The Stamp Paper Scam, Real Story by Jayant Tinaikar, on Telgi's takedown & unveiling the scam of ₹30,000 Cr. READ NOW
The Stamp Paper Scam, Real Story by Jayant Tinaikar, on Telgi's takedown & unveiling the scam of ₹30,000 Cr. READ NOW

Tanaya (तनया) Shinde (शिंदे)

Tragedy

4.6  

Tanaya (तनया) Shinde (शिंदे)

Tragedy

अनामिका भाग २

अनामिका भाग २

3 mins
1.0K


19 मे 2020 ची सकाळ

घड्याळातील काटे एकमेकांशी काटकोन करून आपल्याच नादात दंग होते. नुकतीच न्हाऊन बेडरूममध्ये आलेली अनामिका केस विंचरता विंचरता आरशात स्वतःचे रूप न्याहळत होती. अचानक तिची नजर भिंतीवरच्या घड्याळाकडे वळली.

"बाप रे! नऊ वाजले.. अजून पूजा व्हायची आहे, डबा भरायचा आहे, झाडांना पाणी घालायचं देखील राहिलेच की!"


क्षणात तिच्या डोक्यात विचार आला, घड्याळातील काटे आपला पाठशिवणीचा खेळ थांबवून जरा वेळ तिथेच स्थिरावले तर किती बरे होईल? वेळेचं गणित जरा विक्षिप्तच आहे; नाही का! जेव्हा एखादा क्षण संपूच नये असे वाटते, तेव्हा वेळ वेगाने आपल्याला भविष्यात आणून पोहोचवते. नि जेव्हा आपण आतून पूर्णपणे खचून हतबल झालेलो असतो, तेव्हा हीच वेळ असन्न मरण झालेल्या आपल्या वर्तमानाप्रमाणेच गलितगात्र होऊन भूतकाळापालिकडे सरकण्याचे नावच घेत नाही. यात दोष वेळेचा नसून आपल्या मानसिक अवस्थेचा असतो. वेळ तर सदा कटिबद्ध असते.


आज ऑफिस सुटल्यावर अनामिका राघव ला भेटणार होती. महिनाभरापूर्वी त्याने तिच्या समोर ठेवलेल्या लग्नाच्या प्रस्तावाला होकार देण्यासाठी. पांढरा शुभ्र लांब कुर्ता, त्यावर आकाशी रंगाचे सुंदर नाजूक विणकाम नि निळ्या रंगाचा पलाझो.. तब्बल अकरा वर्षांनंतर आज पुन्हा एकदा आपल्या आयुष्यात जोडीदाराला प्रवेश द्यायला तिचे मन तयार झाले होते. मनातील हर्ष तिच्या चेहऱ्यावर निखळ पणे उठून दिसत होता. ओल्या केसांची वलये गालावर लडिवाळ पणे रुळत होती. ओठांचे कंस नकळत मागे वळून गालांचे उंचवटे अधिकच उंचावून चमकत होते. चाळीशीच्या आतून ठळक दिसणाऱ्या डोळ्यांमध्ये तिचे नवतारुण्य झळकत होते. नि नव्या आयुष्याचे सुखद स्वप्नही!


पुढल्या दहा मिनिटात बीजलीच्या वेगाने सगळे आटोपून अनामिकाने चपलांमध्ये पाय सरकवले नि ती दरवाजाकडे वळाली. तिने कडीला हात लावायला नि डोअर बेल वाजायला एकच मुहूर्त सापडला. बेलचे आवर्तन पूर्ण होण्याआधीच दरवाजा उघडला गेला.


एखादे भूत दिसावे तसे डोळे विस्फारले जाऊन अनामिका जागेवरच गारठली. दरवाजात चाळिशीकडे झुकलेला एक गृहस्थ एका चिमुरडीला आपल्या हाताशी धरून अपराध्या सारखा उभा होता, आपल्या मनातील खूप साऱ्या आकांक्षा डोळ्यात घेऊन. तो फक्त एवढेच म्हणाला, "माझ्या बाहुलीची आई होशील का?"


आज पासून ठीक अकरा वर्षांपूर्वी तिच्या मुलाच्या बापाच्या जबाबदारीला धुडकावून लावणारा एक बाप आज तिच्या दारात उभा राहून स्वतःच्या मुलीची आई होण्यासाठी तिच्याकडे याचना करत होता.


त्याच्या शब्दांनी तिला क्षणात काळाच्या पटलावर अकरा वर्षे मागे नेऊन सोडले. ज्या अकरा वर्षातला एकेक दिवस पुढे ढकलताना तिला एकेक तपासारखा भासला होता तीच अकरा वर्षे क्षणार्धात उलटी फिरून तिला पुन्हा एकवार भूतकाळात घेऊन गेली.

*****


19 मे 2009

अनामिका, "मी निघते, सगळं निवळल्यावर मला घ्यायला येशील!" 

*****


आणि तिच्या शब्दांचा मान ठेऊन तो आला होता तिला न्यायला. फार उशिरा नाही, फक्त अकरा वर्षांनी. आज 19 मे 2020 रोजी.


अकरा वर्षांपूर्वी च्या 'त्या' अघोर क्षणी छोटीशी भासलेली वावटळ इतक्या भयाण वादळात रूपांतरित झाली की तिचे सगळे आयुष्य उध्वस्त करून गेली. त्यातून बाहेर पडण्याच्या एकही मार्गाचा पर्याय नियतीने कधी तिच्यासमोर ठेवलाच नाही. नि एवढ्या दीर्घ कालावधी नंतर तिच्याकडे जे उरले होते नव्हते त्याची गोळाबेरीज करून, आज हिंमतीने ती जेव्हा नव्या आयुष्याची सुरुवात करू पाहत होती, तेव्हाच तिला उध्वस्त करणारा तिचा भूतकाळ, तिच्या दारात उभा होता.


क्षणात बसलेला तो मानसिक आघात इतका तीव्र होता, की गोठलेली ती चक्कर येऊन जागेवरच कोसळली.

*****


क्रमशः


Rate this content
Log in

More marathi story from Tanaya (तनया) Shinde (शिंदे)

Similar marathi story from Tragedy