अधिवेशन
अधिवेशन


वर्षातून दोनदाच होतो अधिवेशनाचा गजर
अधिवेशन कसले, जणू आठवडी बाजार
तुम्ही आम, खास, जनतेचा तुमच्यावर केवढा विश्वास
स्वातंत्र्याची साठी ओलांडली तरी, नाही झाला विकास
लोकसंख्यावाढ, बेकारी , महागाई, कुपोषण
आर्थिक असमानता अन् सगळ्यांना शिक्षण
निरर्थक गोष्टींना महत्व देवून संपवतात आपले भाषण
महत्वाचे प्रश्न दूर ठेवून चालवतात पांगळे शासन
तिजोरीत खणखणाट म्हणुन नोकरभरती बंद
कर्जमाफीला योग्य वेळ? नाही कसली खंत
स्वतःचे मानधन चौपट घेतांत करून जनतेचे शोषण
गडबड गोंधळातंच संपवतात आपले अधिवेशन