Best summer trip for children is with a good book! Click & use coupon code SUMM100 for Rs.100 off on StoryMirror children books.
Best summer trip for children is with a good book! Click & use coupon code SUMM100 for Rs.100 off on StoryMirror children books.

Tanaya (तनया) Shinde (शिंदे)

Romance


3.9  

Tanaya (तनया) Shinde (शिंदे)

Romance


अनामिका भाग ४

अनामिका भाग ४

3 mins 1.6K 3 mins 1.6K

रीसॉर्ट सर्वंट दोघांच्या बॅग्स घेऊन रुमपर्यंत त्यांच्या सोबत आला नि आल्या पावली माघारी फिरलासुद्धा. आता रुममध्ये फक्त दोघंच होते. वैभव नि अनामिका.


खरे तर आपली जीवन सखी आज साक्षात आपल्यासोबत आहे याचा वैभव ला असीम आनंद झाला होता. अनामिका वॉशरूम मध्ये जाताच त्याने आपले दोनही हात हवेत पसरवून स्वतःभोवती एक गिरकी मारली नि पुढल्या क्षणी जरासे वाकून, हाताचे कोपरे कमरेकडे ओढून जोरात "येस्स्" म्हणून जल्लोष व्यक्त केला. तिची अवस्था देखील त्याच्यापेक्षा वेगळी नक्कीच नव्हती. ती देखील वॉशरूम चा बहाणा करून आरशासमोर उभे राहून स्वगत करण्यात मग्न होती. प्रचंड आनंदित झाली होती.


प्रवासातून शिणलेले दोन्ही जीव स्नान करून रूमच्या बाल्कनीत येऊन बसले. तिचे न्हाऊन टवटवीत झालेलं रूप न्याहाळण्यात त्याचे नेत्र दंग झाले. काळ्याशार चिंब कुरुळ्या केसांची वलये तिच्या खांद्यांवरून स्वच्छंद पणे अंगावर रुळत होती. त्यातील काही तिच्या गालांची लडीवाळपणे छेड काढत होती. चाफेकळी नसले तरी तिच्या लांब नि ठसठशीत नाकाचा त्याक्षणी त्याला हेवा वाटला. तिच्या ओठांचे रेखीव कंस तिच्या चेहऱ्यावर फुललेल्या प्रेमळ हास्याने इंचभर मागे सरकले होते नि गालांचे उंचवटे लालसर झाले होते. चहाच्या प्रत्येक घोटासमवेत दोघांचे नयनकमल एकमेकांचे रूप प्राशन करून खोलवर मनात साठवत होते.


ती सांज क्षणगणिक अधिकच बेधुंद भासू लागली. दूरवर हिरव्यागार डोंगरावरून वाहणारे पांढरेशुभ्र धबधबे, त्यातून डोकावणारा खट्याळ तांबूस सूर्य, त्या दोघांचे नवीन आयुष्यात स्वागत करण्यासाठी आसुसलेली चिंब बरसात, नाशिल्या मृदगंधा समवेत मनसोक्त वाहणारा थंडगार अल्लड वारा, नि Boyzone बँड चे सुमधुर गीत...


"Smile an everlasting smile

A smile could bring you near to me

Don't ever let me find you're gone

cause that would bring a tear to me

This world has lost its glory

Let's start a brand new story now my love..."


खुर्चीवरून उठून तो तिच्या समोर एका गुडघ्यावर झुकला, नि आपला उजवा हात तिच्यासमोर धरून म्हणाला,


"The most beautiful lady in my life, May I have honor to dance with you?"


त्याच्या नजरेतील प्रेमळ हाकेला तिने दिलेल्या हसऱ्या प्रतिसादाने तो घायाळ झाला. बराच वेळ तिचे पाय त्याच्या तालावर हातात हात घेऊन थिरकले. त्याचे उबदार श्वास तिला त्याच्या अधिकच जवळ खेचत होते. तिच्या ओठांमधला गोडवा त्याला हावरट बनवत होता. त्याच्या घट्ट मिठीत तिला जाणवले, ती त्याच्यासाठी किती आसुसलेली होती... हृदयाचे मिलन तर कधीच एकमेकांना न बघता झाले होते.. पण त्यांचे भौतिक अस्तित्व ही एकरूप होण्यासाठी क्षणोक्षणी अधीर होत होते...


त्याने तिला अलगद उचलून रूममध्ये आणून बेडवर ठेवले. हाताच्या बोटांपासून तर मानेपर्यंत, खांद्यांवर नि तिच्या बॅक नेक मधून दिसणाऱ्या पाठीवर, तो तिच्यावर अविरत चुंबनांचा वर्षाव करत राहिला. त्याच्या ओठांचा स्पर्श तिच्या कणाकणात रोमांच फुलवत होता. तिचे दोन्ही हात त्याच्या बाहुदंडांमध्ये बंदिस्त झाले होते. त्याच्या अजिंक्य बाहुपाशासमोर तिने कधीच स्वतःला विनाअट समर्पित केलं होते नि त्याचे निखळ प्रेम मुसळधार पावसाच्या आवेगाने तिच्यावर अखंड बरसत होते.


जेल कँडल च्या सुवासिक मंद प्रकाशात नि अखंड बरसणाऱ्या थेंबांच्या मादक संगीताच्या साक्षीने ती पहाट तिला नि त्याला पूर्णत्वाचा साक्षात्कार घडवणारी ठरली.

*****


स्त्री कितीही शिकली किंवा मोठ्या पदावर असली तरी तिचे 'शक्ती'त तेव्हाच रूपांतर होते जेव्हा ती स्वतःला 'शिवा'च्या ठायी समर्पित करते. नि पुरुषाला देखील स्त्रीच्या मिलनातूनच पूर्णत्व प्राप्त होते. आपण कुणाचे तरी आहोत ही भावना स्त्रीच्या हृदयाला अप्रतिम समाधान मिळवून देणारी असते. याउलट स्त्री वर आपला हक्क गाजवून पुरुषी अहंकार अधिकच प्रबळ होतो.

*****


"आज पहाटे श्रीरंगाने मजला पुरते लुटले गं..

सखी .. मी मज हरवून बसले गं.... "

त्या मोहक सकाळी एफ. एम. वरच्या आशाताईंच्या मदहोश नजाकतीच्या सोबतीने गुणगुणत अनामिका स्वतःचे नवखे रूप आरशात टिपण्यात मग्न झाली.

*****

क्रमशःRate this content
Log in

More marathi story from Tanaya (तनया) Shinde (शिंदे)

Similar marathi story from Romance