Meena Kilawat

Children Inspirational

4.6  

Meena Kilawat

Children Inspirational

आपल्या मुलांना प्रेम करतो

आपल्या मुलांना प्रेम करतो

2 mins
9.0K


आपल्या मुलांना प्रेम करतो , मागीतले की वाट्टेल ते देतो,हे कितपत बरोबर आहे ? 

 पालकांनो लहान मुलांचे मानसिकता आणि भावनिकता हे तुम्ही त्याच्यांशी लहानपणी कसे वागतात त्यावर अवलंबुन असते. पालक मुलांचे लाड करण्याच्या नादात कुठे थांबायचे हे सुध्दा विसरतात.

 मागीतले की मिळत असते,ही सवय जर मुलांना लागली की, पुढे हे जड जाते. अशा मुलांना वाईट सवयी लवकर लागतात आणि तर मुल मुली लवकर बिघडतात. नकाराची सवय राहिली नाही तर मोठ्यापणी साधा प्रेमभंग सुध्दा पचवता येत नाही, ना ऑफिसमध्ये वरिष्ठांशी जुळवून घेता येते. याचे कारण पालक मुलांमुलीचे प्रत्येक प्रश्‍न स्वत: सोडवण्याच्या भानगडीत पडतात. कॉलनीत मुला-मुलांचे भांडण झाले तर आई लगेच शेजारच्यांशी भांडायला जाते. शाळेत थोडं टिचर रागावली की बाबा लगेच मुख्याध्यापकांना भेटायला जातात. मुलाला एका क्लासमधुन काढून दुसर्‍या क्लासमध्ये अथवा दुसर्‍या परफॉर्मन्स मध्ये टाकले की लगेच टिचर्सला फोन करुन जवाब विचारतात. या सर्वामधुन मुलांना अपेक्षित उत्तरे मिळतात. नकार पचवून घ्यायची सवय त्यांना मुळीच नसते.

 पालक जेव्हा गरज नसतांना पाल्याचा हट्ट पुरवतात. पैसे नसतांना सुध्दा मुलांचे फाजील लाड पूर्ण करतात आणि त्याला गोंडस शब्दांची जोड देतात आणि ती जोड म्हणजे ‘‘आमचे लहानपणी असे लाड झाले नाहीत,किंवा मला लहानपणी हे सर्व मिळाले नाही ते मी माझ्या मुलां-मुलीला देईल,अस मायेच्या आधिन होवून आईवडिल करतात आणि या कृतीलाच प्रेम,माया असा शब्द देतात.असे करणे आज पालकांना योग्य वाटत असले तरी पुढे त्यांचे भंयकर रुप समोर येत असते तेंव्हा पालकांच्या हातात काहीच नसत.वेळ निघून जातो. 

 खरं तर प्रेम आणि काळजी यांचा समतोल साधायचा असतो, कारण दोघं जास्त झाले की, वाढ खुटण्याची भीती असते. मागणी आणि पुरवठा यांचा योग्य समतोल पालक आणि पालकांमध्ये होणे गरजेचे असते.

 आपण मुलांशी लहानपणी कसे वागतो त्यावर भविष्यातील त्यांची वर्तवणुक ठरत असते. म्हणून मागीतले ते मिळते ही सवय मुलांना लावु नका. मोठ्या माणसांनी, शिक्षकांनी किंवा क्लास टीचर ने त्याच्या भल्यासाठी काही ऍक्शन घेतली असेल तर त्यावेळेस टिचर्सला सहकार्य करा. कारण शेवटी मुलं मोठ्यापणी सर्वांनमध्ये मिळून मिसळून राहणं, उत्तम संवाद साधणे हे महत्वाच असते आणि याला अडथळा असतो अति लाड,अति प्रेम आणि शिस्त ही प्रेमाची पहिली कृती असते.

  


Rate this content
Log in

Similar marathi story from Children