खेळ कुणाला दैवाचा कळला
खेळ कुणाला दैवाचा कळला


खेळ कुणाला दैवाचा कळला, खरच आहे. आपल्या नशिबात काय आहे हे आपण नाही सांगू शकत किंवा कोणीच सांगू शकत नाही. म्हणुन स्वत:ला सिद्ध करण्याकरीता प्रत्येक जण इथे झिजतो आहे धडपडतो आहे. जर कां आपणास माहिती असत की नशिबात आपल्या अप्रतिम सु:ख आहे, किंवा भयावह दुःख आहेत.तर आपन स्वस्त बसून ती घटना घटण्याची वाट बघितली असती.आणि कधी कल्पनाच केली कधी केली नसती, पण काही घटना घडल्यावर आपण विश्वास करत नाहीत.आणि आश्चर्यचकीत होत असतो.
"हे कस शक्य आहे? अस झालच कस? मला कल्पना असती तर मी हे केले असते, ते केले असते." अस सारख म्हणत असतो. खेळ कुणाला दैवाचा कळला कां कधी? एक प्रत्यक्ष घटनेने माझे मन हेलावून टाकले. तरूण वयाचा तो मुलगा होता.
तो मामामामीकडे लहानाचा मोठा झाला .त्याची सर्व लाड पुरवले गेले .मामाकडेच तो शिकला व दहावीतच मामाकडे गाडीसाठी तगादा लावला होता. मामाने त्याच नाही ऐकल, ठाम शब्दात सांगितल होत की आधी शिक्षण पूर्ण कर नंतर गाडी घेवून देतो. शिक्षणात त्याच लक्ष नव्हतच मुळी, पास,नापास होता होता कसातरी अकरावीला कॉलेज मधे जायला लागला. तेंव्हा मामाला मुलगा नसल्यामुळे मामामामीला त्याचा फार लळा होता. त्यांनी त्याचे सर्व लाड पूर्ण केले. पण फक्त गाडीसाठी नकार दिला, मामा त्याला नेहमी समजवायचे. त्याला आईवडिलाच्या परिस्थितीची जाणीव द्यायचे. काही दिवस शांत रहायचा, पुन्हा त्याची कुरबूर सुरु व्हायची. त्याला मामीने संगणकाचे क्लासेस लावून दिले. त्याला वेळ मिळू नये म्हणून पार्ट टाईम जॉब को.आप्रेटिव बँकेत जॉब लावून दिला. त्याच्या मामाने त्याला सांगितले आता तू मोठा झाला आहेस, आता आपल्या आईला तू मनीऑर्डर करायचा. पण त्याला ते पटल नाही तो स्वता:पुरताच विचार करायचा.आणि म्हणायचा, "मी अजून लहान आहे. घरची जवाबदारी सांभाळण्या इतपत मी मोठा नाही झालो काही माझा पैसा सध्या मी खर्च करणार." आधी गाडी घेणार नंतर पुढे पाहु काय करायच ते! माझ्यावर तुम्ही दडपण आणू नका, नाही तर मी इथे राहाणार नाही." मग काय त्याला कुणाची बोलायची हिम्मतच होईना.आणि बॆग भरुन जायला निघायचा.
आजीने मामामामीने विणवणी करुन जावू दिले नाही. तो फार वेगळा वागत होता.रात्री १/२ पर्यंत घराबाहेर राहायचा. त्यासाठी आजीने त्याला टोकले, मामाने पण त्याला प्रेमाने सांगितले .की तू दुसऱ्याचा मुलगा आहेस. तुझी जवाबदारी आमच्यावर आहे. तू असा का वागतो आहेस? तुझ्या मनात काय आहे? दोन गोष्टी बोलून मामा बाहेर गेले.आणि पुन्हा त्याने आपली बॆग उचलली. लगेच आजी अन् मामी काकूळतीस येवून त्याची विणवणी करु लागल्या. आजी म्हणाली , "अरे पोरा असा भरल्या ताटाला लात मारु नकोस रे! असा झिडकारुन जावू नको रे!" पण तो आईकडे निघून गेला.सर्व घरात शांतता पसरली. सर्व दिलेल प्रेम वाया गेले होते.पदरी निराशा आली होती. त्यांनी मोठ्या मनाने त्याला माफ केले..
वरचेवर भरभर दिवस गेले तीन महिन्यानंतर राखीला तो आला. मामाच्या मुलीकडून राखी बांधली. तो आंनदात दिसत होता.गाडी घेतल्याची बातमी दिली. तिथे ही पार्टटाईम जॉब लागली होती. त्याच्या आईने सांगितले होते. दोन दिवस राहुन तो गावी गेला. इकडे सर्वांना त्याचा आंनद पाहून आंनद झाला. काही दिवसानी फोन आला. त्याचा गाडीने अँक्सिडेंट झाला. डोक्याला मुका मार लागला होता. मोठ ऑप्रेशन झालय, पंधरा दिवस कोमात गेला, तो उठलाच नाही.अआठ नऊ लाख खर्च झाला.तो वेगळा, सर्वात जास्त मामामामीला आघात पोहचला.त्याला आपल्या बाळासारख प्रेम केलेल होत. पण नियतीच्या मनात काय ते कुणालाही माहीत नसत.