Click Here. Romance Combo up for Grabs to Read while it Rains!
Click Here. Romance Combo up for Grabs to Read while it Rains!

Tanaya (तनया) Shinde (शिंदे)

Others


5.0  

Tanaya (तनया) Shinde (शिंदे)

Others


घुसमट

घुसमट

1 min 1.2K 1 min 1.2K

रात्रीचा अंधार संपून एकाएकी आग ओकणाऱ्या सुर्याच्या प्रखर किरणांनी दीर्घ स्वप्नातून खाडकन जाग यावी; ज्या शांततेच्या प्रदेशात आपण झोपलो होतो, तेथून थेट एका अज्ञात बेटावर येऊन उठावे; जिथे अंधारलेल्या रानात अजस्त्र, अक्राळविक्राळ नि हिंसक श्वापदेच राहतात, त्यांनी कधीच गरीब बापड्या अशक्त मानवांना एकतर गिळंकृत केले आहे किंवा काळ्या जादूने वश तरी केले आहे.


हे सगळे तुम्हाला दिसतंय, सलतंय! तुमच्या ठायी एकच शस्त्र आहे, शब्दांचे नि विचारांचे. कारण सगळ्या विश्वाचा बाप असलेल्या 'महात्म्या'ने तुम्हाला नेहमीच आग्रह धरायला शिकवलंय सत्याचा नि अहिंसेचा. तुमचा आवाज तुम्ही उठवू बघताय; पण तो आधीच करकचून "मुसक्यां"नी आवळून टाकलाय नि तुमचे लेखणी चालवणारे हात साखळदंडांनी जखडून क्षीण केले गेले आहेत कधीच! आणि तेच सर्वोत्तम आहे. कारण मोकळ्या तोंडाचा नि सक्षम हातांचा तुम्हाला खरेच उपयोग नाहीए आता. तुमच्या 'बाबा'ने रुजवलेली "स्वातंत्र्य-न्याय-समानते"ची विचारसरणी, जिला तुम्ही अत्यंत प्राणपणाने आजवर जपली आहे, 'ती', अशा "निर्मनुष्य" बेटावरील "समृद्ध, आदिवासी नि जंगली संस्कृतीत" पूर्णपणे अडगळ ठरली आहे. अशावेळी फक्त हतबल होऊन तेथील श्वापदांच्या क्रीडांचा मूकसाक्षीदार होणे हेच 'पात्र' तुमच्या वाट्याला आले असावे आज!


Rate this content
Log in