STORYMIRROR

Meena Kilawat

Inspirational

1.0  

Meena Kilawat

Inspirational

सांस्कृतिक व विद्यार्थी विका

सांस्कृतिक व विद्यार्थी विका

3 mins
2.9K


 

       सांस्कृतिक व विद्यार्थी विकास हा अती महत्वपूर्ण जडणघडणीचा प्रकार आहे. भारतीय संस्कृती, ही प्राचीन संस्कृती म्हणून ओळखली जाते व

विश्वात सर्वात जास्त भारतीय संस्कृतीची एक वेगळी ओळख आहे. कारण या संस्कृतीने भारत देशाला आजही एकतेमध्ये गुंफुन ठेवलेले आहे. या देशात विविध जाती धर्माचे लोक गुण्यागोविंदाने राहतात. प्रत्येक जातीचे, धर्माचे एक वेगळेपण या संस्कृतीमधून पारदर्शकता दिसून येते. भारतीय संस्कृतीमध्ये अनेक

प्रकारचे खान, पान वैभव व वेशभूषा, परंपरा आणि बोली भाषा या गोष्टीचे प्रामुख्याने प्रदर्शन आणि ऐतिहासीक अप्रतिम नैसर्गीक भावभंगीमाचा पुरेपूर समावेश

असतो. 

     प्रत्येक समाज घटकाने संस्कृतीत जगण्याचे नैतिक मूल्य जोपालेले आहेत. या भारतीय संस्कृतीने आपली मर्यादा, स्वाभिमान, राहणीमान टिकवून ठेवली आहे. खर तर संस्कृती माणसाच्या वयक्तिक, सामाजिक जीवनाचा भाग असते. परंतु हल्ली प्रत्येक समाज हा आपल्या संस्कृतीला काही प्रमाणात कुठेतरी विसरत चालला आहे. कारण कुठेतरी समाजाची दिशाभूल करण्याचा प्रयत्न चालवला आहे. आणि तो समाजघातक आहे. हा बदल बाल व युवा शक्तीसाठी घातक आहे. काही कार्यक्रम नुसतेच जनता गोळा करण्याच्या उद्देशाने केले जातात, असे आपल्याला दिसून येते. त्यातून चांगल ते घ्यायचे वाईट सोडून द्यायचे. हे आपण कोणाकोणाला सांगणार आहोत?

      भारतीय संस्कृतीचे दर्शन बालमनावर वरचेवर बिंबवले पाहिजे. एकमेंकांना सहकार्य, आदर, प्रेम, आपुलकीचे वातावरण निर्माण करून नितीमूल्याचे जतन करणे आवश्यक आहे. सांस्कृतीक कार्यक्रम वांरवांर घेवून छोट्या मुलांना चांगले संस्कार देण्याची गरज आहे. आपल्या पूर्वजांची अमूल्य धरोहर जपून चरीत्रमय कार्यक्रमाची रचना करावी. तरच संस्कृती टीकेल, त्यासाठी समाजातील प्रत्येक व्यक्ती, संस्थेने ते टिकविण्यासाठी प्रयत्न केल्यास भारतीय सांस्कृतीकचे महत्व कायम टिकून राहिल व त्याचा काही उपयोग होईल. परंतु आजकाल सांस्कृतिक कार्यक्रमात विकृती दिसते आहे. कोणत्या गोष्टी घ्यायला हव्यात कोणत्या

नाही यावरसुद्धा विचार होणे आवश्यक आहे. आपल्या संस्कृतीमध्ये गायन, वादन, पारंपारिक नृत्य, वेशभूषा या गोष्टींना शासनाची पुरेपूर मदत घेऊन त्यांना संस्कृती संवर्धन योजनेत सहभागी केल पाहिजे, इमा

ने एतबारे नी:पक्षपातीपणे कलाक्षेत्राला समृद्ध केले पाहिजे. आत्मविश्वास जागवला पाहिजे. जेणेकरून कलाविष्काराला स्फुरण चढेल. पण आज निदर्शनात येते की, ही बाब अत्यंत दयनीय स्थीतीत आहे. जर आपण या गोष्टींना प्राधान्य दिले तर खरे

संस्कृतीचे घटनाकार आहोत. असे म्हणता येईल.

पाश्चिमात्य संस्कृती झपाट्याने आपल्या जीवनात शिरकाव करत आहे. आणि आपणही त्याला तितक्याच वेगाने बळी पडलेलो आहोत. या पाश्चिमात्य संस्कृतीने काही आपल्यावर जबरदस्ती केलेली नाही. आपणच कमजोर पडलो आहोत. आणि आहारी गेलेलो आहोत. आपण आपल्याच ऊज्वल संस्कृतीची हेळसांड करून चार पैशाकरीता बाजार करतो आहोत. त्या बाजारात स्वत:चीपण बोली लावतो आहे. विदेशात राहाण्याची स्वप्न बघतो आहोत. आज या जगात आपल्या भारतीय संस्कृतीला अतीशय सन्मान आहे पण इथल्या लोंकाच्या नजरेत ते देश महान आहेत. आपल्या संस्कृतीला वाचवायची असेल तर आपण तटस्थ भूमिका घेतली पाहिजे.

      सांस्कृतिक कार्यक्रमापासून बालकांपासून तर मोठ्यापर्यंत सर्वच त्याचा लाभ घेवू शकतात. छोट्या मोठ्या कार्यक्रमातूनच मोठमोठे कलाकार घढलेले आहेत. त्यांचे राज्य जनसागरावर अबाधित आहे. काही कलोपासक तर उपजीवीका त्या कलेतूनच चालवत आहेत. काही कलाकारांनी तर उंच भरारी घेवून शिखरे गाठली आहेत. कोणत्याही कलाकाराचा पहिला पाया शाळेत सांस्कृतिक कार्यक्रमात भाग घेवूनच होतो. परंतु सांस्कृतिक कार्यक्रमात कोणत्या गोष्टी करू द्यायला पहिजेत हे आईबाबांनी किंवा शिक्षकवृंदानी सामंजसपणे हाताळले पाहिजेत व कोणत्या गोष्टिवर लक्ष केंद्रीत करायला पाहिजे हेही सांगितले पाहिजे. यावर सुद्धा विचारमंथन करणे आवश्यक असते.

    खरच या सांस्कृतिक कार्यक्रमातून आपल्याला  आपल्या सुप्त गुणांना वाव मिळत असतो. स्टेज डेअरिंग येवून उद्याचा महान नेता,  नट-नटी,

अभिनेता ,व्याख्याता घडू शकतो. म्हणून संस्कृतीक, लोककला, या सर्वांच उगम सांस्कृतिक कार्यक्रमातूनच होत असतं. मुलांना, मोठ्यांना प्रेरणादाई व स्फुर्ती देणारे असते.

या स्पर्धेच्या युगात कलेला खूपच किंमत आहे. हे साध्य करण्यासाठी आजच्या पिढीला सांस्कृतिक कार्यक्रमाची गरज आहे व आवश्यकतापण आहे. त्यातून

जनसेवा तशीच देशसेवा ही घडत असते. *सांस्कृतिक व विद्यार्थी विकास*

     


Rate this content
Log in

Similar marathi story from Inspirational