जाऊन आपण देवाण घेवाण करू शकू. अंतराळातला शोध दोन ग्रह एकत्र मिळून करतील. एकामेकांबद्दल बऱ्याच गोष्टी कळतील. 'हे विश्वची माझे घर' म्हणतो तसे 'हे अंतराळच माझे घर' म्हणता येईल. मग पृथ्वी वरच्या लोकांचे येणे जाणे वाढेल. शाळा कॉलेजच्या सहली ग्रहांवर काढतील. नवीन लग्न झालेली जोडपी हनिमून करता वेगवेगळ्या ग्रहांवर जातील. लोकांच्या मौज मजा करायची ठिकाणे वाढतील. सगळी कामे पटकन व यंत्र मानव करेल मग आपल्याला आरामच आराम! विचार करूनच सुरेशला खूप छान वाटले.

एवढ्यात त्याच्या नावाने कोणीतरी जोर जोरांने हाका मारत असल्याचा भास झाला. कोण बरे ह्या अंतराळात मला बोलावतं, तो चकित झाला. त्याचे सगळे मित्र त्याच्या भोवती गोळा झाले होते. त्यातला राकेश म्हणाला, "काय रे सुरेश, तुला लागलं कां? काय झालं? पडलास का? चक्कर आली का? किती वेळ लागला तुला बॉल शोधायला? आम्हाला भिती वाटली म्हणून तुला बघायला आलो. तर तू इथे पडलेला! ठिक आहेस ना?" त्या बरोबर सुरेशला आठवले. बॉल काढण्याकरता तो वाकला तेव्हा तो झाडाला आपटला होता आणि नंतर त्याचा प्रवास अंतराळमध्ये झालेला. तो काही बोलला नाही. सगळे मित्र त्याला घेऊन घरी निघाले. सुरेशच्या डोक्यात मात्र अंतराळ भरले होते.

               


Rate this content
Log in

Similar marathi story from Fantasy