अबोल प्रीत ( भाग 2)
अबोल प्रीत ( भाग 2)


पण निखिल चे डोळे संयु लाच पाहात होते हे आदित्यने पाहिले . त्याला वाटले निखिल कदाचित संयु वर प्रेम करत असेल. मग त्यांनी खाऊन घेतले आणि परत लेक्चर ला निघाले तसा आदित्य म्हणाला,एक मिनिट इकडे लक्ष द्या, उद्या माझ्या घरी तुम्ही सगळ्यांनी पार्टी ला यायचे आहे. व्वाव मस्त पार्टी !!पण आदी कुठल्या खुशीत ? श्रावू ने विचारले. आदी म्हणाला कसे आहे ना उद्याच्या शुभ दिनी आम्ही या भूतलावर अवतार घेतला ना म्हणून पार्टी... कळल का श्रावू मॅडम ? ओहह आदी म्हणजे तुझा उद्या वाढदिवस आहे तर अभ्या म्हणाला. हो त्यासाठीच पार्टी ठेवली आहे उद्या संध्याकाळी सात वाजता माझ्या घरी यायचे . हो नक्की येणार सगळे ओरडले. तसा आदी म्हणाला शु शु अरे कॅन्टीन मध्ये आहोत आपण कुल ... पार्टी उद्या आहे मग ओरडा किती पाहिजे तेवढ. आदित्य मना पासून संयु वर प्रेम करू लागला होता पण तिच्या मनात काय असेल का.. तीला ही निखिल आवडत असेल.. काहीच कल्पना त्याला नव्हती. पण इतकं मात्र नक्की होत की निखिल ला संयु आवडत होती हे त्याच्या नजरेत दिसायचं. दुसऱ्या दिवशी अभिजित, निखिल, संयु आणि श्रावू ने कॉलेज मध्ये केक आणला होता आदित्यला केक कापायला लावला सगळ्यांनी त्याला शुभेच्छा दिल्या . संध्याकाळी सगळे भेटू म्हणत ते घरी गेले. सात वाजता सगळे एकत्र आदित्य च्या घरी आले.
मोठा बंगला होता आदीचा. त्याचे वडील बिझनेस मन होते. आदी एकुलता एक मुलगा होता. बंगल्याच्या लाँन वर पार्टी ठेवली होती. बंगला आणि गार्डन खूप मस्त सजवले होते. बरेच लोक पार्टीला आले होते. संयु ने आज पिंक कलर चा अनारकली ड्रेस घातला होता, त्याला मॅचिंग कानातले बॅगल्स, छोटी टिकली मोकळे सोडलेले केस खूप छान दिसत होती ती. आदी तिला पाहातच राहीला. आदित्यने फॉर्मल ड्रेस घातला होता ब्लु आणि व्हाईट चेक्स चा शर्ट आणि क्रिम कलर ची जीन्स, तो ही हॅन्डसम दिसत होता. आज अगदी निरखून संयु त्याला पहात होती. त्याच्या श्रीमंतीच तेज त्याचा चेहऱ्यावर दिसत होते. आदित्य खूप रूबाबदार दिसत होता या क्षणी कोणतीही मुलगी त्याच्या प्रेमात पडली असती. संयु ही याला अपवाद नवहती. रोज कॉलेज मध्ये कॅज्युअल येणारा आदी आज स्मार्ट आणि बोल्ड दिसत होता. संयु ची नजर त्याच्या वरून हटत न्हवती. आदी ही संयु कडे अनमिष नजरेने पाहात होता. शांत मधुर संगीत सुरू होते. गेल्या गेल्या यांना थंड सरबत दिले. आदित्य ने आपल्या आई बाबांशी मित्रांची ओळख करून दिली. गार्डन मध्ये टेबल ठेवले होते तिथे हे चौघे बसले होते. श्रावणी म्हणाली किती मस्त आहे ना रे आदी च घर आणि हे डेकोरेशन . आदी कधी बोलला नाही आपल्याला की तो इतका रिच आहे . हो ग श्रावू तो खूप वेगळा आहे त्याला अजिबात गर्व नाही.. म्हणून तो आपला मित्र झाला ना निक्या म्हणाला. हो ना संयु बोलली. ती आदी कडेच पाहत होती . थोड्याच वेळात केक कापला फोटो काढले . तसे आदी चे बाबा म्हणाले आदी बेटा आता आज तुझं गाणं तर झालच पाहिजे सो एव्हरी बडी लिसन तुम्हा सर्वांना माहीत असेल की नाही माहीत पण आदित्य खूप छान गिटार वाजवतो. तर त्याच गाणं ऐकायलाच हवे ना ! ओहह येस सगळे एका सुरात म्हणाले. इकडे अभ्या निक्या यांना याची कल्पनाच नवहती की आदी गिटार वाजवतो. म्हणजे तसा विषय कधी निघाला नाही आणि आदी ने ही काही सांगितले नाहीं. लगेचच कोणीतरी घरात जाऊन आदी ची गिटार आणली. आदी ने गिटार वर धून छेडली आणि गाणं म्हणू लागला ...
का कळेना कोणत्या क्षणी हरवते मन कसे...
उमलती कश्या धुंद भावना अल्लद वाटे कसे...
बंध जुळती हे प्रीतीचे...
गोड नाते हे जन्मांतरीचे...
एक मी एक तू...
शब्द मी गीत तू...
आकाश तू..आभास तू...
साऱ्यात तू...
ध्यास मी श्वास तू...
स्पर्श मी मोहर तू....
स्वप्नात तू सत्यात तू...
साऱ्यात तू...
का कळेना कोणत्या क्षणी हरवते मन कसे...
उमलती कश्या धुंद भावना अल्लद वाटे कसे...
बंध जुळती हे प्रीतीचे...
गोड नाते हे जन्मांतरीचे...
घडले कसे कधी..
कळते न जे कधी..
हळुवार ते आले कसे ओठावरी..
दे ना तू साथ दे..
हातात हात घे..
नजरेतून नजरेतुनी इकरार घे.....
गाणं संपल. खूप छान गायला आदित्य.
सगळयांनी जोरदार टाळ्या वाजवल्या आदी चा आवाज छान होता तो संयु कडे पाहतच गाण म्हणत होता . संयु ही भान हरपून आदी कडे पहात होती ती ही प्रेमात पडली होती आदित्य च्या!! आणि निखिल संयु च्या प्रेमात आकंठ बुडाला होता.
सगळ्यांनी मस्त जेवण केले एकत्र . अभ्या म्हणाला आदित्य तू का नाही सांगीतलेस की इतकं छान तू गिटार वाजवतोस आणि गाणं म्हणतोस. अरे कधी विषय नाही निघाला तसा आणि मला माझी च स्तुती नाही अशी सांगता येत. त्याच्या अशा सिम्पल वागण्यावर संयु अजूनच भाळली होती. सगळे घरी परतले. संयु मात्र मागेच राहिली कुठेतरी आदित्य च्या आसपास.!! दुसऱ्या दिवशी कॉलेज ला निखिल आणि आदित्य लवकर आले आणि कॅन्टीन ला बसले तसा निखिल म्हणाला आदित्य एक सांगू का तुला कोणाला बोलू नको पण. हा बोल ना काय काम आहे . काम नाही रे, तुझी हेल्प हवी आहे . बोल बिनधास निक्या. आदित्य माझे संयु वर खूप प्रेम आहे रे पण तिच्या मनात काय आहे हे कसे समजून घेऊ मी. निखिल ने आदीत्य च्या हृदयावरच बॉम्ब फोडला
क्रमश,,,,