अधूरे प्रेम - अंतिम भाग
अधूरे प्रेम - अंतिम भाग
अंजली आणि समीर चे प्रेम हळूहळू फुलत होते.. बहरत होते. पण अशा गोष्टी वाऱ्याच्या वेगानं पसरतात हेही तितकेच खरे.....
असं म्हणतात,,,
मांजर डोळे मिटून दूध पिते...
पण सगळ्या जगाला माहिती असते.या दोघांच्या आयुष्यात पण असच घडलं.कसं कुणास ठावूक अंजली च्या आईला हे समजले आणि बाबांना देखील.त्यांनी अंजलीला चांगलेच सुनावले.घाबरून गेली खूप. दुसऱ्या दिवशी कॉलेज ला गेली पण समीर कडे बघायची हिम्मत होईना. त्याला काय आणि कसं सांगायचे.
क्षबारावी ची परीक्षा जवळ आली होती. अभ्यास पण करायला हवा होता... ती समीर पासून दूर राहू लागली. पेपर च्या शेवटच्या दिवशी समीरशी बोलावे अन् काय ते ठरवायचे असे तिला वाटले.
पण झाले उलटेच..
शेवटच्या दिवशी दोघांना बोलता ,भेटता आले नाही.
सुट्टी लागली... आता पुन्हा भेट होईल का नाही हे पण सांगता येत नव्हते..
सुट्टी लागली की लगेचच अंजलीच्या लग्नासाठी स्थळे पहायला सुरुवात झाली.. अंजलीने साफ नकार दिला..तिने समीर बद्दल सांगितले... पण तो दुसऱ्या समाजातील असल्याने बाबांनी नकार दिला.
मी पाहिलेल्या मुलाशी तुला लग्न करावे लागेल. नाही तर आम्हाला समाजात तोंड दाखवायला जागा राहणार नाही... अंजलीकडे काही पर्याय नव्हता...
समीर शी संपर्क तरी कसा करावा सुचत नव्हते.
एकमेकांच्या आठवणीत कासावीस होत होते.
भेटायचं कुठे आणि कसे हा मोठा प्रश्न निर्माण झाला होता.पण योगायोग असेल किंवा आणखी काही....
अशी संधी चालून आली.
समीरच्या गावातील एका मुलाचे लग्न अंजलीच्या गावात होते.. समीरला ही संधी चुकवायची नव्हती... तो पण या लग्नाला आला.... पण अंजली काकू सोबत शेतावर गेली होती...
आता काय करायचं...
मग समीर ने अंजलीची त्यांच्या शेजारी राहणाऱ्या मुलीला विनंती केली... ......काही तरी करून माझी नि अंजलीची गाठ घालून दे. अंजलीची मैत्रीण अंजलीच्या आईकडे गेली...
"काकू आम्हाला अंजलीला भेटायचं आहे. कुठे आहे ती ?"
मग अंजलीचा चुलतभाऊ समीरला आणि मैत्रीणीला घेऊन शेतावर गेला.समीरला अस अचानक समोर पाहून अंजलीला रडू अनावर झाले. समीरच्या कुशीत शिरुन खूप खूप रडली...समीरला पण तिला भेटून भरून आल्यासारखे झाले. थोड्या वेळात दोघांनी एकमेकांना सावरले.
अंजलीने घरी घडलेल्या प्रकार बाबतीत समीरला सांगितले.
"तू मला विसरून जा...
आपलं लग्न होईल अस नाही वाटत मला."
समीरच्या पायाखालची जमीन सरकली. समीर जागीच स्तब्ध झाला . स्वतः ला सावरत म्हणाला,"हे बघ अंजली,लग्न तर मी तुझ्या संगेच करणार, मला थोडा वेळ हवाय,फक्त चार महिन्यात माझे ट्रेनिंग संपेल, मग एकदा जॉईनिंग लेटर आले की लगेचच मी तुला घेऊन जाईन..
मग घरच्यांनी परवानगी दिली नाही तरीसुद्धा.
तु काळजी नको करू."
एवढे बोलून अंजलीचा निरोप घेऊन तो जड पावलांनी निघून गेला.
दिवस एक एक करून पुढे सरकत होते.
अंजलीला एकापेक्षा एक स्थळे येत होती.
समीर सोबत संपर्क होत नव्हता.
आतापर्यंत समीर भेटून दोन महिने झाले होते...
पण शेवटी व्हायचं ते झालचं..
अंजलीच्या बाबांनी तिचे काही ऐकून न घेता लग्न जमवले....जे अंजलीला हवं होतं ते तिच्या नशीबात नव्हतच......लग्न करून अंजली सासरी गेली पण सारखे हुरहूर लागली होती जीवाला...
इकडे समीर ट्रेनिंग संपवून नोकरी ची ऑर्डर घेऊन आला. पण आल्या आल्या अंजलीची लग्नाची बातमी समजली आणि पार कोसळला. पण आता पर्याय नव्हता. तरीही एकदा अंजलीला भेटावं असे वाटत होते.. ......पण तिचा पत्ता काही मिळाला नाही.
अंजलीचे सासर समीरच्या गावाच्या शेजारीच होते .
तिला नेहमी वाटायचं कधीतरी समीर अचानकपणे भेटेल..
"तो मला समजून घेईल ना ?
मी नाही रे फसवलं तुला. वाटलं तर थोबाडीत मार मला ...पण समजून घे प्लीज."
काळाच्या ओघात अंजली संसारात रमली पण समीरची आठवण कायम मनाच्या कोपऱ्यात जपून ठेवली होती.
दैव पण काय चमत्कार दाखवत बघा ना...
तब्बल वीस वर्षांनंतर अंजलीला एका मैत्रीणीकडून समीरचा मोबाईल नंबर मिळाला... आधी तर खूप खूश झाली. पण फोन करावा की नाही. त्याला काय वाटेल? प्रतिक्रिया काय असेल त्याची ? काय होईल ते होईल ?पण एकदाचं त्याला सगळं खरं सांगायचं....
तिनं फोन केला....
"हँलो...स..मी....र...का ?"
"कोन बोलतय?"
"मी...अंजली."
........................
क्षणभर दोघेही शांत...
"अंजली🙄कशी आहेस, कुठे आहेस, किती शोधले तुला ?
माझी वाट का नाही बघीतली?"
अंजलीने समीरला सगळं सांगितले....
दोघांनी खरं प्रेम केलं होतं. समजून घेतले एकमेकांना.
दोघेही आता आपापल्या संसारात पुढे गेले आहेत. सुखी आहेत.
हे होत अंजली आणि समीरचं प्रेम
अधूरे प्रेम.