The Stamp Paper Scam, Real Story by Jayant Tinaikar, on Telgi's takedown & unveiling the scam of ₹30,000 Cr. READ NOW
The Stamp Paper Scam, Real Story by Jayant Tinaikar, on Telgi's takedown & unveiling the scam of ₹30,000 Cr. READ NOW

Tanaya (तनया) Shinde (शिंदे)

Romance

5.0  

Tanaya (तनया) Shinde (शिंदे)

Romance

अनामिका भाग ३

अनामिका भाग ३

2 mins
487


बेशुद्धावस्थेतही तिच्या स्मृती पटलावर त्यांच्या पहिल्या भेटीचा दिवस आजही ताजा आणि सुस्पष्ट होता. 

******


20 जुलै 2006

विमानतळावरच त्याने टॅक्सी बुक केली. टॅक्सी दोघांना घेऊन दादर कडे निघाली. काही मिनिटे दोघेही गप्प होते. त्या शांततेत आत्मिक जल्लोषाचा आरव होता.


त्या धुंदीत काही घटका सरल्यावर मात्र अनामीकाला ती शांतता जराशी अस्वस्थ करून गेली. तिची बैचेनी तिच्या चेहऱ्यावर त्याने अचूक टिपली, जणू तो तिच्या मनाचे प्रतिबिंब दर्शविणारा आरसा असावा.


"अनु, तुझा अपेक्षाभंग तर नाही ना झाला मला बघून?" त्याने विचारले.


अनामिका, "हाच प्रश्न मी तुला विचारला तर?"


त्याने क्षणाचाही विलंब न लावता तिचा डावा हात आपल्या हातात घेतला. त्या स्नेहस्पर्शाने ती मनोमन सुखावली. त्याने खिशातून आपला उजवा हात बाहेर काढून तिच्या निमुळत्या नि लांब सडक अनामिकेत अलगद अंगठी सरकवली.


तिला काय नि कसे बोलावे ते समजेना, तिला काही उमजण्याच्या आतच तिच्या ओठांवर ओलसर स्पर्श जाणवला त्याच्या ओठांचा... त्याचे उबदार श्वास ती अगदी जवळून अनुभवत होती... दुपारच्या भर उन्हात चांदण्यांची बरसात झाली...


दादर वरून लोणावळ्याकडे जाणाऱ्या व्हॉलवो तुन पुढचा प्रवास सुरु झाला. मुळात प्रवासात सोबतीला आपले माणूस असणे हेच किती सुखदायक असते. आणि त्यांना तर आयुष्याभराच्या प्रवासाचा सोबती गवसला होता.


घाटातून जात असताना डोंगरमाथ्यावरील हिरवळ त्यांना प्रफुल्लित करत होती नि अखंड बरसणाऱ्या जलधारा नि कडेकपरीतून वाहणारे जल ओघ मन चिंब भिजवत होते.


कधीतरी वळणावर एकमेकांचा अगदी जवळून होणारा स्पर्श अंगावर शहारे फुलवत होता. अचानक बोगद्यातून जात असताना गाडीत पूर्ण अंधार दाटला नि तिच्या संपूर्ण देहातून वीज भिनावी तसा लख्ख प्रकाश पसरत गेला... त्याने अलगद घेतलेल्या तिच्या ओठांच्या चुंबनामुळे...


लोणावळ्यातील 'गिरीजा' रिसॉर्ट समोर उभयता पोहोचले. त्याने रूम पसंत करून रिसेप्शन काउंटर वरच्या रजिस्टर मध्ये नोंद केली... वैभव जाधव आणि अनामिका जाधव. स्वतःच्या नावासमोर त्याचे नाव बघून ती मनातून मोहरली. आजवर अभिमानाने स्वतःचं नाव आणि अस्तित्व मिरवणारी ती क्षणात त्याच्या नावासमोर पूर्णतः विरघळली होती.. आपले अस्तित्व त्याच्यात विलीन करण्यासाठी अधीर झाली होती...

*****

क्रमशः


Rate this content
Log in

More marathi story from Tanaya (तनया) Shinde (शिंदे)

Similar marathi story from Romance