अधूरे प्रेम - भाग
अधूरे प्रेम - भाग


आज कॉलेजचा पहिला दिवस.
अंजलीचा👸
लहानपणापासून आईबाबाला सोडून कधीच कुठे गेली नाही. आईच्या पदराला धरून सतत तिच्या मागे पुढे करायची. बाबाकडून कोडकौतुक करून घ्यायची. दहावी पर्यंतची शाळा गावातच होती. कुठे जायचं कधी प्रश्नच नाही.
कुठे गेली तरी आई नाहीतर बाबा सोबत असायचा. भाऊ लहान होता.
दहावी उत्तीर्ण झाली.... आता कॉलेजला जावं लागणार होते... एकटीने... अँडमिशन घ्यायला बाबा गेला सोबत.. बाबांनी घरातून निघताना कसं जायचं, कोणत्या एसटीनं जायचं, एसटी कुठे थांबते,येताना कसं यायचं... सगळं सांगितले आणि दाखवून पण ठेवले. दोघेही कॉलेजला पोचले. अँडमिशन घेतली कला शाखेमध्ये.
हुशार होती अंजली. पण तिला कलेची खूप आवड होती म्हणून तिने हे क्षेत्र निवडले. घरची परिस्थिती बेताची होती ..तरीही मुलगी खूप शिकावी असे आईबाबांना वाटत होतं म्हणून त्यांनी तिला कॉलेजला पाठवले.
कॉलेजचा पहिला दिवस उशीर व्हायला नको म्हणून पटापट आवरून जायला निघाली. सकाळी लवकरच सात वाजताची एसटी. आठ वाजता कॉलेज. भरभर स्टँडवर पोचली.. पण नेमकी एसटी उशिरा आली... एसटी डोंगर घाटातून जात असल्याने सावकाश असायची... झालं...एसटी उशिरा आल्यामुळे अंजलीला पण उशिर झाला.
कॉलेज म्हणजे अगदी हायस्कूल सारखे होते.
हायस्कूल सारखे नियम, तशीच शिस्तबद्धता,आणि गणवेश पण होता. उशिरा येणाऱ्या विद्यार्थ्यांना तासभर वर्गाबाहेर थांबायला लागत होते. पहिलाच दिवस होता म्हणून घेतलं वर्गात.
विभूते सर...
मराठी विषय शिक्षक.
स्वभाव चांगला पण शिस्तप्रिय माणूस.
वेळेचा काटेकोर पालन करणारे.
त्यांचाच पहिला तास होता.
पहिला दिवस आहे म्हणून सगळ्याना सवलत देण्यात आली. मात्र कधीच उशीर होता कामा नाही ही सक्त ताकीद दिली सगळ्याना.
ओळख करून घेण्यात तास संपला.
दुसरा तास इंग्रजीचा.
पवार टिचर.... इंग्रजीच्या शिक्षिका.
दिसायला देखण्या.. साध्या... प्रेमळ स्वभावाच्या.
वर्गात येताच त्यांनी त्यांची ओळख करून दिली. आता सगळ्या मुलांनी आपले नाव, गाव, किती टक्के मार्क पडले आणि इंग्रजी भाषेत किती मार्क पडले हे इंग्रजी मधून सांगायचे होते.
मुले गोंधळात पडली. नाव, गाव सांगता येईल पण मार्क्स कसे सांगायचे. सगळी मुलं खेड्यापाड्यातून आलेली. इंग्रजी भाषेवर एवढे प्रभुत्व कुठुन येणार ?तरीही मुले सांगत होती.
पण काही ना काही सांगायचं राहून जायचं... सगळ्याची माहिती सांगून झाली. अंजली शेवटच्या बाकावर बसली होती आता तिचा नंबर होता.
इंग्रजी अंजलीचा आवडता विषय आणि वक्तृत्व स्पर्धा मध्ये सतत भाग घेत असल्याने तिच्याकडे कमालीचा आत्मविश्वास होता. त्यामुळे तिनं सगळी माहिती अगदी पध्दतशीरपणे काहीही न चुकवता सांगितली.
सगळेजण ,"आ"वासून बघतच राहिले. अंजली अगदी फाडफाड इंग्रजीत बोलून मोकळी झाली. आणि यामुळेच की काय कॉलेजच्या पहिल्या दिवशीच तिची सगळ्या वर छाप पडली. अगदी पवार टीचर यांच्यावर सुद्धा.....
खूपच छान अंजली...
असा शेरा मिळाल्यावर अंजलीलाही भारी वाटलं पहिल्या दिवशी मस्त शेरा मिळाला...तिचा आत्मविश्वास आणखीन वाढला... एकंदरीत अंजलीचा कॉलेजचा पहिला दिवस तिच्यासाठी खूप छान आणि अविस्मरणीय ठरला.